< איוב 18 >
१नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले आणि म्हणाला,
עד אנה תשימון קנצי למלין תבינו ואחר נדבר׃ | 2 |
२तू तुझे बोलणे बंद कर! शांत राहा आणि लक्ष दे. आम्हास काही बोलू दे.
מדוע נחשבנו כבהמה נטמינו בעיניכם׃ | 3 |
३आम्ही पशूसारखे आहोत असे तू का समजतोस, आम्ही का तुझ्या दृष्टीने अशुद्ध झालोत?
טרף נפשו באפו הלמענך תעזב ארץ ויעתק צור ממקמו׃ | 4 |
४रागाने स्वत: स फाडून टाकणाऱ्या, तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय, किंवा खडक त्याची जागा सोडेल का?
גם אור רשעים ידעך ולא יגה שביב אשו׃ | 5 |
५खरोखर, “दुष्ट मनुष्याचा प्रकाश नाहीसा होईल. त्याचा अग्नी पेटणे बंद होईल.
אור חשך באהלו ונרו עליו ידעך׃ | 6 |
६त्यांच्या घरातला प्रकाश अंधकारमय होईल. त्यांच्या जवळचा दिवा विझेल.
יצרו צעדי אונו ותשליכהו עצתו׃ | 7 |
७त्याची पाऊले पुन्हा दमदारपणे व भरभर पडणार नाहीत. तो हळुहळु चालेल आणि अशक्त बनेल. त्याच्या दुष्ट मसलती त्याचा अध: पात करतील.
כי שלח ברשת ברגליו ועל שבכה יתהלך׃ | 8 |
८त्याचेच पाय त्यास सापळ्यात अडकवतील. तो खडकाळ मार्गाने चालला आहे.
יאחז בעקב פח יחזק עליו צמים׃ | 9 |
९सापळा त्याची टाच पकडेल. त्यास घटृ पकडून ठेवेल.
טמון בארץ חבלו ומלכדתו עלי נתיב׃ | 10 |
१०जमिनीवरची दोरी त्यास जाळ्यात अडकवेल. सापळा त्याची त्याच्या मार्गातच वाट बघत असेल.
סביב בעתהו בלהות והפיצהו לרגליו׃ | 11 |
११दहशत चोहोबाजूंनी त्याची वाट पाहत आहे. भीती त्याच्या प्रत्येक पावलावर पाठलाग करीत आहे.
יהי רעב אנו ואיד נכון לצלעו׃ | 12 |
१२वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत. विध्वंस आणि अरिष्ट तो पडण्याचीच वाट पाहत आहेत.
יאכל בדי עורו יאכל בדיו בכור מות׃ | 13 |
१३भयानक रोग त्याचे अवयव तोडून खाईल. खरोखर, मृत्यूचा जेष्ठ पुत्र त्याचा नाश करील.
ינתק מאהלו מבטחו ותצעדהו למלך בלהות׃ | 14 |
१४त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल. त्यास भयाच्या राजापुढे हजर करण्यासाठी दूर नेले जाईल.
תשכון באהלו מבלי לו יזרה על נוהו גפרית׃ | 15 |
१५जे त्याचे नव्हते ते त्याच्या डेऱ्यात वास करतील त्याच्या घरात सर्वत्र जळते गंधक विखरतील.
מתחת שרשיו יבשו וממעל ימל קצירו׃ | 16 |
१६त्याची खालची मुळे सुकून जातील आणि वरच्या फांद्या मरतील.
זכרו אבד מני ארץ ולא שם לו על פני חוץ׃ | 17 |
१७पृथ्वीवरील लोकांस त्याची आठवण राहणार नाही. आता त्याचे नाव रसत्यावर पण कोणी घेत नाही.
יהדפהו מאור אל חשך ומתבל ינדהו׃ | 18 |
१८लोक त्यास प्रकाशापासून दूर अंधारात ढकलतील. आणि त्याना या जगातून पळवून लावतील.
לא נין לו ולא נכד בעמו ואין שריד במגוריו׃ | 19 |
१९त्यास मुले आणि नातवंडे असणार नाहीत. तो जेथे राहतो तिथे कोणी उरणार नाही.
על יומו נשמו אחרנים וקדמנים אחזו שער׃ | 20 |
२०पश्चिमेकडचे लोक जेव्हा या दुष्ट मनुष्याचे काय झाले ते ऐकतील तेव्हा त्यांना धक्का बसेल. आणि पूर्वेकडचे लोक भयाने कंपित होतील.
אך אלה משכנות עול וזה מקום לא ידע אל׃ | 21 |
२१दुष्ट मनुष्याच्या घराचे खरोखरच असे होईल. जो देवाला ओळखत नाही त्याच्याबाबतीत असेच घडेल.”