< דברי הימים ב 30 >
וישלח יחזקיהו על כל ישראל ויהודה וגם אגרות כתב על אפרים ומנשה לבוא לבית יהוה בירושלם לעשות פסח ליהוה אלהי ישראל׃ | 1 |
१हिज्कीयाने इस्राएल आणि यहूदामधील सर्व लोकांस निरोप पाठवले; तसेच एफ्राइम आणि मनश्शेच्या लोकांस पत्रे लिहिली. इस्राएलाचा परमेश्वर देव यांच्याप्रीत्यर्थ वल्हांडणाचा सण साजरा करायला यरूशलेमातील परमेश्वराच्या मंदिरात यावे असे त्याने त्या निरोप पत्रांद्वारे कळवले.
ויועץ המלך ושריו וכל הקהל בירושלם לעשות הפסח בחדש השני׃ | 2 |
२यरूशलेम येथील मंडळी आणि सर्व सरदार यांच्याशी विचार विनिमय करून राजा हिज्कीयाने वल्हांडणाचा सण दुसऱ्या महिन्यात साजरा करायचे ठरवले.
כי לא יכלו לעשתו בעת ההיא כי הכהנים לא התקדשו למדי והעם לא נאספו לירושלם׃ | 3 |
३सणासाठी पुरेशा याजकांचे पवित्रीकरण झाले नव्हते तसेच यरूशलेमामध्ये सगळे लोक जमले नव्हते म्हणून नेहमीच्या वेळेला हा सण साजरा करता येणे शक्य नव्हते.
ויישר הדבר בעיני המלך ובעיני כל הקהל׃ | 4 |
४तेव्हा राजासह सर्व मंडळींना ही गोष्ट पसंत पडली.
ויעמידו דבר להעביר קול בכל ישראל מבאר שבע ועד דן לבוא לעשות פסח ליהוה אלהי ישראל בירושלם כי לא לרב עשו ככתוב׃ | 5 |
५बैर-शेबापासून दान पर्यंत इस्राएलभर त्यांनी दवंडी पिटली कि परमेश्वर देव ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडणासाठी यरूशलेमेला यायला सर्व लोकांस आवाहन करण्यात आले. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या पारंपारिक पध्दतीने बहुसंख्य लोकांनी फार वर्षात हा सण साजरा केला नव्हता.
וילכו הרצים באגרות מיד המלך ושריו בכל ישראל ויהודה וכמצות המלך לאמר בני ישראל שובו אל יהוה אלהי אברהם יצחק וישראל וישב אל הפליטה הנשארת לכם מכף מלכי אשור׃ | 6 |
६त्यामुळे निरोप्यांनी राजाचा संदेश इस्राएल आणि यहूदाभर फिरवला. त्याचा मसुदा असा होता: “इस्राएल लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल (याकोब) यांच्या परमेश्वर देवाकडे परत फिरा. म्हणजे अश्शूर राजांच्या तावडीतून सुटून जे सुखरुप राहिले आहेत त्यांना परमेश्वर जवळ करील.
ואל תהיו כאבותיכם וכאחיכם אשר מעלו ביהוה אלהי אבותיהם ויתנם לשמה כאשר אתם ראים׃ | 7 |
७आपले पिता किंवा भाऊबंद यांचे अनुकरण करु नका. परमेश्वर त्यांचा देव होता, पण त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तेव्हा त्यांच्याविषयी परमेश्वराने इतरांच्या मनात घृणा निर्माण केली व त्यांना निंदेला प्रवृत्त केले. त्यामुळे झालेली दुर्दशा तुम्ही पाहिली आहेच.
עתה אל תקשו ערפכם כאבותיכם תנו יד ליהוה ובאו למקדשו אשר הקדיש לעולם ועבדו את יהוה אלהיכם וישב מכם חרון אפו׃ | 8 |
८आपल्या पूर्वजांसारखे ताठर बनू नका. मनोभावे परमेश्वरास शरण जा मंदिराच्या पवित्र गाभाऱ्याकडे या. परमेश्वराने ते पवित्रस्थान कायमचे पवित्र केले आहे. परमेश्वर देवाची सेवा करा. तरच परमेश्वराचा तुमच्यावर भडकलेला कोप शांत होईल.
כי בשובכם על יהוה אחיכם ובניכם לרחמים לפני שוביהם ולשוב לארץ הזאת כי חנון ורחום יהוה אלהיכם ולא יסיר פנים מכם אם תשובו אליו׃ | 9 |
९तुम्ही परमेश्वराकडे परत फिरलात तर ज्याने तुमच्या भाऊबंदांना आणि लेकरांना कैद करून नेले त्यांना दयेचा पाझर फुटेल आणि तुमचे भाऊबंद आणि लेकरे आपल्याकडे परत येतील. परमेश्वर तुमचा देव दयाळू आणि कृपाळू आहे. त्याच्या आसऱ्याला गेलात तर तो तुमचा धिक्कार करणार नाही.”
ויהיו הרצים עברים מעיר לעיר בארץ אפרים ומנשה ועד זבלון ויהיו משחיקים עליהם ומלעגים בם׃ | 10 |
१०एफ्राइम आणि मनश्शेच्या प्रदेशात निरोपे गावोगाव फिरले. ते पार जबुलून पर्यंत गेले. पण लोकांनी मात्र उपहासाने वागून त्यांची हेटाळणी केली.
אך אנשים מאשר ומנשה ומזבלון נכנעו ויבאו לירושלם׃ | 11 |
११आशेर, मनश्शे आणि जबुलून मधल्या काहींनी मात्र असे न करता विनम्रतेने यरूशलेमेला प्रयाण केले.
גם ביהודה היתה יד האלהים לתת להם לב אחד לעשות מצות המלך והשרים בדבר יהוה׃ | 12 |
१२पुढे परमेश्वराच्या कृपेनेच असे घडून आले की राजा हिज्कीया आणि त्याचे सरदार यांच्या आज्ञेप्रमाणे वागायला यहूदाचे लोक तयार झाले. अशा रीतीने त्यांनी देवाचा शब्द पाळला.
ויאספו ירושלם עם רב לעשות את חג המצות בחדש השני קהל לרב מאד׃ | 13 |
१३दुसऱ्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने यरूशलेमेत जमले. तो एक विशाल समुदाय होता.
ויקמו ויסירו את המזבחות אשר בירושלם ואת כל המקטרות הסירו וישליכו לנחל קדרון׃ | 14 |
१४यरूशलेम मधल्या खोट्या नाट्या दैवतांसाठी उभारलेल्या वेद्या तसेच धूप जाळायच्या वेद्या या लोकांनी उखडून टाकल्या आणि किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकून दिल्या.
וישחטו הפסח בארבעה עשר לחדש השני והכהנים והלוים נכלמו ויתקדשו ויביאו עלות בית יהוה׃ | 15 |
१५दुसऱ्या माहिन्याच्या चौदाव्या दिवशी त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचा बली दिला. याजक आणि लेवी यांनी तेव्हा लज्जित होऊन स्वत: ला पवित्र केले आणि होमबली परमेश्वराच्या मंदिरात आणले.
ויעמדו על עמדם כמשפטם כתורת משה איש האלהים הכהנים זרקים את הדם מיד הלוים׃ | 16 |
१६देवाचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते आपापल्या जागी स्थानापन्न झाले. याजकांनी लेवीच्या हातून रक्त घेऊन ते वेदीवर शिंपडले.
כי רבת בקהל אשר לא התקדשו והלוים על שחיטת הפסחים לכל לא טהור להקדיש ליהוה׃ | 17 |
१७येथे जमलेल्या पुष्कळशा लोकांनी स्वत: चे शुद्धीकरण केलेले नव्हते त्यामुळे वल्हांडणाचे यज्ञपशू मारायचा त्यांना अधिकार नव्हता. अशांसाठी ते काम लेवींनाच करावे लागत होते. लेवींनी सर्व यज्ञपशूंचे परमेश्वराकरता शुद्धीकरण केले.
כי מרבית העם רבת מאפרים ומנשה יששכר וזבלון לא הטהרו כי אכלו את הפסח בלא ככתוב כי התפלל יחזקיהו עליהם לאמר יהוה הטוב יכפר בעד׃ | 18 |
१८एफ्राइम, मनश्शे, इस्साखार आणि जबुलून इथून आलेल्या बऱ्याच लोकांनी वल्हांडणासाठी योग्य तऱ्हेने स्वत: चे शुद्धीकरण केलेले नव्हते. ही पध्दत मोशेच्या नियमशास्त्राला सोडून होती. पण हिज्कीयाने त्यांच्या वतीने प्रार्थना केली.
כל לבבו הכין לדרוש האלהים יהוה אלהי אבותיו ולא כטהרת הקדש׃ | 19 |
१९तो म्हणाला, “परमेश्वर देवा, तू भला आहेस. तुझी आराधना योग्य तऱ्हेने व्हावी असे या लोकांस मनापासून वाटते. पण धर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी शुद्धीकरण केलेले नाही. त्यांना क्षमा कर. आमच्या पूर्वजांपासूनचा तूच आमचा देव आहेस. अत्यंत पवित्रस्थानाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यापैकी कोणी पवित्र झालेले नसले तरी तू त्यांना क्षमा कर.”
וישמע יהוה אל יחזקיהו וירפא את העם׃ | 20 |
२०राजा हिज्कीयाने केलेली प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि लोकांस क्षमा केली.
ויעשו בני ישראל הנמצאים בירושלם את חג המצות שבעת ימים בשמחה גדולה ומהללים ליהוה יום ביום הלוים והכהנים בכלי עז ליהוה׃ | 21 |
२१इस्राएलाच्या प्रजेने यरूशलेमामध्ये बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला. लोक आनंदात होते. लेवी आणि याजक यांनी रोज मन: पूर्वक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाईली.
וידבר יחזקיהו על לב כל הלוים המשכילים שכל טוב ליהוה ויאכלו את המועד שבעת הימים מזבחים זבחי שלמים ומתודים ליהוה אלהי אבותיהם׃ | 22 |
२२परमेश्वराची सेवा कशी करावी याचे उत्तम ज्ञान असलेल्या लेवींना राजा हिज्कीया उत्तेजन देत होता. सणाचे सात दिवस आनंदात घालवत लोकांनी शांत्यर्पणे वाहिली आणि आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवासमोर पापाची कबूली दिली.
ויועצו כל הקהל לעשות שבעת ימים אחרים ויעשו שבעת ימים שמחה׃ | 23 |
२३वल्हांडणाचा सण आणखी सात दिवस साजरा करावा असे सर्वानुमते ठरले. त्याप्रमाणे त्यांनी आनंदाने साजरा केला.
כי חזקיהו מלך יהודה הרים לקהל אלף פרים ושבעת אלפים צאן והשרים הרימו לקהל פרים אלף וצאן עשרת אלפים ויתקדשו כהנים לרב׃ | 24 |
२४यहूदाचा राजा हिज्कीयाने एक हजार बैल आणि सात हजार मेंढरे व पुढाऱ्यांनी एक हजार बैल व दहा हजार मेंढरे या समुदायाला दिली. त्यासाठी बऱ्याच याजकांना पवित्र व्हावे लागले.
וישמחו כל קהל יהודה והכהנים והלוים וכל הקהל הבאים מישראל והגרים הבאים מארץ ישראל והיושבים ביהודה׃ | 25 |
२५यहूदातील सर्व लोक, याजकवर्ग, लेवी, इस्राएलमधील समुदाय तसेच इस्राएलातून यहूदात आलेले विदेशी प्रवासी हे सर्वजण अतिशय खुशीत होते.
ותהי שמחה גדולה בירושלם כי מימי שלמה בן דויד מלך ישראל לא כזאת בירושלם׃ | 26 |
२६यरूशलेमामध्ये आनंद पसरला होता. इस्राएलचा राजा दावीद याचा पुत्र शलमोन याच्या कारकिर्दीनंतर आजतागायत असा आनंदाचा प्रसंग कधी घडलाच नव्हता.
ויקמו הכהנים הלוים ויברכו את העם וישמע בקולם ותבוא תפלתם למעון קדשו לשמים׃ | 27 |
२७याजक व लेवी यांनी उठून लोकांस आशीर्वाद देण्याची परमेश्वरास प्रार्थना केली. परमेश्वराने त्यांचे ऐकले. त्यांची प्रार्थना स्वर्गातील आपल्या पवित्र स्थानी परमेश्वरास ऐकू गेली.