< ישעה 14 >
כִּי יְרַחֵם יְהוָה אֶֽת־יַעֲקֹב וּבָחַר עוֹד בְּיִשְׂרָאֵל וְהִנִּיחָם עַל־אַדְמָתָם וְנִלְוָה הַגֵּר עֲלֵיהֶם וְנִסְפְּחוּ עַל־בֵּית יַעֲקֹֽב׃ | 1 |
१परमेश्वर याकोबावर दया करील; तो इस्राएलाची पुन्हा निवड करील आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशात स्थापील. परके त्यांच्यात सहभागी होतील आणि ते स्वतः याकोबाच्या घराण्याला जडून राहतील.
וּלְקָחוּם עַמִּים וֶהֱבִיאוּם אֶל־מְקוֹמָם וְהִֽתְנַחֲלוּם בֵּֽית־יִשְׂרָאֵל עַל אַדְמַת יְהוָה לַעֲבָדִים וְלִשְׁפָחוֹת וְהָיוּ שֹׁבִים לְשֹֽׁבֵיהֶם וְרָדוּ בְּנֹגְשֵׂיהֶֽם׃ | 2 |
२राष्ट्रे त्यांना आपल्या स्वतःच्या ठिकाणावर आणतील. मग इस्राएलाचे घराणे त्यांना परमेश्वराच्या देशात दास व दासी करून ठेवतील. ज्यांनी त्यास बंदिवान करून नेले होते त्यास ते बंदीत ठेवतील आणि ते आपल्या पीडणाऱ्यावर राज्य करतील.
וְהָיָה בְּיוֹם הָנִיחַ יְהוָה לְךָ מֵֽעָצְבְּךָ וּמֵרָגְזֶךָ וּמִן־הָעֲבֹדָה הַקָּשָׁה אֲשֶׁר עֻבַּד־בָּֽךְ׃ | 3 |
३त्या दिवशी तुझ्या दुःखापासून आणि यातनेपासून आणि तुजवर लादलेले कठीण दास्यापासून परमेश्वर तुला विसावा देईल,
וְנָשָׂאתָ הַמָּשָׁל הַזֶּה עַל־מֶלֶךְ בָּבֶל וְאָמָרְתָּ אֵיךְ שָׁבַת נֹגֵשׂ שָׁבְתָה מַדְהֵבָֽה׃ | 4 |
४बाबेलाच्या राजा विरूद्धचे हे टोचणारे गाणे तू म्हणशील, “जाचणाऱ्याचा कसा नाश झाला आहे, गर्विष्ठाचा त्वेष संपला.
שָׁבַר יְהוָה מַטֵּה רְשָׁעִים שֵׁבֶט מֹשְׁלִֽים׃ | 5 |
५दुष्टाची काठी, अधिकाऱ्याचा जो राजदंड, तो परमेश्वराने मोडला आहे.
מַכֶּה עַמִּים בְּעֶבְרָה מַכַּת בִּלְתִּי סָרָה רֹדֶה בָאַף גּוֹיִם מֻרְדָּף בְּלִי חָשָֽׂךְ׃ | 6 |
६जो क्रोधाने लोकांस निरंतर ठोसे मारत असे, तो रागाने राष्ट्रावर राज्य करीत असे, कोणाला आडकाठी घालता येईना असा हल्ला करत असे तो परमेश्वराने मोडला आहे.
נָחָה שָׁקְטָה כָּל־הָאָרֶץ פָּצְחוּ רִנָּֽה׃ | 7 |
७सर्व पृथ्वी विसावा पावली आहे आणि शांत झाली आहे; त्यांनी गाणे गाऊन उत्सावाला सुरवात केली आहे.
גַּם־בְּרוֹשִׁים שָׂמְחוּ לְךָ אַרְזֵי לְבָנוֹן מֵאָז שָׁכַבְתָּ לֹֽא־יַעֲלֶה הַכֹּרֵת עָלֵֽינוּ׃ | 8 |
८लबानोनाचे गंधसरूबरोबर देवदारूवृक्षसुध्दा तुझ्यावर हर्षित होतात; ते म्हणतात, ‘तू खाली पडलास तेव्हापासून लाकडे कापणारा आम्हावर चढून आला नाही.’
שְׁאוֹל מִתַּחַת רָגְזָה לְךָ לִקְרַאת בּוֹאֶךָ עוֹרֵר לְךָ רְפָאִים כָּל־עַתּוּדֵי אָרֶץ הֵקִים מִכִּסְאוֹתָם כֹּל מַלְכֵי גוֹיִֽם׃ (Sheol ) | 9 |
९जेव्हा तू अधोलोकात खाली जाशील तेव्हा तुला भेटण्यास ते उत्सुक आहे. तो तुजसाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व राजांना उठवील, सर्व राष्ट्रांच्या राजांना आपल्या सिंहासनावरून उठवीत आहे. (Sheol )
כֻּלָּם יַֽעֲנוּ וְיֹאמְרוּ אֵלֶיךָ גַּם־אַתָּה חֻלֵּיתָ כָמוֹנוּ אֵלֵינוּ נִמְשָֽׁלְתָּ׃ | 10 |
१०ते सर्व बोलतील आणि तुला म्हणतील, ‘तू आमच्यासारखा अशक्त झाला आहे. तू आमच्या सारखा झाला आहे.
הוּרַד שְׁאוֹל גְּאוֹנֶךָ הֶמְיַת נְבָלֶיךָ תַּחְתֶּיךָ יֻצַּע רִמָּה וּמְכַסֶּיךָ תּוֹלֵעָֽה׃ (Sheol ) | 11 |
११तुझा थाटमाट, तुझ्या तंतुवाद्यांच्या आवाज अधोलोकात खाली जात आहे. तुझ्याखाली अळ्या पसरल्या आहेत आणि किडे तुला झाकत आहेत.’ (Sheol )
אֵיךְ נָפַלְתָּ מִשָּׁמַיִם הֵילֵל בֶּן־שָׁחַר נִגְדַּעְתָּ לָאָרֶץ חוֹלֵשׁ עַל־גּוֹיִֽם׃ | 12 |
१२हे र्देदीप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून खाली कसा पडला आहेस! ज्या तू राष्ट्रांस जिंकले, तुला तोडून कसा जमिनीवर टाकला आहे!
וְאַתָּה אָמַרְתָּ בִֽלְבָבְךָ הַשָּׁמַיִם אֶֽעֱלֶה מִמַּעַל לְכֽוֹכְבֵי־אֵל אָרִים כִּסְאִי וְאֵשֵׁב בְּהַר־מוֹעֵד בְּיַרְכְּתֵי צָפֽוֹן׃ | 13 |
१३जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात वर चढेन, देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन करीन, आणि उत्तरेच्या अगदी शेवटच्या भागात मी मंडळीच्या पर्वतावर बसेन.
אֶעֱלֶה עַל־בָּמֳתֵי עָב אֶדַּמֶּה לְעֶלְיֽוֹן׃ | 14 |
१४मी मेघाच्या उंचीच्यावरती चढेन; मी परात्पर देवासारखा होईन.’
אַךְ אֶל־שְׁאוֹל תּוּרָד אֶל־יַרְכְּתֵי־בֽוֹר׃ (Sheol ) | 15 |
१५तथापि तुला आता खाली अधोलोकात, खोल खळग्यात आणले आहे. (Sheol )
רֹאֶיךָ אֵלֶיךָ יַשְׁגִּיחוּ אֵלֶיךָ יִתְבּוֹנָנוּ הֲזֶה הָאִישׁ מַרְגִּיז הָאָרֶץ מַרְעִישׁ מַמְלָכֽוֹת׃ | 16 |
१६जे तुझ्याकडे निरखून पाहतील; तुझ्याबद्दल विचार करतील. ते म्हणतील, ‘ज्याने पृथ्वी थरथर कापविली व राज्ये डळमळविली तो हाच का पुरुष?
שָׂם תֵּבֵל כַּמִּדְבָּר וְעָרָיו הָרָס אֲסִירָיו לֹא־פָתַח בָּֽיְתָה׃ | 17 |
१७जो जग रानासारखे करीत असे, त्यांची नगरे उलथून टाकत असे आणि ज्यांने त्याच्या कैद्यांना आपल्या घरी जाऊ दिले नाही तो हाच का?’
כָּל־מַלְכֵי גוֹיִם כֻּלָּם שָׁכְבוּ בְכָבוֹד אִישׁ בְּבֵיתֽוֹ׃ | 18 |
१८सर्व राष्ट्रांचे राजे, त्यांच्यातील सर्व, गौरवाने प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या कबरेत निजले आहेत.
וְאַתָּה הָשְׁלַכְתָּ מִֽקִּבְרְךָ כְּנֵצֶר נִתְעָב לְבוּשׁ הֲרֻגִים מְטֹעֲנֵי חָרֶב יוֹרְדֵי אֶל־אַבְנֵי־בוֹר כְּפֶגֶר מוּבָֽס׃ | 19 |
१९पण, तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे तुझ्या कबरेतून काढून बाहेर फेकले आहे. जे तलवारीने भोसकलेले, खाचेतल्या दगडांमध्ये खाली उतरले जातात, तसे तू मृत्युने झाकला आहेस.
לֹֽא־תֵחַד אִתָּם בִּקְבוּרָה כִּֽי־אַרְצְךָ שִׁחַתָּ עַמְּךָ הָרָגְתָּ לֹֽא־יִקָּרֵא לְעוֹלָם זֶרַע מְרֵעִֽים׃ | 20 |
२०जसे पाया खाली तुडवलेले मृत शरीर, तुला कधीच त्यांच्याबरोबर पुरण्यात येणार नाही, कारण तू आपल्या देशाचा नाश केला आहे. तू आपले लोक वधले आहेत, जे वाईट करणाऱ्यांची मुले आहेत आणि त्यांचा कधी पुन्हा उल्लेख होणार नाही.”
הָכִינוּ לְבָנָיו מַטְבֵּחַ בַּעֲוֺן אֲבוֹתָם בַּל־יָקֻמוּ וְיָרְשׁוּ אָרֶץ וּמָלְאוּ פְנֵֽי־תֵבֵל עָרִֽים׃ | 21 |
२१त्यांच्या पूर्वजांच्या अन्यायामुळे त्यांच्या मुलांसाठी तुम्ही कत्तल करण्याची तयारी करा, म्हणजे ते उठणार नाहीत आणि पृथ्वी ताब्यात घेणार नाहीत व संपूर्ण जग नगरांनी भरणार नाही.
וְקַמְתִּי עֲלֵיהֶם נְאֻם יְהוָה צְבָאוֹת וְהִכְרַתִּי לְבָבֶל שֵׁם וּשְׁאָר וְנִין וָנֶכֶד נְאֻם־יְהוָֽה׃ | 22 |
२२“मी त्यांच्याविरुद्ध उठेन,” असे सेनाधीश परमेश्वर जाहीर करतो. “मी बाबेलापासून नाव, वंशज आणि भावी पिढ्या ह्यांना तोडून टाकीन,” हे परमेश्वर जाहीर करतो.
וְשַׂמְתִּיהָ לְמוֹרַשׁ קִפֹּד וְאַגְמֵי־מָיִם וְטֵֽאטֵאתִיהָ בְּמַטְאֲטֵא הַשְׁמֵד נְאֻם יְהוָה צְבָאֽוֹת׃ | 23 |
२३मी तिला घुबडाची मालमत्ता व पाण्याचे तळे असेही करीन, आणि मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर जाहीर करतो.
נִשְׁבַּע יְהוָה צְבָאוֹת לֵאמֹר אִם־לֹא כַּאֲשֶׁר דִּמִּיתִי כֵּן הָיָתָה וְכַאֲשֶׁר יָעַצְתִּי הִיא תָקֽוּם׃ | 24 |
२४सेनाधीश परमेश्वराने शपथ वाहून म्हणाला, खात्रीने, माझे जे उद्देश आहेत, त्याप्रमाणे होईल; आणि जसे मी योजले तसेच होईल.
לִשְׁבֹּר אַשּׁוּר בְּאַרְצִי וְעַל־הָרַי אֲבוּסֶנּוּ וְסָר מֵֽעֲלֵיהֶם עֻלּוֹ וְסֻבֳּלוֹ מֵעַל שִׁכְמוֹ יָסֽוּר׃ | 25 |
२५मी आपल्या देशात अश्शूराला तोडीन आणि माझ्या पर्वतावर त्यास पायाखाली तुडवीन. नंतर त्याचे जोखड त्यांच्यावरून निघेल आणि त्याचे ओझे त्यांच्या खांद्यावरून दूर सारले जाईल.
זֹאת הָעֵצָה הַיְּעוּצָה עַל־כָּל־הָאָרֶץ וְזֹאת הַיָּד הַנְּטוּיָה עַל־כָּל־הַגּוֹיִֽם׃ | 26 |
२६संपूर्ण पृथ्वीसाठी योजिलेला उद्देश हाच आहे आणि जो हात सर्व राष्ट्रांवर उगारलेला आहे तो हात हाच आहे.
כִּֽי־יְהוָה צְבָאוֹת יָעָץ וּמִי יָפֵר וְיָדוֹ הַנְּטוּיָה וּֽמִי יְשִׁיבֶֽנָּה׃ | 27 |
२७कारण सेनाधीश परमेश्वराने हा संकल्प केला आहे; तो कोण थांबवू शकेल? त्याचा हात उगारलेला आहे, आणि तो कोणाच्याने मागे वळवू शकेल?
בִּשְׁנַת־מוֹת הַמֶּלֶךְ אָחָז הָיָה הַמַּשָּׂא הַזֶּֽה׃ | 28 |
२८राजा आहाजाच्या मृत्यूच्या वर्षात ही घोषणा आली.
אַֽל־תִּשְׂמְחִי פְלֶשֶׁת כֻּלֵּךְ כִּי נִשְׁבַּר שֵׁבֶט מַכֵּךְ כִּֽי־מִשֹּׁרֶשׁ נָחָשׁ יֵצֵא צֶפַע וּפִרְיוֹ שָׂרָף מְעוֹפֵֽף׃ | 29 |
२९अगे पलिष्टी, तुला मारणारी काठी मोडली आहे म्हणून आनंद करू नको. कारण सापाच्या मुळातून फुरसे निघेल आणि उडता आग्या सर्प त्याचे फळ होईल.
וְרָעוּ בְּכוֹרֵי דַלִּים וְאֶבְיוֹנִים לָבֶטַח יִרְבָּצוּ וְהֵמַתִּי בָֽרָעָב שָׁרְשֵׁךְ וּשְׁאֵרִיתֵךְ יַהֲרֹֽג׃ | 30 |
३०गरीबाचे प्रथम जन्मलेले खातील, आणि गरजवंत सुरक्षितेत पडून राहतील. मी तुझे मूळ उपासमारीने मारीन तो तुझे उरलेले सर्व मारून टाकील.
הֵילִילִֽי שַׁעַר זַֽעֲקִי־עִיר נָמוֹג פְּלֶשֶׁת כֻּלֵּךְ כִּי מִצָּפוֹן עָשָׁן בָּא וְאֵין בּוֹדֵד בְּמוֹעָדָֽיו׃ | 31 |
३१वेशीनो मोठ्याने आक्रोश करा; नगरांनो आरोळी करा. पलिष्टी तू सर्व वितळून जाशील. कारण उत्तरेकडून धुराचे ढग येत आहे आणि तेथे त्याच्या सैन्यात मागे राहणारा कोणी नाही.
וּמַֽה־יַּעֲנֶה מַלְאֲכֵי־גוֹי כִּי יְהוָה יִסַּד צִיּוֹן וּבָהּ יֶחֱסוּ עֲנִיֵּי עַמּֽוֹ׃ | 32 |
३२तर त्या राष्ट्राच्या दूताला कोण एक उत्तर देईल? परमेश्वराने सीयोन स्थापले आहे आणि त्याच्या लोकांतले पीडीत त्यामध्ये आश्रय घेतील.