< אִיּוֹב 23 >

וַיַּ֥עַן אִיּ֗וֹב וַיֹּאמַֽר׃ 1
नंतर ईयोबने उत्तर दिले व तो म्हणाला,
גַּם־הַ֭יּוֹם מְרִ֣י שִׂחִ֑י יָ֝דִ֗י כָּבְדָ֥ה עַל־אַנְחָתִֽי׃ 2
“तरीही मी आज कडवटपणे तक्रार करीन? कारण माझा त्रास माझ्या विलापाहून भारी आहे.
מִֽי־יִתֵּ֣ן יָ֭דַעְתִּי וְאֶמְצָאֵ֑הוּ אָ֝ב֗וֹא עַד־תְּכוּנָתֽוֹ׃ 3
देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असते तर मी त्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहचलो असतो
אֶעֶרְכָ֣ה לְפָנָ֣יו מִשְׁפָּ֑ט וּ֝פִ֗י אֲמַלֵּ֥א תוֹכָחֽוֹת׃ 4
मी देवाला माझी फिर्याद सांगितली असती. माझ्या मुखाने सतत वाद घातला असता.
אֵ֭דְעָה מִלִּ֣ים יַעֲנֵ֑נִי וְ֝אָבִ֗ינָה מַה־יֹּ֥אמַר לִֽי׃ 5
त्याने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते. तो मला काय म्हणाला ते मी लक्षात घेतले असते.
הַבְּרָב־כֹּ֭חַ יָרִ֣יב עִמָּדִ֑י לֹ֥א אַךְ־ה֝֗וּא יָשִׂ֥ם בִּֽי׃ 6
त्याच्या महान सामर्थ्याने त्याने माझ्याविरुध्द वाद केला असता का? नाही; तर त्याने माझ्याकडे लक्ष दिले असते.
שָׁ֗ם יָ֭שָׁר נוֹכָ֣ח עִמּ֑וֹ וַאֲפַלְּטָ֥ה לָ֝נֶ֗צַח מִשֹּׁפְטִֽי׃ 7
तेथे सरळ मनुष्यांनी त्याच्याशी वाद केला असता. म्हणजे मी माझ्या न्यायाधीशापासुन सुटलो असतो.
הֵ֤ן קֶ֣דֶם אֶהֱלֹ֣ךְ וְאֵינֶ֑נּוּ וְ֝אָח֗וֹר וְֽלֹא־אָבִ֥ין לֽוֹ׃ 8
पाहा, मी पूर्वेकडे गेलो, पण तो तीथे नव्हता, मी पश्चिमेकडे गेलो, पण मी त्यास पाहीले नाही.
שְׂמֹ֣אול בַּעֲשֹׂת֣וֹ וְלֹא־אָ֑חַז יַעְטֹ֥ף יָ֝מִ֗ין וְלֹ֣א אֶרְאֶֽה׃ 9
उत्तरेकडे तो कार्य करीत असला, तरी मला तो दिसू शकत नाही. आणि दक्षिणेकडेही, जेथे तो स्वतःस लपवितो त्यामुळे तेथेही तो मला दिसत नाही.
כִּֽי־יָ֭דַע דֶּ֣רֶךְ עִמָּדִ֑י בְּ֝חָנַ֗נִי כַּזָּהָ֥ב אֵצֵֽא׃ 10
१०परंतु माझा मार्ग त्यास कळाला आहे, जेव्हा तो माझी परीक्षा घेतो, तेव्हा मी सोन्यासारखा असेन.
בַּ֭אֲשֻׁרוֹ אָחֲזָ֣ה רַגְלִ֑י דַּרְכּ֖וֹ שָׁמַ֣רְתִּי וְלֹא־אָֽט׃ 11
११त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत, मी त्याचा मार्ग धरला आहे व त्यापासून वळालो नाही.
מִצְוַ֣ת שְׂ֭פָתָיו וְלֹ֣א אָמִ֑ישׁ מֵ֝חֻקִּ֗י צָפַ֥נְתִּי אִמְרֵי־פִֽיו׃ 12
१२मी त्याच्या ओठांच्या आज्ञेचे पालन करण्यापासुन मागे वळालो नाही, मी संपत्ती प्रमाणे माझ्या हृदयात देवाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ठेवले आहेत.
וְה֣וּא בְ֭אֶחָד וּמִ֣י יְשִׁיבֶ֑נּוּ וְנַפְשׁ֖וֹ אִוְּתָ֣ה וַיָּֽעַשׂ׃ 13
१३परंतु देव कधी बदलत नाही, त्यास कोण बदलेल. त्याच्या मनाच्या ईच्छेप्रमाणे तो करतो.
כִּ֭י יַשְׁלִ֣ים חֻקִּ֑י וְכָהֵ֖נָּה רַבּ֣וֹת עִמּֽוֹ׃ 14
१४कारण तो माझ्यासाठी त्याचा हूकुम चालवितो, माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत.
עַל־כֵּ֭ן מִפָּנָ֣יו אֶבָּהֵ֑ל אֶ֝תְבּוֹנֵ֗ן וְאֶפְחַ֥ד מִמֶּֽנּוּ׃ 15
१५यास्तव, मी त्याच्या उपस्थीतीला घाबरतो, जेव्हा मी त्याच्याबद्दल विचार करतो, मला त्याची भीती वाटते.
וְ֭אֵל הֵרַ֣ךְ לִבִּ֑י וְ֝שַׁדַּ֗י הִבְהִילָֽנִי׃ 16
१६त्यामुळे देवाने माझे हृदय कमजोर केले आहे, आणि सर्वशक्तिमानाने मला भयभीत केले आहे.
כִּֽי־לֹ֣א נִ֭צְמַתִּי מִפְּנֵי־חֹ֑שֶׁךְ וּ֝מִפָּנַ֗י כִּסָּה־אֹֽפֶל ׃ 17
१७काय मी अंधकाराने काढून टाकला गेलो नाही काय? आणि गडद अंधकाराने माझे मुख झाकले गेले नाही काय.”

< אִיּוֹב 23 >