< בְּמִדְבַּר 19 >
וַיְדַבֵּ֣ר יְהוָ֔ה אֶל־מֹשֶׁ֥ה וְאֶֽל־אַהֲרֹ֖ן לֵאמֹֽר׃ | 1 |
१परमेश्वर मोशेशी आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,
זֹ֚את חֻקַּ֣ת הַתּוֹרָ֔ה אֲשֶׁר־צִוָּ֥ה יְהוָ֖ה לֵאמֹ֑ר דַּבֵּ֣ר ׀ אֶל־בְּנֵ֣י יִשְׂרָאֵ֗ל וְיִקְח֣וּ אֵלֶיךָ֩ פָרָ֨ה אֲדֻמָּ֜ה תְּמִימָ֗ה אֲשֶׁ֤ר אֵֽין־בָּהּ֙ מ֔וּם אֲשֶׁ֛ר לֹא־עָלָ֥ה עָלֶ֖יהָ עֹֽל׃ | 2 |
२परमेश्वराने इस्राएल लोकांस जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवलेले नाही अशी एक लाल कालवड घ्या.
וּנְתַתֶּ֣ם אֹתָ֔הּ אֶל־אֶלְעָזָ֖ר הַכֹּהֵ֑ן וְהוֹצִ֤יא אֹתָהּ֙ אֶל־מִח֣וּץ לַֽמַּחֲנֶ֔ה וְשָׁחַ֥ט אֹתָ֖הּ לְפָנָֽיו׃ | 3 |
३ती याजक एलाजाराला द्यावी. त्याने तिला छावणीबाहेर न्यावे आणि तिथे कोणा एकाने तिला त्याच्यासमोर मारावे.
וְלָקַ֞ח אֶלְעָזָ֧ר הַכֹּהֵ֛ן מִדָּמָ֖הּ בְּאֶצְבָּע֑וֹ וְהִזָּ֞ה אֶל־נֹ֨כַח פְּנֵ֧י אֹֽהֶל־מוֹעֵ֛ד מִדָּמָ֖הּ שֶׁ֥בַע פְּעָמִֽים׃ | 4 |
४नंतर एलाजार, हा याजक थोडे रक्त आपल्या बोटावर घेईल आणि काही रक्त दर्शनमंडपाकडे शिंपडेल. त्याने असे सात वेळा केले पाहिजे.
וְשָׂרַ֥ף אֶת־הַפָּרָ֖ה לְעֵינָ֑יו אֶת־עֹרָ֤הּ וְאֶת־בְּשָׂרָהּ֙ וְאֶת־דָּמָ֔הּ עַל־פִּרְשָׁ֖הּ יִשְׂרֹֽף׃ | 5 |
५नंतर संपूर्ण कालवड त्याच्यासमोर जाळून, कातडी, मांस रक्त आणि आतडे सर्वकाही जाळले पाहिजे.
וְלָקַ֣ח הַכֹּהֵ֗ן עֵ֥ץ אֶ֛רֶז וְאֵז֖וֹב וּשְׁנִ֣י תוֹלָ֑עַת וְהִשְׁלִ֕יךְ אֶל־תּ֖וֹךְ שְׂרֵפַ֥ת הַפָּרָֽה׃ | 6 |
६नंतर याजकाने गंधसरूची एक काठी, एजोबाची फांदी व लाल दोरी घ्यावी. याजकाने या गोष्टी कालवड जळत असलेल्या जाळात फेकाव्या.
וְכִבֶּ֨ס בְּגָדָ֜יו הַכֹּהֵ֗ן וְרָחַ֤ץ בְּשָׂרוֹ֙ בַּמַּ֔יִם וְאַחַ֖ר יָב֣וֹא אֶל־הַֽמַּחֲנֶ֑ה וְטָמֵ֥א הַכֹּהֵ֖ן עַד־הָעָֽרֶב׃ | 7 |
७याजकाने स्वत: ला आणि त्याच्या कपड्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. आणि मगच छावणीत परत यावे. याजक संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
וְהַשֹּׂרֵ֣ף אֹתָ֔הּ יְכַבֵּ֤ס בְּגָדָיו֙ בַּמַּ֔יִם וְרָחַ֥ץ בְּשָׂר֖וֹ בַּמָּ֑יִם וְטָמֵ֖א עַד־הָעָֽרֶב׃ | 8 |
८ज्या मनुष्याने कालवडीला जाळले असेल त्याने स्वत: ला धुवावे. स्वत: चे कपडेही पाण्याने स्वच्छ धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
וְאָסַ֣ף ׀ אִ֣ישׁ טָה֗וֹר אֵ֚ת אֵ֣פֶר הַפָּרָ֔ה וְהִנִּ֛יחַ מִח֥וּץ לַֽמַּחֲנֶ֖ה בְּמָק֣וֹם טָה֑וֹר וְ֠הָיְתָה לַעֲדַ֨ת בְּנֵֽי־יִשְׂרָאֵ֧ל לְמִשְׁמֶ֛רֶת לְמֵ֥י נִדָּ֖ה חַטָּ֥את הִֽוא׃ | 9 |
९नंतर जो मनुष्य शुद्ध असेल तो कालवडीची राख गोळा करेल. तो ती राख छावणीच्या बाहेर स्वच्छ जागी ठेवावी आणि ती इस्राएल वंशाच्या मंडळीकरता अशुद्धी दूर करण्याच्या पाण्यासाठी ती राखून ठेवावी, ती पापार्पण अशी आहे.
וְ֠כִבֶּס הָאֹסֵ֨ף אֶת־אֵ֤פֶר הַפָּרָה֙ אֶת־בְּגָדָ֔יו וְטָמֵ֖א עַד־הָעָ֑רֶב וְֽהָיְתָ֞ה לִבְנֵ֣י יִשְׂרָאֵ֗ל וְלַגֵּ֛ר הַגָּ֥ר בְּתוֹכָ֖ם לְחֻקַּ֥ת עוֹלָֽם׃ | 10 |
१०ज्या मनुष्याने कालवडीची राख गोळा केली असेल त्याने त्याचे कपडे धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. हे नियम नेहमी अस्तित्वात असतील. हा नियम इस्राएलच्या सर्व नागरिकांसाठी आहे आणि तुमच्याबरोबर जे परदेशी लोक राहत आहेत त्यांच्यासाठीही हा नियम आहे.
הַנֹּגֵ֥עַ בְּמֵ֖ת לְכָל־נֶ֣פֶשׁ אָדָ֑ם וְטָמֵ֖א שִׁבְעַ֥ת יָמִֽים׃ | 11 |
११जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील.
ה֣וּא יִתְחַטָּא־ב֞וֹ בַּיּ֧וֹם הַשְּׁלִישִׁ֛י וּבַיּ֥וֹם הַשְּׁבִיעִ֖י יִטְהָ֑ר וְאִם־לֹ֨א יִתְחַטָּ֜א בַּיּ֧וֹם הַשְּׁלִישִׁ֛י וּבַיּ֥וֹם הַשְּׁבִיעִ֖י לֹ֥א יִטְהָֽר׃ | 12 |
१२त्याने स्वत: ला तिसऱ्या दिवशी ती राख घेऊन आपणास शुद्ध करावे व नंतर सातव्या दिवशी तो शुद्ध होईल, पण जर तो तिसऱ्या दिवशी आपणास शुद्ध करणार नाहीतर तो सातव्या दिवशी तो शुद्ध होणार नाही.
כָּֽל־הַנֹּגֵ֡עַ בְּמֵ֣ת בְּנֶפֶשׁ֩ הָאָדָ֨ם אֲשֶׁר־יָמ֜וּת וְלֹ֣א יִתְחַטָּ֗א אֶת־מִשְׁכַּ֤ן יְהוָה֙ טִמֵּ֔א וְנִכְרְתָ֛ה הַנֶּ֥פֶשׁ הַהִ֖וא מִיִּשְׂרָאֵ֑ל כִּי֩ מֵ֨י נִדָּ֜ה לֹא־זֹרַ֤ק עָלָיו֙ טָמֵ֣א יִהְיֶ֔ה ע֖וֹד טֻמְאָת֥וֹ בֽוֹ׃ | 13 |
१३जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो अशुद्ध होईल. जर मनुष्य अशुद्ध असताना परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपात गेला तर मंडपही अशुद्ध होईल. म्हणून त्या मनुष्यास इस्राएल लोकांपासून दूर ठेवावे. जर अशुद्ध मनुष्यावर खास पाणी शिंपडले नाहीतर तो अशुद्ध राहील.
זֹ֚את הַתּוֹרָ֔ה אָדָ֖ם כִּֽי־יָמ֣וּת בְּאֹ֑הֶל כָּל־הַבָּ֤א אֶל־הָאֹ֙הֶל֙ וְכָל־אֲשֶׁ֣ר בָּאֹ֔הֶל יִטְמָ֖א שִׁבְעַ֥ת יָמִֽים׃ | 14 |
१४जे लोक त्यांच्या मंडपात मरतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. जर एखादा मनुष्य त्याच्या मंडपात मेला तर त्या मंडपातले सगळे लोक आणि सगळ्या वस्तू अशुद्ध होतील. ते सात दिवस अशुद्ध राहतील.
וְכֹל֙ כְּלִ֣י פָת֔וּחַ אֲשֶׁ֛ר אֵין־צָמִ֥יד פָּתִ֖יל עָלָ֑יו טָמֵ֖א הֽוּא׃ | 15 |
१५आणि ज्यावर झाकण बांधले नाही असे प्रत्येक उघडे भांडे अशुद्ध होईल.
וְכֹ֨ל אֲשֶׁר־יִגַּ֜ע עַל־פְּנֵ֣י הַשָּׂדֶ֗ה בַּֽחֲלַל־חֶ֙רֶב֙ א֣וֹ בְמֵ֔ת אֽוֹ־בְעֶ֥צֶם אָדָ֖ם א֣וֹ בְקָ֑בֶר יִטְמָ֖א שִׁבְעַ֥ת יָמִֽים׃ | 16 |
१६खुल्या मैदानात तलवारीने वधलेल्या जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील. जर ते प्रेत बाहेर उघड्यावर असेल किंवा तो मनुष्य युद्धात मारला गेला असेल तरच हे लागू आहे. आणि जर एखाद्याने मरण पावलेल्या मनुष्याच्या अस्थींना हात लावला तरी तो मनुष्य सात दिवस अशुद्ध होईल.
וְלָֽקְחוּ֙ לַטָּמֵ֔א מֵעֲפַ֖ר שְׂרֵפַ֣ת הַֽחַטָּ֑את וְנָתַ֥ן עָלָ֛יו מַ֥יִם חַיִּ֖ים אֶל־כֶּֽלִי׃ | 17 |
१७त्या अशुद्ध मनुष्यास पुन्हा स्वच्छ करण्यासाठी जाळलेल्या कालवडीची राख तुम्ही वापरली पाहिजे. एखाद्या भांड्यात राखेवर ताजे पाणी टाका.
וְלָקַ֨ח אֵז֜וֹב וְטָבַ֣ל בַּמַּיִם֮ אִ֣ישׁ טָהוֹר֒ וְהִזָּ֤ה עַל־הָאֹ֙הֶל֙ וְעַל־כָּל־הַכֵּלִ֔ים וְעַל־הַנְּפָשׁ֖וֹת אֲשֶׁ֣ר הָֽיוּ־שָׁ֑ם וְעַל־הַנֹּגֵ֗עַ בַּעֶ֙צֶם֙ א֣וֹ בֶֽחָלָ֔ל א֥וֹ בַמֵּ֖ת א֥וֹ בַקָּֽבֶר׃ | 18 |
१८शुद्ध मनुष्याने एजोबाची काठी घेऊन ती पाण्यात बुडवावी. नंतर ते पाणी तंबूवर, भांड्यावर आणि मंडपातल्या मनुष्यांवर शिंपडावे. जो प्रेताला हात लावली त्याच्या बाबतीत हे करावे. तुम्ही हे प्रत्येकाला करा. जो युद्धात कबरेला हात लावील किंवा मरण पावलेल्या मनुष्याच्या हाडांना हात लावील त्याच्या बाबतीत हे करा.
וְהִזָּ֤ה הַטָּהֹר֙ עַל־הַטָּמֵ֔א בַּיּ֥וֹם הַשְּׁלִישִׁ֖י וּבַיּ֣וֹם הַשְּׁבִיעִ֑י וְחִטְּאוֹ֙ בַּיּ֣וֹם הַשְּׁבִיעִ֔י וְכִבֶּ֧ס בְּגָדָ֛יו וְרָחַ֥ץ בַּמַּ֖יִם וְטָהֵ֥ר בָּעָֽרֶב׃ | 19 |
१९नंतर शुद्ध मनुष्याने हे पाणी तिसऱ्या व सातव्या दिवशी अशुद्ध मनुष्याच्या अंगावर शिंपडावे. तो मनुष्य सातव्या दिवशी शुद्ध होईल. त्याने त्याचे कपडे पाण्यात धुवावे. तो संध्याकाळी शुद्ध होईल.
וְאִ֤ישׁ אֲשֶׁר־יִטְמָא֙ וְלֹ֣א יִתְחַטָּ֔א וְנִכְרְתָ֛ה הַנֶּ֥פֶשׁ הַהִ֖וא מִתּ֣וֹךְ הַקָּהָ֑ל כִּי֩ אֶת־מִקְדַּ֨שׁ יְהוָ֜ה טִמֵּ֗א מֵ֥י נִדָּ֛ה לֹא־זֹרַ֥ק עָלָ֖יו טָמֵ֥א הֽוּא׃ | 20 |
२०एखादा मनुष्य अशुद्ध झाल्यानंतर पुन्हा शुद्ध झाला नाहीतर त्यास इस्राएल लोकांपासून वेगळे ठेवावे. कारण त्याने परमेश्वराचे पवित्र निवास मंडपही अशुद्ध करील.
וְהָיְתָ֥ה לָּהֶ֖ם לְחֻקַּ֣ת עוֹלָ֑ם וּמַזֵּ֤ה מֵֽי־הַנִּדָּה֙ יְכַבֵּ֣ס בְּגָדָ֔יו וְהַנֹּגֵ֙עַ֙ בְּמֵ֣י הַנִּדָּ֔ה יִטְמָ֖א עַד־הָעָֽרֶב׃ | 21 |
२१तुमच्यासाठी हा नियम सदैव असेल. ज्या मनुष्यावर पाणी शिंपडले त्या मनुष्याने स्वत: चे कपडे सुद्धा धुतले पाहिजेत. कोणत्याही मनुष्याने त्या खास पाण्याला स्वर्श केला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
וְכֹ֛ל אֲשֶׁר־יִגַּע־בּ֥וֹ הַטָּמֵ֖א יִטְמָ֑א וְהַנֶּ֥פֶשׁ הַנֹּגַ֖עַת תִּטְמָ֥א עַד־הָעָֽרֶב׃ פ | 22 |
२२जर त्या अशुद्ध मनुष्याने दुसऱ्या कोणाला स्पर्श केला तर तो मनुष्य सुद्धा अशुद्ध होईल. तो मनुष्य संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.