< תְהִלִּים 105 >
הוֹד֣וּ לַ֭יהוָה קִרְא֣וּ בִּשְׁמ֑וֹ הוֹדִ֥יעוּ בָ֝עַמִּ֗ים עֲלִילוֹתָֽיו׃ | 1 |
१परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या.
שִֽׁירוּ־ל֭וֹ זַמְּרוּ־ל֑וֹ שִׂ֝֗יחוּ בְּכָל־נִפְלְאוֹתָֽיו ׃ | 2 |
२त्यास गाणे गा, त्याची स्तुतीगीते गा; त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला;
הִֽ֭תְהַלְלוּ בְּשֵׁ֣ם קָדְשׁ֑וֹ יִ֝שְׂמַ֗ח לֵ֤ב ׀ מְבַקְשֵׁ֬י יְהוָֽה׃ | 3 |
३त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे हृदय आनंदित होवो.
דִּרְשׁ֣וּ יְהוָ֣ה וְעֻזּ֑וֹ בַּקְּשׁ֖וּ פָנָ֣יו תָּמִֽיד׃ | 4 |
४परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध घ्या. त्याच्या सान्निध्याचा सतत शोध घ्या.
זִכְר֗וּ נִפְלְאוֹתָ֥יו אֲשֶׁר־עָשָׂ֑ה מֹ֝פְתָ֗יו וּמִשְׁפְּטֵי־פִֽיו ׃ | 5 |
५त्याने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी, त्याचे चमत्कार, आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.
זֶ֭רַע אַבְרָהָ֣ם עַבְדּ֑וֹ בְּנֵ֖י יַעֲקֹ֣ב בְּחִירָֽיו׃ | 6 |
६तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशजहो, तुम्ही त्याचे निवडलेले याकोबाचे लोकहो,
ה֭וּא יְהוָ֣ה אֱלֹהֵ֑ינוּ בְּכָל־הָ֝אָ֗רֶץ מִשְׁפָּטָֽיו׃ | 7 |
७तो परमेश्वर आपला देव आहे. त्याचे सर्व निर्णय पृथ्वीवर आहेत.
זָכַ֣ר לְעוֹלָ֣ם בְּרִית֑וֹ דָּבָ֥ר צִ֝וָּ֗ה לְאֶ֣לֶף דּֽוֹר׃ | 8 |
८तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो.
אֲשֶׁ֣ר כָּ֭רַת אֶת־אַבְרָהָ֑ם וּשְׁב֖וּעָת֣וֹ לְיִשְׂחָֽק׃ | 9 |
९त्याने हा करार अब्राहामाबरोबर केला. आणि त्याने इसहाकाशी शपथ वाहिली याची आठवण केली.
וַיַּֽעֲמִידֶ֣הָ לְיַעֲקֹ֣ב לְחֹ֑ק לְ֝יִשְׂרָאֵ֗ל בְּרִ֣ית עוֹלָֽם׃ | 10 |
१०ही त्याने याकोबासाठी नियम, आणि इस्राएलासाठी सर्वकाळासाठी करार असा कायम केला.
לֵאמֹ֗ר לְךָ֗ אֶתֵּ֥ן אֶת־אֶֽרֶץ־כְּנָ֑עַן חֶ֝֗בֶל נַחֲלַתְכֶֽם׃ | 11 |
११तो म्हणाला, “मी तुला कनान देश तुझा वतनभाग असा म्हणून देईन.”
בִּֽ֭הְיוֹתָם מְתֵ֣י מִסְפָּ֑ר כִּ֝מְעַ֗ט וְגָרִ֥ים בָּֽהּ׃ | 12 |
१२हे तो त्यांना म्हणाला तेव्हा ते संख्येने केवळ थोडके होते, होय फार थोडे, आणि देशात परके होते.
וַֽ֭יִּתְהַלְּכוּ מִגּ֣וֹי אֶל־גּ֑וֹי מִ֝מַּמְלָכָ֗ה אֶל־עַ֥ם אַחֵֽר׃ | 13 |
१३ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, आणि एका राज्यातून दुसऱ्यात गेले.
לֹֽא־הִנִּ֣יחַ אָדָ֣ם לְעָשְׁקָ֑ם וַיּ֖וֹכַח עֲלֵיהֶ֣ם מְלָכִֽים׃ | 14 |
१४त्याने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्यासाठी त्याने राजाला शिक्षा दिली.
אַֽל־תִּגְּע֥וּ בִמְשִׁיחָ֑י וְ֝לִנְבִיאַי אַל־תָּרֵֽעוּ׃ | 15 |
१५तो म्हणाला, माझ्या अभिषिक्ताला स्पर्श करू नका, आणि माझ्या संदेष्ट्यांची हानी करू नका.
וַיִּקְרָ֣א רָ֭עָב עַל־הָאָ֑רֶץ כָּֽל־מַטֵּה־לֶ֥חֶם שָׁבָֽר׃ | 16 |
१६त्याने त्या देशात दुष्काळ आणला. त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला.
שָׁלַ֣ח לִפְנֵיהֶ֣ם אִ֑ישׁ לְ֝עֶ֗בֶד נִמְכַּ֥ר יוֹסֵֽף׃ | 17 |
१७त्याने त्यांच्यापुढे एक मनुष्य पाठवला; योसेफ गुलाम म्हणून विकला गेला.
עִנּ֣וּ בַכֶּ֣בֶל רגליו בַּ֝רְזֶ֗ל בָּ֣אָה נַפְשֽׁוֹ׃ | 18 |
१८त्यांचे पाय बेड्यांनी बांधले होते; त्यास लोखंडी साखळ्या घातल्या होत्या.
עַד־עֵ֥ת בֹּֽא־דְבָר֑וֹ אִמְרַ֖ת יְהוָ֣ה צְרָפָֽתְהוּ׃ | 19 |
१९त्याचे भाकीत खरे होण्याच्या वेळेपर्यंत, परमेश्वराच्या वचनाने त्यास योग्य असे सिद्ध केले.
שָׁ֣לַח מֶ֭לֶךְ וַיַּתִּירֵ֑הוּ מֹשֵׁ֥ל עַ֝מִּ֗ים וַֽיְפַתְּחֵֽהוּ׃ | 20 |
२०तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले; लोकांच्या अधिपतीने त्यांना सोडून दिले.
שָׂמ֣וֹ אָד֣וֹן לְבֵית֑וֹ וּ֝מֹשֵׁ֗ל בְּכָל־קִנְיָנֽוֹ׃ | 21 |
२१त्याने त्यास आपल्या घराचा मुख्य, आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेमले,
לֶאְסֹ֣ר שָׂרָ֣יו בְּנַפְשׁ֑וֹ וּזְקֵנָ֥יו יְחַכֵּֽם׃ | 22 |
२२अशासाठी की, त्याने आपल्या अधिपतींना नियंत्रणात ठेवावे, आणि आपल्या वडिलांस ज्ञान शिकवावे.
וַיָּבֹ֣א יִשְׂרָאֵ֣ל מִצְרָ֑יִם וְ֝יַעֲקֹ֗ב גָּ֣ר בְּאֶֽרֶץ־חָֽם׃ | 23 |
२३नंतर इस्राएल मिसरात आले, आणि याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला.
וַיֶּ֣פֶר אֶת־עַמּ֣וֹ מְאֹ֑ד וַ֝יַּֽעֲצִמֵהוּ מִצָּרָֽיו׃ | 24 |
२४देवाने आपले लोक फारच वाढवले, आणि त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना अधिक असंख्य केले.
הָפַ֣ךְ לִ֭בָּם לִשְׂנֹ֣א עַמּ֑וֹ לְ֝הִתְנַכֵּ֗ל בַּעֲבָדָֽיו׃ | 25 |
२५आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा, आपल्या सेवकांशी निष्ठूरतेने वागावे म्हणून त्याने शत्रूचे मन वळवले.
שָׁ֭לַח מֹשֶׁ֣ה עַבְדּ֑וֹ אַ֝הֲרֹ֗ן אֲשֶׁ֣ר בָּֽחַר־בּֽוֹ׃ | 26 |
२६त्याने आपला सेवक मोशे आणि आपण निवडलेला अहरोन यांना पाठविले.
שָֽׂמוּ־בָ֭ם דִּבְרֵ֣י אֹתוֹתָ֑יו וּ֝מֹפְתִ֗ים בְּאֶ֣רֶץ חָֽם׃ | 27 |
२७त्यांनी मिसरच्या देशात त्यांच्यामध्ये अनेक चिन्हे, हामाच्या देशात त्याचे आश्चर्ये करून दाखवली.
שָׁ֣לַֽח חֹ֭שֶׁךְ וַיַּחְשִׁ֑ךְ וְלֹֽא־מָ֝ר֗וּ אֶת־דברוו ׃ | 28 |
२८त्याने त्या देशात काळोख केला, पण त्या लोकांनी त्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही.
הָפַ֣ךְ אֶת־מֵימֵיהֶ֣ם לְדָ֑ם וַ֝יָּ֗מֶת אֶת־דְּגָתָֽם׃ | 29 |
२९त्याने त्यांचे पाणी पालटून रक्त केले आणि त्यांचे मासे मरण पावले.
שָׁרַ֣ץ אַרְצָ֣ם צְפַרְדְּעִ֑ים בְּ֝חַדְרֵ֗י מַלְכֵיהֶֽם׃ | 30 |
३०त्यांचा देश बेडकांनी भरून गेला, त्यांच्या अधिपतींच्या खोलीत देखील बेडूक होते.
אָ֭מַר וַיָּבֹ֣א עָרֹ֑ב כִּ֝נִּ֗ים בְּכָל־גְּבוּלָֽם׃ | 31 |
३१तो बोलला, आणि गोमाशा व उवा त्यांच्या सर्व प्रदेशात झाल्या.
נָתַ֣ן גִּשְׁמֵיהֶ֣ם בָּרָ֑ד אֵ֖שׁ לֶהָב֣וֹת בְּאַרְצָֽם׃ | 32 |
३२त्याने त्यांच्या देशात विजा आणि मेघांचा गडगडाटाने गारांचा वर्षाव व पाऊस पाठवला.
וַיַּ֣ךְ גַּ֭פְנָם וּתְאֵנָתָ֑ם וַ֝יְשַׁבֵּ֗ר עֵ֣ץ גְּבוּלָֽם׃ | 33 |
३३त्याने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे यांचा नाश केला. त्याने त्यांच्या देशातले झाडे मोडून टाकली.
אָ֭מַר וַיָּבֹ֣א אַרְבֶּ֑ה וְ֝יֶ֗לֶק וְאֵ֣ין מִסְפָּֽר׃ | 34 |
३४तो बोलला आणि टोळ आले. असंख्य नाकतोडे आले.
וַיֹּ֣אכַל כָּל־עֵ֣שֶׂב בְּאַרְצָ֑ם וַ֝יֹּ֗אכַל פְּרִ֣י אַדְמָתָֽם׃ | 35 |
३५टोळांनी त्यांच्या देशातली सर्व हिरवळ, त्यांच्या भूमीचे सर्व पिके खाल्ले;
וַיַּ֣ךְ כָּל־בְּכ֣וֹר בְּאַרְצָ֑ם רֵ֝אשִׁ֗ית לְכָל־אוֹנָֽם׃ | 36 |
३६त्याने त्यांच्या देशातले प्रत्येक प्रथम जन्मलेले, त्यांच्या सामर्थ्याचे सर्व प्रथमफळ ठार मारले.
וַֽ֭יּוֹצִיאֵם בְּכֶ֣סֶף וְזָהָ֑ב וְאֵ֖ין בִּשְׁבָטָ֣יו כּוֹשֵֽׁל׃ | 37 |
३७त्याने इस्राएलांना सोने आणि रुपे घेऊन बाहेर आणले; त्यांच्या मार्गात कोणताही वंश अडखळला नाही.
שָׂמַ֣ח מִצְרַ֣יִם בְּצֵאתָ֑ם כִּֽי־נָפַ֖ל פַּחְדָּ֣ם עֲלֵיהֶֽם׃ | 38 |
३८ते निघून गेल्याने मिसराला आनंद झाला, कारण मिसऱ्यांना त्यांची भिती वाटत होती.
פָּרַ֣שׂ עָנָ֣ן לְמָסָ֑ךְ וְ֝אֵ֗שׁ לְהָאִ֥יר לָֽיְלָה׃ | 39 |
३९त्याने आच्छादनासाठी ढग पसरला, आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्नी दिला.
שָׁאַ֣ל וַיָּבֵ֣א שְׂלָ֑ו וְלֶ֥חֶם שָׁ֝מַ֗יִם יַשְׂבִּיעֵֽם׃ | 40 |
४०इस्राएलांनी अन्नाची मागणी केली आणि त्याने लावे पक्षी आणले, आणि त्यांना स्वर्गातून भाकर देऊन तृप्त केले.
פָּ֣תַח צ֭וּר וַיָּז֣וּבוּ מָ֑יִם הָ֝לְכ֗וּ בַּצִּיּ֥וֹת נָהָֽר׃ | 41 |
४१त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले; ते नदीप्रमाणे वाळवटांत वाहू लागले.
כִּֽי־זָ֭כַר אֶת־דְּבַ֣ר קָדְשׁ֑וֹ אֶֽת־אַבְרָהָ֥ם עַבְדּֽוֹ׃ | 42 |
४२कारण त्यास आपल्या पवित्र वचनाची, आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती.
וַיּוֹצִ֣א עַמּ֣וֹ בְשָׂשׂ֑וֹן בְּ֝רִנָּ֗ה אֶת־בְּחִירָֽיו׃ | 43 |
४३त्याने आपल्या लोकांस आनंद करीत, त्याच्या निवडलेल्यांना विजयोत्सव करीत बाहेर आणले.
וַיִּתֵּ֣ן לָ֭הֶם אַרְצ֣וֹת גּוֹיִ֑ם וַעֲמַ֖ל לְאֻמִּ֣ים יִירָֽשׁוּ׃ | 44 |
४४त्याने त्यांना राष्ट्रांचे देश दिले; त्यांनी लोकांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या.
בַּעֲב֤וּר ׀ יִשְׁמְר֣וּ חֻ֭קָּיו וְתוֹרֹתָ֥יו יִנְצֹ֗רוּ הַֽלְלוּ־יָֽהּ׃ | 45 |
४५ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम आणि आपले नियमशास्त्र पाळावे. परमेश्वराची स्तुती करा.