< יְשַׁעְיָהוּ 63 >

מִי־זֶ֣ה ׀ בָּ֣א מֵאֱד֗וֹם חֲמ֤וּץ בְּגָדִים֙ מִבָּצְרָ֔ה זֶ֚ה הָד֣וּר בִּלְבוּשׁ֔וֹ צֹעֶ֖ה בְּרֹ֣ב כֹּח֑וֹ אֲנִ֛י מְדַבֵּ֥ר בִּצְדָקָ֖ה רַ֥ב לְהוֹשִֽׁיעַ׃ 1
जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे? जो राजेशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे? जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारायला सामर्थ्य आहे, तो मीच आहे.
מַדּ֥וּעַ אָדֹ֖ם לִלְבוּשֶׁ֑ךָ וּבְגָדֶ֖יךָ כְּדֹרֵ֥ךְ בְּגַֽת׃ 2
तुझी वस्त्रे लालभडक का? आणि ती का द्राक्षांचा रस काढण्याऱ्याच्या कपड्यासारखी आहेत?
פּוּרָ֣ה ׀ דָּרַ֣כְתִּי לְבַדִּ֗י וּמֵֽעַמִּים֙ אֵֽין־אִ֣ישׁ אִתִּ֔י וְאֶדְרְכֵ֣ם בְּאַפִּ֔י וְאֶרְמְסֵ֖ם בַּחֲמָתִ֑י וְיֵ֤ז נִצְחָם֙ עַל־בְּגָדַ֔י וְכָל־מַלְבּוּשַׁ֖י אֶגְאָֽלְתִּי׃ 3
“मी एकट्यानेच द्राक्षकुंड तुडवले आहे आणि राष्ट्रांतील कोणी माझ्याबरोबर नव्हता. मी आपल्या रागाने त्यांना तुडवले आणि आपल्या क्रोधाने त्यांना रगडले. त्यांचे रक्त माझ्या कपड्यांवर उडाले आणि माझी सर्व कपडे मळीन झाली आहेत.
כִּ֛י י֥וֹם נָקָ֖ם בְּלִבִּ֑י וּשְׁנַ֥ת גְּאוּלַ֖י בָּֽאָה׃ 4
कारण प्रतिकाराच्या दिवसा कडे पाहत आहे, आणि माझ्या खंडून घेतलेल्यांचे वर्ष आले आहे.
וְאַבִּיט֙ וְאֵ֣ין עֹזֵ֔ר וְאֶשְׁתּוֹמֵ֖ם וְאֵ֣ין סוֹמֵ֑ךְ וַתּ֤וֹשַֽׁע לִי֙ זְרֹעִ֔י וַחֲמָתִ֖י הִ֥יא סְמָכָֽתְנִי׃ 5
मी पाहिले आणि मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही मदतीला नाही म्हणून मला आश्चर्य वाटले. परंतू माझ्याच बाहूने माझ्यासाठी विजय दिला आणि माझ्याच रागाने मला वर नेले.
וְאָב֤וּס עַמִּים֙ בְּאַפִּ֔י וַאֲשַׁכְּרֵ֖ם בַּחֲמָתִ֑י וְאוֹרִ֥יד לָאָ֖רֶץ נִצְחָֽם׃ ס 6
माझ्या रागात मी लोकांस पायाखाली तुडवले आणि त्यांना माझ्या रागात मस्त केले आणि त्यांचे रक्त मी पृथ्वीवर उडवले.
חַֽסְדֵ֨י יְהוָ֤ה ׀ אַזְכִּיר֙ תְּהִלֹּ֣ת יְהוָ֔ה כְּעַ֕ל כֹּ֥ל אֲשֶׁר־גְּמָלָ֖נוּ יְהוָ֑ה וְרַב־טוּב֙ לְבֵ֣ית יִשְׂרָאֵ֔ל אֲשֶׁר־גְּמָלָ֥ם כְּֽרַחֲמָ֖יו וּכְרֹ֥ב חֲסָדָֽיו׃ 7
मी परमेश्वराच्या कराराचा विश्वासूपणा आणि त्याची प्रशंसनीय कृत्ये सांगेन. परमेश्वराने आम्हांसाठी जे सर्व केले आणि इस्राएलाच्या घराण्याचे जे हित केले ते मी सांगेन. त्याच्या करुणामुळेच ही दया त्याने आम्हांला दाखवली आहे.
וַיֹּ֙אמֶר֙ אַךְ־עַמִּ֣י הֵ֔מָּה בָּנִ֖ים לֹ֣א יְשַׁקֵּ֑רוּ וַיְהִ֥י לָהֶ֖ם לְמוֹשִֽׁיעַ׃ 8
कारण तो म्हणाला, खचित हे माझे लोक आहेत, मुले, जी विश्वासघातकी नाहीत. म्हणून तो त्यांचा त्राता झाला.
בְּֽכָל־צָרָתָ֣ם ׀ ל֣וֹ צָ֗ר וּמַלְאַ֤ךְ פָּנָיו֙ הֽוֹשִׁיעָ֔ם בְּאַהֲבָת֥וֹ וּבְחֶמְלָת֖וֹ ה֣וּא גְאָלָ֑ם וַֽיְנַטְּלֵ֥ם וַֽיְנַשְּׂאֵ֖ם כָּל־יְמֵ֥י עוֹלָֽם׃ 9
त्यांच्या सर्व दु: खात, तो पण दु: खी झाला आणि त्याच्या समक्षतेच्या दुतांने त्यांना तारले. त्याने आपल्या प्रेमाने व आपल्या करूणेने त्यांना वाचवले, आणि त्याने सर्व पुरातन दिवसात त्यांना उचलून वाहून नेले.
וְהֵ֛מָּה מָר֥וּ וְעִצְּב֖וּ אֶת־ר֣וּחַ קָדְשׁ֑וֹ וַיֵּהָפֵ֥ךְ לָהֶ֛ם לְאוֹיֵ֖ב ה֥וּא נִלְחַם־בָּֽם׃ 10
१०पण त्यांनी बंड केले आणि त्याच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. म्हणून तो त्यांचा शत्रू झाला आणि त्यांच्याविरुद्ध लढला.
וַיִּזְכֹּ֥ר יְמֵֽי־עוֹלָ֖ם מֹשֶׁ֣ה עַמּ֑וֹ אַיֵּ֣ה ׀ הַֽמַּעֲלֵ֣ם מִיָּ֗ם אֵ֚ת רֹעֵ֣י צֹאנ֔וֹ אַיֵּ֛ה הַשָּׂ֥ם בְּקִרְבּ֖וֹ אֶת־ר֥וּחַ קָדְשֽׁוֹ׃ 11
११त्याच्या लोकांनी मोशेच्या प्राचीन काळाविषयी विचार केला. ते म्हणाले, तो देव कोठे आहे? ज्याने आपल्या कळपाच्या मेंढपाळांसोबत त्यांना समुद्रातून वर आणले, देव कोठे आहे? ज्याने आपला पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये घातला
מוֹלִיךְ֙ לִימִ֣ין מֹשֶׁ֔ה זְר֖וֹעַ תִּפְאַרְתּ֑וֹ בּ֤וֹקֵֽעַ מַ֙יִם֙ מִפְּנֵיהֶ֔ם לַעֲשׂ֥וֹת ל֖וֹ שֵׁ֥ם עוֹלָֽם׃ 12
१२ज्याने आपले वैभवशाली सामर्थ्य मोशेच्या उजव्या हाताने पुढे नेले, आणि ज्याने आपणास सार्वकालिक नाव करायला त्यांच्यापुढे समुद्र दुभागला, तो देव कोठे आहे?
מוֹלִיכָ֖ם בַּתְּהֹמ֑וֹת כַּסּ֥וּס בַּמִּדְבָּ֖ר לֹ֥א יִכָּשֵֽׁלוּ׃ 13
१३तो देव कोठे आहे? ज्याने त्यांना खोल समुद्रामधून चालवत नेले, जसा घोडा सपाट जमिनीवर धावत सुटतो, तसे ते अडखळले नाहीत.
כַּבְּהֵמָה֙ בַּבִּקְעָ֣ה תֵרֵ֔ד ר֥וּחַ יְהוָ֖ה תְּנִיחֶ֑נּוּ כֵּ֚ן נִהַ֣גְתָּ עַמְּךָ֔ לַעֲשׂ֥וֹת לְךָ֖ שֵׁ֥ם תִּפְאָֽרֶת׃ 14
१४परमेश्वराने त्यांना खोऱ्यात उतरत जाणाऱ्या गुरांप्रमाणे विसावा दिला. ह्याप्रमाणे तू लोकांस मार्गदर्शन केलेस आणि ह्यासाठी की तुझे प्रतापी होवो.
הַבֵּ֤ט מִשָּׁמַ֙יִם֙ וּרְאֵ֔ה מִזְּבֻ֥ל קָדְשְׁךָ֖ וְתִפְאַרְתֶּ֑ךָ אַיֵּ֤ה קִנְאָֽתְךָ֙ וּגְב֣וּרֹתֶ֔ךָ הֲמ֥וֹן מֵעֶ֛יךָ וְֽרַחֲמֶ֖יךָ אֵלַ֥י הִתְאַפָּֽקוּ׃ 15
१५स्वर्गातून खाली पाहा आणि तुझ्या पवित्र व तेजोमय वस्तीतून नोंद घे. तुझा आवेश आणि तुझी महतकृत्ये कोठे आहेत? तुझी करुणा आणि दयाळू कृती आमच्याकडून ठेवल्या आहेत
כִּֽי־אַתָּ֣ה אָבִ֔ינוּ כִּ֤י אַבְרָהָם֙ לֹ֣א יְדָעָ֔נוּ וְיִשְׂרָאֵ֖ל לֹ֣א יַכִּירָ֑נוּ אַתָּ֤ה יְהוָה֙ אָבִ֔ינוּ גֹּאֲלֵ֥נוּ מֵֽעוֹלָ֖ם שְׁמֶֽךָ׃ 16
१६तू तर आमचा पिता आहेस, तरी अब्राहाम आम्हास ओळखत नाही आणि इस्राएलाला आम्ही माहीत नाही. परमेश्वरा, तू आमचा पिता, सर्वकाळपासून आम्हांला खंडून घेणारा, हे तुझे नाव आहे.
לָ֣מָּה תַתְעֵ֤נוּ יְהוָה֙ מִדְּרָכֶ֔יךָ תַּקְשִׁ֥יחַ לִבֵּ֖נוּ מִיִּרְאָתֶ֑ךָ שׁ֚וּב לְמַ֣עַן עֲבָדֶ֔יךָ שִׁבְטֵ֖י נַחֲלָתֶֽךָ׃ 17
१७परमेश्वरा, तू आम्हास तुझ्यापासून मार्गातून का बहकू देतोस आणि तुझ्या आज्ञा न पाळाव्यात म्हणून तू आमचे हृदये कठीण का करतोस? तुझ्या सेवकाकरिता परत ये, जे तुझ्या वतनाचे वंश आहेत.
לַמִּצְעָ֕ר יָרְשׁ֖וּ עַם־קָדְשֶׁ֑ךָ צָרֵ֕ינוּ בּוֹסְס֖וּ מִקְדָּשֶֽׁךָ׃ 18
१८तुझी माणसे थोडाच वेळ तुझे पवित्र स्थान ताब्यात घेतील, पण आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र मंदिर पायाखाली तुडवले.
הָיִ֗ינוּ מֵֽעוֹלָם֙ לֹֽא־מָשַׁ֣לְתָּ בָּ֔ם לֹֽא־נִקְרָ֥א שִׁמְךָ֖ עֲלֵיהֶ֑ם 19
१९त्या लोकांसारखे आम्ही झालो, ज्यांच्यावर तू कधीच राज्य केले नाही आणि ज्याना तुझे नाव दिले गेले नाही.

< יְשַׁעְיָהוּ 63 >