< תְהִלִּים 14 >
לַמְנַצֵּ֗חַ לְדָ֫וִ֥ד אָ֘מַ֤ר נָבָ֣ל בְּ֭לִבּוֹ אֵ֣ין אֱלֹהִ֑ים הִֽשְׁחִ֗יתוּ הִֽתְעִ֥יבוּ עֲלִילָ֗ה אֵ֣ין עֹֽשֵׂה־טֽוֹב׃ | 1 |
१मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही.
יְֽהוָ֗ה מִשָּׁמַיִם֮ הִשְׁקִ֪יף עַֽל־בְּנֵי־אָ֫דָ֥ם לִ֭רְאוֹת הֲיֵ֣שׁ מַשְׂכִּ֑יל דֹּ֝רֵשׁ אֶת־אֱלֹהִֽים׃ | 2 |
२परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय?
הַכֹּ֥ל סָר֮ יַחְדָּ֪ו נֶ֫אֱלָ֥חוּ אֵ֤ין עֹֽשֵׂה־ט֑וֹב אֵ֝֗ין גַּם־אֶחָֽד׃ | 3 |
३प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही.
הֲלֹ֥א יָדְעוּ֮ כָּל־פֹּ֪עֲלֵ֫י אָ֥וֶן אֹכְלֵ֣י עַ֭מִּי אָ֣כְלוּ לֶ֑חֶם יְ֝הוָ֗ה לֹ֣א קָרָֽאוּ׃ | 4 |
४जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत?
שָׁ֤ם ׀ פָּ֣חֲדוּ פָ֑חַד כִּֽי־אֱ֝לֹהִ֗ים בְּד֣וֹר צַדִּֽיק׃ | 5 |
५परंतु ते भीतीने थरथर कापतील, कारण देव न्यायींच्या सभेत आहे.
עֲצַת־עָנִ֥י תָבִ֑ישׁוּ כִּ֖י יְהוָ֣ה מַחְסֵֽהוּ׃ | 6 |
६तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे.
מִ֥י יִתֵּ֣ן מִצִּיּוֹן֮ יְשׁוּעַ֪ת יִשְׂרָ֫אֵ֥ל בְּשׁ֣וּב יְ֭הוָה שְׁב֣וּת עַמּ֑וֹ יָגֵ֥ל יַ֝עֲקֹ֗ב יִשְׂמַ֥ח יִשְׂרָֽאֵל׃ | 7 |
७अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल.