< אֶל־הָעִבְרִים 1 >
האלהים אשר דבר מקדם פעמים רבות ובפנים שנים אל אבתינו ביד הנביאים דבר אלינו באחרית הימים האלה ביד בנו׃ | 1 |
१देव प्राचीन काळांमध्ये आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे अनेक वेळेस वेगवेगळ्या मार्गांनी बोलला,
אשר נתנו ליורש כל וגם עשה בידו את העולמות׃ (aiōn ) | 2 |
२परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले. (aiōn )
והוא זהר כבודו וצלם ישותו ונושא כל בדבר גבורתו ואחרי עשתו בנפשו טהרת חטאתינו ישב לימין הגדלה במרומים׃ | 3 |
३पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांस त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
ויגדל מאד מן המלאכים כאשר השם אשר נחלו יקר הוא משלהם׃ | 4 |
४तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे वारशाने त्यास मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे.
כי אל מי מן המלאכים אמר מעולם בני אתה אני היום ילדתיך ועוד אני אהיה לו לאב והוא יהיה לי לבן׃ | 5 |
५देवाने कोणत्याही देवदूताला म्हणले नाही कीः “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे?” आणि पुन्हा, ‘मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल?’
ובהביאו את הבכור שנית לעולם אמר והשתחוו לו כל מלאכים אלהים׃ | 6 |
६आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो, “देवाचे सर्व देवदूत त्यास नमन करोत.”
הן על המלאכים הוא אמר עשה מלאכיו רוחות משרתיו אש להט׃ | 7 |
७देवदूताविषयी देव असे म्हणतो, “तो त्याच्या देवदूतांना वायु बनवतो, आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवतो.”
אך על הבן אמר כסאך אלהים עולם ועד שבט מישר שבט מלכותך׃ (aiōn ) | 8 |
८पुत्राविषयी तर तो असे म्हणतोः हे देवा, तुझे राजासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य युगानुयुगीचे आहे आणि “तुझा राजदंड न्यायीपणाचा राजदंड आहे. (aiōn )
אהבת צדק ותשנא רשע על כן משחך אלהים אלהיך שמן ששון מחבריך׃ | 9 |
९नीतिमत्त्व तुला नेहमी प्रिय आहे. अनीतीचा तू द्वेष करतोस. म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला आनंददायी तेलाचा अभिषेक केला आहे.”
ועוד אתה אדני לפנים הארץ יסדת ומעשה ידיך שמים׃ | 10 |
१०आणि हे प्रभू, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे.
המה יאבדו ואתה תעמד וכלם כבגד יבלו׃ | 11 |
११ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील.
כלבוש תחליפם ויחלפו ואתה הוא ושנותיך לא יתמו׃ | 12 |
१२तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील, तू त्यांना कपड्यासारखे बदलशील, पण तू नेहमी सारखाच राहशील, आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत.
ואל מי מן המלאכים אמר מעולם שב לימיני עד אשית איביך הדם לרגליך׃ | 13 |
१३तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही, तुझ्या वैऱ्याला तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.
הלא הם כלם רוחות השרת שלוחים לעזרה בעד העתידים לרשת את הישועה׃ | 14 |
१४सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही?