< מִשְׁלֵי 15 >
מענה רך ישיב חמה ודבר עצב יעלה אף׃ | 1 |
१शांतीच्या उत्तराने राग निघून जातो, पण कठोर शब्दामुळे राग उत्तेजित होतो.
לשון חכמים תיטיב דעת ופי כסילים יביע אולת׃ | 2 |
२सुज्ञाची जिव्हा सुज्ञानाची प्रशंसा करते, पण मूर्खाचे मुख मूर्खपणा ओतून टाकते.
בכל מקום עיני יהוה צפות רעים וטובים׃ | 3 |
३परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात, ते चांगले आणि वाईट पाहत असतात.
מרפא לשון עץ חיים וסלף בה שבר ברוח׃ | 4 |
४आरोग्यदायी जीभ जीवनाचा वृक्ष आहे, परंतु कपटी जीभ आत्म्याला चिरडणारी आहे.
אויל ינאץ מוסר אביו ושמר תוכחת יערם׃ | 5 |
५मूर्ख आपल्या वडिलांचे शिक्षण तुच्छ लेखतो, पण जो विवेकी आहे तो चुकीतून सुधारतो.
בית צדיק חסן רב ובתבואת רשע נעכרת׃ | 6 |
६नीतिमानाच्या घरात मोठे खजिने आहेत, पण दुष्टाची कमाई त्यास त्रास देते.
שפתי חכמים יזרו דעת ולב כסילים לא כן׃ | 7 |
७ज्ञानाचे ओठ विद्येविषयीचा प्रसार करते, पण मूर्खाचे हृदय असे नाही.
זבח רשעים תועבת יהוה ותפלת ישרים רצונו׃ | 8 |
८दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो, पण सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे.
תועבת יהוה דרך רשע ומרדף צדקה יאהב׃ | 9 |
९दुष्टांच्या मार्गाचा परमेश्वरास वीट आहे, पण जे नीतीचा पाठलाग करतात त्यांच्यावर तो प्रीती करतो.
מוסר רע לעזב ארח שונא תוכחת ימות׃ | 10 |
१०जो कोणी मार्ग सोडतो त्याच्यासाठी कठोर शासन तयार आहे, आणि जो कोणी सुधारणेचा तिरस्कार करतो तो मरेल.
שאול ואבדון נגד יהוה אף כי לבות בני אדם׃ (Sheol ) | 11 |
११अधोलोक आणि विनाशस्थान परमेश्वरापुढे उघडे आहे; तर मग मनुष्यजातीच्या वंशाची अंतःकरणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत? (Sheol )
לא יאהב לץ הוכח לו אל חכמים לא ילך׃ | 12 |
१२निंदकाला शिक्षेची चीड येते; तो सुज्ञाकडे जात नाही.
לב שמח ייטב פנים ובעצבת לב רוח נכאה׃ | 13 |
१३आनंदी हृदय मुख आनंदित करते, पण हृदयाच्या दुःखाने आत्मा चिरडला जातो.
לב נבון יבקש דעת ופני כסילים ירעה אולת׃ | 14 |
१४बुद्धिमानाचे हृदय ज्ञान शोधते, पण मूर्खाचे मुख मूर्खताच खाते.
כל ימי עני רעים וטוב לב משתה תמיד׃ | 15 |
१५जुलूम करणाऱ्याचे सर्व दिवस दुःखकारक असतात, पण आनंदी हृदयाला अंत नसलेली मेजवाणी आहे.
טוב מעט ביראת יהוה מאוצר רב ומהומה בו׃ | 16 |
१६पुष्कळ धन असून त्याबरोबर गोंधळ असण्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे चांगले आहे.
טוב ארחת ירק ואהבה שם משור אבוס ושנאה בו׃ | 17 |
१७पोसलेल्या वासराच्या तिरस्कारयुक्त मेजवाणीपेक्षा, जेथे प्रेम आहे तेथे भाजीभाकरी चांगली आहे.
איש חמה יגרה מדון וארך אפים ישקיט ריב׃ | 18 |
१८रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो, पण जो रागास मंद आहे तो मनुष्य भांडण शांत करतो.
דרך עצל כמשכת חדק וארח ישרים סללה׃ | 19 |
१९आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी आहे, पण सरळांची वाट राजमार्ग बनते.
בן חכם ישמח אב וכסיל אדם בוזה אמו׃ | 20 |
२०शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदीत करतो. पण मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो.
אולת שמחה לחסר לב ואיש תבונה יישר לכת׃ | 21 |
२१बुद्धिहीन मनुष्य मूर्खपणात आनंद मानतो. पण जो समंजस आहे तो सरळ मार्गाने जातो.
הפר מחשבות באין סוד וברב יועצים תקום׃ | 22 |
२२जेथे सल्ला नसतो तेथे योजना बिघडतात, पण पुष्कळ सल्ला देणाऱ्यांबरोबर ते यशस्वी होतात.
שמחה לאיש במענה פיו ודבר בעתו מה טוב׃ | 23 |
२३मनुष्यास आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद होतो; आणि योग्यसमयीचे शब्द किती चांगले आहे!
ארח חיים למעלה למשכיל למען סור משאול מטה׃ (Sheol ) | 24 |
२४सुज्ञाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो. (Sheol )
בית גאים יסח יהוה ויצב גבול אלמנה׃ | 25 |
२५परमेश्वर गर्विष्ठांची मालमत्ता फाडून काढेल, परंतु तो विधवेच्या मालमत्तेचे रक्षण करतो.
תועבת יהוה מחשבות רע וטהרים אמרי נעם׃ | 26 |
२६परमेश्वर पाप्यांच्या विचारांचा द्वेष करतो, पण दयेची वचने त्याच्या दुष्टीने शुद्ध आहेत.
עכר ביתו בוצע בצע ושונא מתנת יחיה׃ | 27 |
२७चोरी करणारा आपल्या कुटुंबावर संकटे आणतो, पण जो लाचेचा तिटकारा करतो तो जगेल.
לב צדיק יהגה לענות ופי רשעים יביע רעות׃ | 28 |
२८नीतिमान उत्तर देण्याआधी विचार करतो, पण दुष्टाचे मुख सर्व वाईट ओतून बाहेर टाकते.
רחוק יהוה מרשעים ותפלת צדיקים ישמע׃ | 29 |
२९परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे, पण तो नीतिमानांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.
מאור עינים ישמח לב שמועה טובה תדשן עצם׃ | 30 |
३०नेत्राचा प्रकाश अंतःकरणाला आनंद देतो, आणि चांगली बातमी शरीराला निरोगी आहे.
אזן שמעת תוכחת חיים בקרב חכמים תלין׃ | 31 |
३१जर कोणीतरी तुम्हास जीवन कसे जगावे म्हणून सुधारतो त्याकडे लक्ष द्या, तुम्ही ज्ञानामध्ये रहाल.
פורע מוסר מואס נפשו ושומע תוכחת קונה לב׃ | 32 |
३२जो कोणी शिक्षण नाकारतो तो आपल्या स्वत: लाच तुच्छ लेखतो, परंतु जो कोणी शासन ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो.
יראת יהוה מוסר חכמה ולפני כבוד ענוה׃ | 33 |
३३परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण देते, आणि आदरापूर्वी नम्रता येते.