< מַעֲשֵׂי הַשְּׁלִיחִים 14 >

ויהי באיקניון ויבאו יחדו אל בית כנסת היהודים וידברו שם עד כי האמין המון רב מן היהודים ומן היונים׃ 1
पौल व बर्णबा इकुन्या शहरात गेले, ते तेथील यहूदी सभास्थानात गेले, तेथील लोकांशी ते बोलले, पौल व बर्णबा अशा रीतीने बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला.
אך היהודים אשר לא האמינו עוררו והכעיסו את נפשות הגוים על האחים׃ 2
परंतु काही यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नाही, त्यांनी परराष्ट्रीय लोकांची मने भडकाविली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली.
וישבו שם ימים רבים וילמדו בבטחונם ביהוה העמיד על דבר חסדו בעשותו על ידם אתות ומופתים׃ 3
म्हणून पौल व बर्णबाने त्याठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला आणि परमेश्वराच्या बलाने येशूविषयी धैर्याने सांगत राहीले, पौल व बर्णबाने देवाच्या कृपेविषयी साक्ष दिला, परमेश्वराने त्यांना पौल व बर्णबाला चमत्कार व अद्भूते कृत्ये करण्यास मदत करून ते जे काही सांगत होते ते खरे ठरवले.
ויחלק המון העיר לחצי אלה נטו אחרי היהודים ואלה אחרי השליחים׃ 4
परंतु शहरातील काही लोकांस यहूदी लोकांची मते पटली, दुसऱ्या लोकांस प्रेषित पौल व बर्णबाचे म्हणणे पटले, त्यामुळे शहरात दोन तट पडले.
ויהי רגשת הגוים והיהודים עם ראשיהם להתעלל בהם ולסקלם׃ 5
काही परराष्ट्रीय लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते.
ויודע להם ויברחו לערי לוקוניא אל לוסטרא ודרבי וסביבותן׃ 6
पौल व बर्णबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले, ते लुस्र व दर्बे या लुकवनिया देशाच्या नगरात गेले आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले.
ויבשרו שם הבשורה׃ 7
आणि तेथे त्यांनी सुवार्ता सांगितली.
ואיש נכה רגלים היה בלוסטרא והוא ישב פסח מבטן אמו ולא הלך מימיו׃ 8
लुस्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मतःच पांगळा जन्मला होता व कधीच चालला नव्हता.
וישמע את פולוס מדבר והוא הסתכל בו וירא כי אמונה בו להושע׃ 9
पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता, पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्यास आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून.
ויאמר בקול גדול עמד הכן על רגליך וידלג ויתהלך׃ 10
१०मोठ्याने म्हणाला, “तुझ्या पायांवर नीट उभा राहा!” तेव्हा त्या मनुष्याने उडी मारली आणि चालू लागला.
והמון העם כראותם את אשר עשה פולוס נשאו את קולם ויאמרו בלשון לוקונית ירדו אלינו האלהים בדמות אנשים׃ 11
११पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले, तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले, ते म्हणाल, “देव मनुष्यांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत.”
ויקראו לבר נבא בל ולפולוס קראו הרמיס באשר הוא ראש המדברים׃ 12
१२लोकांनी बर्णबाला ज्यूपितर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता.
וכהן בית בל אשר מחוץ לעירם הביא השערה שורים ועטרות ויחפץ לזבח הוא והמון העם׃ 13
१३ज्यूपितरचे मंदिर जवळ होते, या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशीजवळ आला, पुजारी व लोकांस पौल व बर्णबा यांची उपासाना करण्यासाठी त्यांच्यापुढे बळी द्यावयाचा होता.
ויהי כשמע זאת השליחים פולוס ובר נבא ויקרעו את בגדיהם וירוצו אל תוך העם׃ 14
१४परंतु ते काय करीत आहेत, हे जेव्हा प्रेषित पौल व बर्णबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले.
ויצעקו לאמר אנשים למה תעשו כזאת גם אנחנו בני אדם חלשים כמוכם ונבשרה אתכם למען שוב תשובו מן הבליכם אלה אל אלהים חיים אשר עשה את השמים ואת הארץ ואת הים ואת כל אשר בם׃ 15
१५लोकांनो, या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हास जशा भावना आहेत, तशाच आम्हासही आहेत! आम्ही तुम्हास सुवार्ता सांगायला आलो, आम्ही तुम्हास हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे, खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे, त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले.
ואשר בדרות קדם הניח לכל הגוים ללכת בדרכיהם׃ 16
१६भूतकाळात, देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले.
וגם לא חדל להעיד על עצמו וייטב לנו בתתו מטר מן השמים ועתות שבע וימלא לבותינו מזון וששון׃ 17
१७परंतु देवाने अशा गोष्टी केल्या, की त्याद्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे, तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हास आकाशातून पाऊस देतो, योग्यवेळी तो तुम्हास चांगले पीक देतो, तो तुम्हास भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतःकरणे आनंदाने भरतो.
ואף בדברים האלה כמעט לא עצרו כח לכלוא את העם מזבח להם׃ 18
१८पौल व बर्णबाने या गोष्टी लोकांस सांगितल्या व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत्त केले.
ויבאו שמה יהודים מן אנטיוכיא ומן איקניון ויסיתו את העם וירגמו את פולוס באבנים ויסחבהו חוצה לעיר בחשבם כי מת׃ 19
१९नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले, त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली आणि पौलाला दगडमार केला, त्यामध्ये पौल मरण पावला असे समजून त्यांनी त्यास ओढत नेऊन नगराबाहेर टाकले.
ויסבו אתו התלמידים ויקם ויבא העירה וממחרת יצא אל דרבי הוא ובר נבא׃ 20
२०पण शिष्य पौलाभोवती जमा झाल्यावर पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बे शहरास गेले.
ויבשרו את הבשורה בעיר ההיא ואחרי העמידם תלמידים הרבה שבו אל לוסטרא ואיקניון ואנטיוכיא׃ 21
२१आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांस शिष्य केले, त्यानंतर ते लुस्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले.
ויחזקו את נפשות התלמידים ויזהירו אתם לעמד באמונה וכי רק בצרות רבות בוא נבוא אל מלכות האלהים׃ 22
२२आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले, त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ रहावे म्हणून उत्तेजन दिले, ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”
ויבחרו להם זקנים בכל קהלה וקהלה ויתפללו ויצומו ויפקידום ביד האדון אשר האמינו בו׃ 23
२३पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली, त्यांनी या वडिलांसाठी उपवास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले.
ויעברו בפיסדיא ויבאו אל פמפוליא׃ 24
२४पौल आणि बर्णबा पिसिदिया प्रदेशातून गेले नंतर ते पंफुलिया येथे आले.
וישמיעו את דבר יהוה בפרגי וירדו אל אטליא׃ 25
२५त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तलिया शहरात गेले.
ומשם באו באניה אל אנטיוכיא אשר נמסרו שם לחסד אלהים על המלאכה אשר מלאו אתה׃ 26
२६नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया प्रांतातील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले, जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने अंत्युखियापासूनच केली होती.
ובבאם שמה הקהילו את העדה ויגידו את כל אשר עשה אתם האלהים ואת אשר פתח לגוים פתח האמונה׃ 27
२७ते जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलावले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या तसेच दुसऱ्या देशातील परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाने विश्वासाचे द्वार कसे उघडले ते सांगितले.
וישבו שם עם התלמידים ימים לא מעטים׃ 28
२८नंतर ते विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.

< מַעֲשֵׂי הַשְּׁלִיחִים 14 >