< תְהִלִּים 57 >

לַמְנַצֵּ֣חַ אַל־תַּ֭שְׁחֵת לְדָוִ֣ד מִכְתָּ֑ם בְּבָרְח֥וֹ מִפְּנֵי־שָׁ֝א֗וּל בַּמְּעָרָֽה׃ חָנֵּ֤נִי אֱלֹהִ֨ים ׀ חָנֵּ֗נִי כִּ֥י בְךָ֮ חָסָ֪יָה נַ֫פְשִׁ֥י וּבְצֵֽל־כְּנָפֶ֥יךָ אֶחְסֶ֑ה עַ֝֗ד יַעֲבֹ֥ר הַוּֽוֹת׃ 1
दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत तुझ्यात आश्रय घेतो.
אֶ֭קְרָא לֵֽאלֹהִ֣ים עֶלְי֑וֹן לָ֝אֵ֗ל גֹּמֵ֥ר עָלָֽי׃ 2
मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो त्याचा मी धावा करीन.
יִשְׁלַ֤ח מִשָּׁמַ֨יִם ׀ וְֽיוֹשִׁיעֵ֗נִי חֵרֵ֣ף שֹׁאֲפִ֣י סֶ֑לָה יִשְׁלַ֥ח אֱ֝לֹהִ֗ים חַסְדּ֥וֹ וַאֲמִתּֽוֹ׃ 3
तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो, जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्यास धमकावतो; देव त्याच्या कराराची विश्वसनीयता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो.
נַפְשִׁ֤י ׀ בְּת֥וֹךְ לְבָאִם֮ אֶשְׁכְּבָ֪ה לֹ֫הֲטִ֥ים בְּֽנֵי־אָדָ֗ם שִׁ֭נֵּיהֶם חֲנִ֣ית וְחִצִּ֑ים וּ֝לְשׁוֹנָ֗ם חֶ֣רֶב חַדָּֽה׃ 4
माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे.
ר֣וּמָה עַל־הַשָּׁמַ֣יִם אֱלֹהִ֑ים עַ֖ל כָּל־הָאָ֣רֶץ כְּבוֹדֶֽךָ׃ 5
हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो; तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर होवो.
רֶ֤שֶׁת ׀ הֵכִ֣ינוּ לִפְעָמַי֮ כָּפַ֪ף נַ֫פְשִׁ֥י כָּר֣וּ לְפָנַ֣י שִׁיחָ֑ה נָפְל֖וּ בְתוֹכָ֣הּ סֶֽלָה׃ 6
त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे; माझा जीव वाकून गेला आहे; त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे, परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत.
נָ֘כ֤וֹן לִבִּ֣י אֱ֭לֹהִים נָכ֣וֹן לִבִּ֑י אָ֝שִׁ֗ירָה וַאֲזַמֵּֽרָה׃ 7
हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे; मी गाईन, होय, मी स्तुती गाईन.
ע֤וּרָה כְבוֹדִ֗י ע֭וּרָֽה הַנֵּ֥בֶל וְכִנּ֗וֹר אָעִ֥ירָה שָּֽׁחַר׃ 8
हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो; हे सतारी आणि वीणे, जागे व्हा; मी पहाटेला जागे करीन.
אוֹדְךָ֖ בָעַמִּ֥ים ׀ אֲדֹנָ֑י אֲ֝זַמֶּרְךָ֗ בַּל־אֻמִּֽים׃ 9
हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन; मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवने गाईन.
כִּֽי־גָדֹ֣ל עַד־שָׁמַ֣יִם חַסְדֶּ֑ךָ וְֽעַד־שְׁחָקִ֥ים אֲמִתֶּֽךָ׃ 10
१०कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो.
ר֣וּמָה עַל־שָׁמַ֣יִם אֱלֹהִ֑ים עַ֖ל כָּל־הָאָ֣רֶץ כְּבוֹדֶֽךָ׃ 11
११हे देवा, तू आकाशाच्या वर उंचविला जावो; तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच होवो.

< תְהִלִּים 57 >