< איכה 3 >
אני הגבר ראה עני בשבט עברתו׃ | 1 |
१तो पूरूष मीच आहे, ज्याने परमेश्वराच्या क्रोधाच्या काठीकडून संकटे पाहिली.
אותי נהג וילך חשך ולא אור׃ | 2 |
२त्याने मला दूर करून प्रकाशाकडे न जाता अंधारात चालण्यास भाग पाडले.
אך בי ישב יהפך ידו כל היום׃ | 3 |
३खचितच तो माझ्याविरूद्ध झाला आहे; पूर्ण दिवस त्याने आपला हात माझ्यावर उगारला आहे.
בלה בשרי ועורי שבר עצמותי׃ | 4 |
४त्यांने माझा देह व त्वचा जीर्ण केली आहे आणि माझी हाडे मोडली आहेत
בנה עלי ויקף ראש ותלאה׃ | 5 |
५त्याने माझ्याविरूद्ध विष व दुःखाचे बांधकाम करून मला वेढले आहे.
במחשכים הושיבני כמתי עולם׃ | 6 |
६फार पूर्वी मृत्यू पावलेल्या मनुष्याप्रमाणे त्याने मला काळोखात रहावयास लावले आहे.
גדר בעדי ולא אצא הכביד נחשתי׃ | 7 |
७त्याने माझ्याभोवती तटबंदी केल्याने त्यातून माझी सुटका होऊ शकत नाही. त्याने माझे बंध अधिक मजबूत केले आहेत.
גם כי אזעק ואשוע שתם תפלתי׃ | 8 |
८मी मदतीसाठी आक्रोशाने धावा केला तेव्हाही तो माझ्या प्रार्थनांचा धिक्कार करतो.
גדר דרכי בגזית נתיבתי עוה׃ | 9 |
९त्याने माझा रस्ता दगडी चिऱ्यांच्या भिंतीने अडवला आहे. त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे.
דב ארב הוא לי אריה במסתרים׃ | 10 |
१०तो माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या अस्वलासारखा आणि लपून बसलेल्या सिंहासारखा झाला आहे.
דרכי סורר ויפשחני שמני שמם׃ | 11 |
११त्याने माझ्या मार्गावरून मला बाजूला करून, फाडून माझे तुकडे तुकडे केले आहेत आणि मला उदास केले आहे.
דרך קשתו ויציבני כמטרא לחץ׃ | 12 |
१२त्याने आपला धनुष्य वाकवला आहे आणि मला त्याच्या बाणांचे लक्ष्य बनविले आहे.
הביא בכליותי בני אשפתו׃ | 13 |
१३त्याने आपले बाण माझ्या अंतःकरणात घुसवले आहेत.
הייתי שחק לכל עמי נגינתם כל היום׃ | 14 |
१४माझ्या स्वजनामध्येच मी चेष्टेचा विषय; प्रतिदिवशी त्यांचे हास्यास्पद गीत झालो आहे.
השביעני במרורים הרוני לענה׃ | 15 |
१५त्याने मला कडूपणाने भरले आहे, त्याने मला कडू दवणा प्यायला भाग पाडले आहे.
ויגרס בחצץ שני הכפישני באפר׃ | 16 |
१६त्याने खड्यांनी माझे दात तोडले आहेत. त्याने मला राखेत लोटले आहे.
ותזנח משלום נפשי נשיתי טובה׃ | 17 |
१७माझ्या जीवनातील शांतीच तू काढून टाकली आहेस; कोणत्याही आनंदाचे मला स्मरण होत नाही.
ואמר אבד נצחי ותוחלתי מיהוה׃ | 18 |
१८मी म्हणालो, “माझे बल आणि परमेश्वरावरची माझी आशा नष्ट झाली आहे.”
זכר עניי ומרודי לענה וראש׃ | 19 |
१९माझे दुःख, कष्ट, कडू दवणा आणि विष ह्याचे स्मरण कर.
זכור תזכור ותשיח עלי נפשי׃ | 20 |
२०मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे. म्हणूनच मी माझ्यामध्ये नमलो आहे.
זאת אשיב אל לבי על כן אוחיל׃ | 21 |
२१पण हे मी माझ्या मनात विचार करतो म्हणून मला आशा वाटते.
חסדי יהוה כי לא תמנו כי לא כלו רחמיו׃ | 22 |
२२ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे.
חדשים לבקרים רבה אמונתך׃ | 23 |
२३ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे.
חלקי יהוה אמרה נפשי על כן אוחיל לו׃ | 24 |
२४माझा जीव म्हणतो, “परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन.”
טוב יהוה לקוו לנפש תדרשנו׃ | 25 |
२५जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्यास शोधतो, त्याला परमेश्वर चांगला आहे.
טוב ויחיל ודומם לתשועת יהוה׃ | 26 |
२६परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची मुकाट्याने वाट पाहणे हे चांगले आहे.
טוב לגבר כי ישא על בנעוריו׃ | 27 |
२७पुरूषाने आपल्या तरूणपणांत जू वाहावे हे त्यास फार चांगले आहे.
ישב בדד וידם כי נטל עליו׃ | 28 |
२८ते परमेश्वराने त्याच्यावर ठेवले आहे म्हणून त्याने एकांती बसावे व स्वस्थ रहावे.
יתן בעפר פיהו אולי יש תקוה׃ | 29 |
२९त्याने आपले मुख धुळीत घातल्यास, कदाचित त्यास आशा प्राप्त होईल.
יתן למכהו לחי ישבע בחרפה׃ | 30 |
३०एखाद्यास मारण्यासाठी खुशाल आपला गाल पुढे करून त्यास पूर्ण खजील करावे;
כי לא יזנח לעולם אדני׃ | 31 |
३१कारण परमेश्वर त्यांचा कायमचा त्याग करणार नाही.
כי אם הוגה ורחם כרב חסדו׃ | 32 |
३२जरी त्याने दुःख दिले तरी तो आपल्या दयेच्या विपुलतेनूसार करुणा करील.
כי לא ענה מלבו ויגה בני איש׃ | 33 |
३३कारण तो आपल्या खुशीने कोणाचा छळ करत नाही आणि मनूष्य संतानास दुःख देत नाही.
לדכא תחת רגליו כל אסירי ארץ׃ | 34 |
३४पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडविणे,
להטות משפט גבר נגד פני עליון׃ | 35 |
३५परात्पराच्या समोर मनुष्याचे हक्क बुडवणे,
לעות אדם בריבו אדני לא ראה׃ | 36 |
३६एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसविणे, या अशा गोष्टी परमेश्वराच्या दृष्टी आड आहेत काय?
מי זה אמר ותהי אדני לא צוה׃ | 37 |
३७परमेश्वराने आज्ञा केली नसता ज्याने काही बोलावे आणि ते घडून यावे असा कोणी आहे का?
מפי עליון לא תצא הרעות והטוב׃ | 38 |
३८इष्ट व अनिष्ट ही सर्वश्रेष्ठ देवाच्या मुखातून येत नाहीत काय?
מה יתאונן אדם חי גבר על חטאו׃ | 39 |
३९कोणत्याही जिवंत मनुष्याने व पुरूषाने आपल्या पापांच्या शिक्षेबद्दल कुरकुर का करावी?
נחפשה דרכינו ונחקרה ונשובה עד יהוה׃ | 40 |
४०चला तर आपण आपले मार्ग शोधू आणि तपासू आणि परमेश्वराकडे परत फिरू.
נשא לבבנו אל כפים אל אל בשמים׃ | 41 |
४१आपण आपले हृदय व आपले हात स्वर्गातील देवाकडे उंचावूया.
נחנו פשענו ומרינו אתה לא סלחת׃ | 42 |
४२आम्ही पाप केले आहे, फितूरी केली आहे. म्हणूनच तू आम्हास क्षमा केली नाहीस.
סכתה באף ותרדפנו הרגת לא חמלת׃ | 43 |
४३तू आपणाला क्रोधाने झाकून घेऊन आमचा पाठलाग केला आणि दया न दाखविता आम्हास ठार केलेस.
סכותה בענן לך מעבור תפלה׃ | 44 |
४४कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वतःला अभ्रांनी वेढले आहेस.
סחי ומאוס תשימנו בקרב העמים׃ | 45 |
४५लोकांमध्ये तू आम्हास कचरा व धूळ ह्यासारखे केलेस.
פצו עלינו פיהם כל איבינו׃ | 46 |
४६आमच्या सर्व शत्रूंनी आम्हाविरूद्ध आपले तोंड वासले आहे.
פחד ופחת היה לנו השאת והשבר׃ | 47 |
४७भय व खाच, नाश व विध्वंस ही आम्हावर आली आहे.
פלגי מים תרד עיני על שבר בת עמי׃ | 48 |
४८माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे, म्हणून माझ्या डोळयांना धारा लागल्या आहेत.
עיני נגרה ולא תדמה מאין הפגות׃ | 49 |
४९माझे डोळे गळत आहेत व थांबत नाही;
עד ישקיף וירא יהוה משמים׃ | 50 |
५०परमेश्वर स्वर्गातून आपली नजर खाली लावून पाहीपर्यंत त्याचा अंत होणार नाही.
עיני עוללה לנפשי מכל בנות עירי׃ | 51 |
५१माझ्या नगरातील सर्व कन्यांची स्थिती पाहून माझे डोळे मला दुःखी करतात.
צוד צדוני כצפור איבי חנם׃ | 52 |
५२निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखा माझा पाठलाग केला आहे.
צמתו בבור חיי וידו אבן בי׃ | 53 |
५३गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जिवाचा अंत केला आहे. आणि माझ्यावर दगड लोटला आहे.
צפו מים על ראשי אמרתי נגזרתי׃ | 54 |
५४माझ्या डोक्यावरून पाणी गेले. मी मनाशी म्हणालो, “आता माझा अंत होत आहे.”
קראתי שמך יהוה מבור תחתיות׃ | 55 |
५५परमेश्वरा मी खोल खाचेतून तुझ्या नावाचा धावा केला.
קולי שמעת אל תעלם אזנך לרוחתי לשועתי׃ | 56 |
५६तू माझा आवाज ऐकलास. माझे उसासे व माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको.
קרבת ביום אקראך אמרת אל תירא׃ | 57 |
५७मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास व म्हणालास, “भिऊ नकोस.”
רבת אדני ריבי נפשי גאלת חיי׃ | 58 |
५८परमेश्वरा, माझ्या जीवनातील वादविवादाकरिता तू मध्यस्थी केलीस, तू खंडणी भरून माझा जीव सोडवलास.
ראיתה יהוה עותתי שפטה משפטי׃ | 59 |
५९परमेश्वरा, माझ्याविषयी जो अन्याय झाला आहे, तो तू बघितला आहेस. तू मला न्याय दे.
ראיתה כל נקמתם כל מחשבתם לי׃ | 60 |
६०माझ्याविरूद्ध रचलेले सुडाचे सर्व कृत्ये; आणि त्यांच्या योजना तू पाहिल्यास.
שמעת חרפתם יהוה כל מחשבתם עלי׃ | 61 |
६१त्यांनी केलेला माझा उपहास आणि माझ्याविरूध्द आखलेले बेत. परमेश्वरा, तू ऐकले आहेस.
שפתי קמי והגיונם עלי כל היום׃ | 62 |
६२माझ्यावर उठलेले ओठ आणि सारा दिवस त्यांनी माझ्याविरुध्द केलेली योजना तू ऐकली आहे.
שבתם וקימתם הביטה אני מנגינתם׃ | 63 |
६३परमेश्वरा, त्यांचे बसने व उठने तू पाहा, मी त्यांच्या थट्टेचा विषय झालो आहे.
תשיב להם גמול יהוה כמעשה ידיהם׃ | 64 |
६४परमेश्वरा, त्यांना योग्य ते फळ दे. त्यांच्या कार्मांची परतफेड कर.
תתן להם מגנת לב תאלתך להם׃ | 65 |
६५तू त्यांना हृदयाची कठोरता देशील, तुझा शाप त्यांना देशील.
תרדף באף ותשמידם מתחת שמי יהוה׃ | 66 |
६६क्रोधाने तू त्यांचा पाठलाग करशील व परमेश्वराच्या आकाशाखाली तू त्यांचा विध्वंस करशील.