< איוב 15 >
ויען אליפז התימני ויאמר׃ | 1 |
१नंतर अलीफज तेमानीने उत्तर दिले आणि म्हणाला,
החכם יענה דעת רוח וימלא קדים בטנו׃ | 2 |
२“शहाणा मनुष्य, वायफळ शहाणपणाचे उत्तर देणार काय, आणि पूर्वे कडील वाऱ्याने स्वतःला भरेल का?
הוכח בדבר לא יסכון ומלים לא יועיל בם׃ | 3 |
३तो ज्यात काही लाभ नाही अशा निरुपयोगी कारणास्तव बोलेल काय किंवा जे सांगण्यास योग्य नाही असा उपदेश करेल काय?
אף אתה תפר יראה ותגרע שיחה לפני אל׃ | 4 |
४खरोखर, तू देवाचा आदर करणे सोडले आहेस, त्याच्या भक्तीत तू खीळ घालत आहेस.
כי יאלף עונך פיך ותבחר לשון ערומים׃ | 5 |
५तुझे पाप तुझ्या मुखाला बोलण्यास शिकविते, तू तुझ्यासाठी अधर्माची जीभ निवडली आहे.
ירשיעך פיך ולא אני ושפתיך יענו בך׃ | 6 |
६मी नव्हे, तुझेच स्वमुख तुला दोषी मानत आहे. खरोखर, तुझे स्वत: चेच ओठ तुझ्याविरुध्द साक्ष देतात
הראישון אדם תולד ולפני גבעות חוללת׃ | 7 |
७तूच प्रथम मनुष्य असा जन्माला आलास काय? टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?
הבסוד אלוה תשמע ותגרע אליך חכמה׃ | 8 |
८तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का? केवळ तूच एक शहाणा मनुष्य आहेस असे तुला वाटते का?
מה ידעת ולא נדע תבין ולא עמנו הוא׃ | 9 |
९आम्हास समजत नाही असे तुला काय माहीती आहे? आम्हास अवगत नाही असे काय तुला माहीत आहे?
גם שב גם ישיש בנו כביר מאביך ימים׃ | 10 |
१०केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत. होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्यात आहेत.
המעט ממך תנחמות אל ודבר לאט עמך׃ | 11 |
११देवाने केलेले सांत्वन आणि तुजशी केलेली सौम्य भाषण तुला तुच्छ वाटतात काय?
מה יקחך לבך ומה ירזמון עיניך׃ | 12 |
१२तुझे मन तुला का मार्ग भ्रष्ट करीत आहे? तू डोळे का फिरवितोस,
כי תשיב אל אל רוחך והצאת מפיך מלין׃ | 13 |
१३तू असा तुझा आत्त्मा देवाच्या विरुध्द का फिरवतोस आणि तुझ्या तोंडा वाटे असे शब्द का येतात.
מה אנוש כי יזכה וכי יצדק ילוד אשה׃ | 14 |
१४मनुष्य तो काय, जो निष्कलंक असेल? स्त्री पासून जन्मलेला मनुष्य तो निष्पाप कसा असणार?
הן בקדשו לא יאמין ושמים לא זכו בעיניו׃ | 15 |
१५पहा, देवाच्या नजरेत आकाशही स्वच्छ नाही, खरोखर, देव त्याच्या पवित्र जनांचाही विश्वास करत नाही.
אף כי נתעב ונאלח איש שתה כמים עולה׃ | 16 |
१६असा मनुष्य जो अधर्म पाण्यासारख्या पितो, अशुद्ध आणि अप्रामाणिक असा मनुष्य तो काय?
אחוך שמע לי וזה חזיתי ואספרה׃ | 17 |
१७माझे ऐक, मी तुला समजावून सांगतो, मी पाहिलेल्या गोष्टी तुम्हास सांगतो.
אשר חכמים יגידו ולא כחדו מאבותם׃ | 18 |
१८विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या, त्या मी तुला सांगतो. विद्वानाच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगितल्या. त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.
להם לבדם נתנה הארץ ולא עבר זר בתוכם׃ | 19 |
१९ती भूमी त्याच्या पूर्वजांना दिलेली होती, ज्यात एकटेच राहत होते, आणि त्या मधून कोणी परदेशी कधीही जाऊ शकत नव्हते.
כל ימי רשע הוא מתחולל ומספר שנים נצפנו לעריץ׃ | 20 |
२०दुष्ट मनुष्याचे सर्व दिवस वेदनात फिरवले जातात, जुलम्याचे जीवनाची वर्ष यातना भोगण्यासाठीच असतात.
קול פחדים באזניו בשלום שודד יבואנו׃ | 21 |
२१भीतीचा आवाज त्याच्या कानात आहे, जेव्हा तो समृद्धीत असेल, नाश करणारा त्याच्यावर येईल.
לא יאמין שוב מני חשך וצפו הוא אלי חרב׃ | 22 |
२२अंधारातून बाहेर येण्याची तो खात्री करत नाही, त्याच्याकरिता तलवार वाट पाहत आहे.
נדד הוא ללחם איה ידע כי נכון בידו יום חשך׃ | 23 |
२३ते कुठे आहे? असे म्हणत तो भाकरीसाठी इकडे तिकडे भटकतो, अंधकाराचा दिवस हाताशी आहे हे तो जाणतो.
יבעתהו צר ומצוקה תתקפהו כמלך עתיד לכידור׃ | 24 |
२४संकटे आणि दु: ख त्यास भित्रा बनवतात, हाल करण्यासाठी तयार असलेल्या राजा प्रमाणे ते त्याच्या विरूद्ध यश पावतात.
כי נטה אל אל ידו ואל שדי יתגבר׃ | 25 |
२५कारण त्याने देवाच्या विरूद्ध त्याचा हात उगारला आहे, आणि सर्वशक्तिमान देवाच्या विरूद्ध तो गर्वाने वागत आहे.
ירוץ אליו בצואר בעבי גבי מגניו׃ | 26 |
२६हा दुष्ट मनुष्य ताठ मानेन, जड उंच वाटे असलेली ढाल घेऊन देवाकडे धावतो,
כי כסה פניו בחלבו ויעש פימה עלי כסל׃ | 27 |
२७त्याचा चेहरा त्याने आपल्या चारबीने जरी झाकून घेतला आणि आपली चरबी त्याने कंबरेत साठवली,
וישכון ערים נכחדות בתים לא ישבו למו אשר התעתדו לגלים׃ | 28 |
२८आणि उद्वस्त शहरात राहतो, ज्या घरात माणसे राहतात, आणि आत्ता ते मातीचे ढीग होण्यास तयार आहे.
לא יעשר ולא יקום חילו ולא יטה לארץ מנלם׃ | 29 |
२९तरी तो श्रीमंत होणार नाही, त्याची संपती पण टिकणार नाही, त्याची सावली पण त्यास सोडून जाईल.
לא יסור מני חשך ינקתו תיבש שלהבת ויסור ברוח פיו׃ | 30 |
३०त्याची काळोखापासून सुटका नाही, आग्नीने त्याच्या फांद्या सुकतील, देवाच्या मुख श्वासाने तो दूर जाईल.
אל יאמן בשו נתעה כי שוא תהיה תמורתו׃ | 31 |
३१निरुपयोगी गोष्टींवर त्याने विश्वास ठेवून स्वत: चीच फसवणूक करून घेऊ नये. निरउपयोगीता त्याचे बक्षीस होईल.
בלא יומו תמלא וכפתו לא רעננה׃ | 32 |
३२आयुष्य संपण्याच्या आधीच दुष्ट मनुष्य म्हातारा आणि शुष्क झालेला असेल. तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फांदीसारखा असेल.
יחמס כגפן בסרו וישלך כזית נצתו׃ | 33 |
३३न पिकलेले द्राक्ष जसे अकाली गळून पडतात त्या वेलीसारखा तो होईल, जैतून झाडाच्या फुला प्रमाणे त्याची फुले गळतील.
כי עדת חנף גלמוד ואש אכלה אהלי שחד׃ | 34 |
३४अधर्म्याचे घराणे फळ द्रूप होणार नाही लाचलुचूपताचे तंबू आगीत भस्मसात होतात.
הרה עמל וילד און ובטנם תכין מרמה׃ | 35 |
३५ते अपकाराची गर्भधारणा करतात आणि अधर्मास जन्म देतात, त्यांच्या उदरात लबाडीचा गर्भ आहे.”