< יְחֶזְקֵאל 38 >

וַיְהִ֥י דְבַר־יְהוָ֖ה אֵלַ֥י לֵאמֹֽר׃ 1
परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
בֶּן־אָדָ֗ם שִׂ֤ים פָּנֶ֙יךָ֙ אֶל־גּוֹג֙ אֶ֣רֶץ הַמָּג֔וֹג נְשִׂ֕יא רֹ֖אשׁ מֶ֣שֶׁךְ וְתֻבָ֑ל וְהִנָּבֵ֖א עָלָֽיו׃ 2
“मानवाच्या मुला, मागोग देशातील, गोग, जो रोश, मेशेख व तुबाल यांचा अधिपती याजकडे तोंड कर. आणि त्याच्याविरुध्द भविष्य सांग.
וְאָ֣מַרְתָּ֔ כֹּ֥ה אָמַ֖ר אֲדֹנָ֣י יְהוִ֑ה הִנְנִ֤י אֵלֶ֙יךָ֙ גּ֔וֹג נְשִׂ֕יא רֹ֖אשׁ מֶ֥שֶׁךְ וְתֻבָֽל׃ 3
म्हण, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, ‘अरे गोगा, मेशेख व तुबाल यांच्या अधिपती, पाहा! मी तुझ्याविरूद्ध आहे.
וְשׁ֣וֹבַבְתִּ֔יךָ וְנָתַתִּ֥י חַחִ֖ים בִּלְחָיֶ֑יךָ וְהוֹצֵאתִי֩ אוֹתְךָ֨ וְאֶת־כָּל־חֵילֶ֜ךָ סוּסִ֣ים וּפָרָשִׁ֗ים לְבֻשֵׁ֤י מִכְלוֹל֙ כֻּלָּ֔ם קָהָ֥ל רָב֙ צִנָּ֣ה וּמָגֵ֔ן תֹּפְשֵׂ֥י חֲרָב֖וֹת כֻּלָּֽם׃ 4
म्हणून मी तुला पाठमोरा करीन आणि तुझ्या जाभाडात आकडा घालीन; तुझे सर्व सैन्य, घोडे व घोडेस्वार यास बाहेर काढीन; ते सर्वजण पूर्ण चिलखत घालून, मोठ्या व लहान ढाली धारण केलेला, त्यासर्वांनी तलवारी धरलेला असा मोठा समुदाय मी पाठवीन.
פָּרַ֛ס כּ֥וּשׁ וּפ֖וּט אִתָּ֑ם כֻּלָּ֖ם מָגֵ֥ן וְכוֹבָֽע׃ 5
पारस, कूश व पूट हे सर्व त्यांच्या ढाली व शिरस्राणे धारण करून त्यांच्याबरोबर आहेत.
גֹּ֚מֶר וְכָל־אֲגַפֶּ֔יהָ בֵּ֚ית תּֽוֹגַרְמָ֔ה יַרְכְּתֵ֥י צָפ֖וֹן וְאֶת־כָּל־אֲגַפָּ֑יו עַמִּ֥ים רַבִּ֖ים אִתָּֽךְ׃ 6
त्याचप्रमाणे गोमर आणि त्याचा सेनासमूह, अगदी उत्तरेचा देश तोगार्माचे घराणे व त्याचा सेनासमूह, तसेच अनेक लोक तुजसह बाहेर काढीन.
הִכֹּן֙ וְהָכֵ֣ן לְךָ֔ אַתָּ֕ה וְכָל־קְהָלֶ֖ךָ הַנִּקְהָלִ֣ים עָלֶ֑יךָ וְהָיִ֥יתָ לָהֶ֖ם לְמִשְׁמָֽר׃ 7
“सज्ज व्हा! हो! तुम्ही स्वत: आणि तुम्हास येऊन मिळालेली सैन्य ह्यांनी तयार राहा. आणि तू त्यांचा सेनापती हो.
מִיָּמִ֣ים רַבִּים֮ תִּפָּקֵד֒ בְּאַחֲרִ֨ית הַשָּׁנִ֜ים תָּב֣וֹא ׀ אֶל־אֶ֣רֶץ ׀ מְשׁוֹבֶ֣בֶת מֵחֶ֗רֶב מְקֻבֶּ֙צֶת֙ מֵעַמִּ֣ים רַבִּ֔ים עַ֚ל הָרֵ֣י יִשְׂרָאֵ֔ל אֲשֶׁר־הָי֥וּ לְחָרְבָּ֖ה תָּמִ֑יד וְהִיא֙ מֵעַמִּ֣ים הוּצָ֔אָה וְיָשְׁב֥וּ לָבֶ֖טַח כֻּלָּֽם׃ 8
पुष्कळ दिवसानंतर तुम्हास बोलविण्यात येईल. जो देश तलवारीपासून घेतलेला आहे व पुष्कळ राष्ट्रांतील लोकांपासून मिळवलेला आहे, त्यामध्ये इस्राएलाचे पर्वत सर्वदा ओसाड होत असत त्यावर तू शेवटल्या वर्षामध्ये येशील; तथापि तो देश लोकांतून काढून घेतलेला आहे आणि ते सर्व निर्भय राहतील
וְעָלִ֙יתָ֙ כַּשֹּׁאָ֣ה תָב֔וֹא כֶּעָנָ֛ן לְכַסּ֥וֹת הָאָ֖רֶץ תִּֽהְיֶ֑ה אַתָּה֙ וְכָל־אֲגַפֶּ֔יךָ וְעַמִּ֥ים רַבִּ֖ים אוֹתָֽךְ׃ ס 9
म्हणून तू चढून येशील, तू वादळासारखा येशील. देशाला झाकणाऱ्या ढगासारखा तू होशील, तू आणि तुझ्याबरोबरचे सैन्य व तुजसह अनेक राष्ट्रांचे लोक असे तुम्ही त्यासारखे व्हाल.”
כֹּ֥ה אָמַ֖ר אֲדֹנָ֣י יְהוִ֑ה וְהָיָ֣ה ׀ בַּיּ֣וֹם הַה֗וּא יַעֲל֤וּ דְבָרִים֙ עַל־לְבָבֶ֔ךָ וְחָשַׁבְתָּ֖ מַחֲשֶׁ֥בֶת רָעָֽה׃ 10
१०प्रभू परमेश्वर असे म्हणतो, त्या दिवसात असे होईल की, तुझ्या मनात योजना येतील, तू वाईट युक्तिचा नवीन मार्ग आखशील.
וְאָמַרְתָּ֗ אֶֽעֱלֶה֙ עַל־אֶ֣רֶץ פְּרָז֔וֹת אָבוֹא֙ הַשֹּׁ֣קְטִ֔ים יֹשְׁבֵ֖י לָבֶ֑טַח כֻּלָּ֗ם יֹֽשְׁבִים֙ בְּאֵ֣ין חוֹמָ֔ה וּבְרִ֥יחַ וּדְלָתַ֖יִם אֵ֥ין לָהֶֽם׃ 11
११मग तू म्हणशील, मी उघड्या देशापर्यंत जाईन; ज्या देशांच्या नगराला तटबंदी नाही त्यांच्यावर मी हल्ला करीन. ते लोक सुरक्षित शांतीने राहतात, ते सर्वजण जेथे कोठे राहतात तेथे भिंती, अडसर, वेशी नाहीत त्यावर मी चालून जाईन.
לִשְׁלֹ֥ל שָׁלָ֖ל וְלָבֹ֣ז בַּ֑ז לְהָשִׁ֨יב יָדְךָ֜ עַל־חֳרָב֣וֹת נוֹשָׁבֹ֗ת וְאֶל־עַם֙ מְאֻסָּ֣ף מִגּוֹיִ֔ם עֹשֶׂה֙ מִקְנֶ֣ה וְקִנְיָ֔ן יֹשְׁבֵ֖י עַל־טַבּ֥וּר הָאָֽרֶץ׃ 12
१२अशासाठी की, तू लूट करावी व शिकार धरावी, आणि जी उजाड स्थाने वसली आहेत त्यावर, व जे लोक राष्ट्रांमधून एकवटलेले आहेत, ज्यांनी गुरे व धन ही प्राप्त करून घेतली आहेत, जे पृथ्वीच्या मध्यभागी वसतात त्यांच्यावरही तू आपला हात चालवावा.
שְׁבָ֡א וּ֠דְדָן וְסֹחֲרֵ֨י תַרְשִׁ֤ישׁ וְכָל־כְּפִרֶ֙יהָ֙ יֹאמְר֣וּ לְךָ֔ הֲלִשְׁלֹ֤ל שָׁלָל֙ אַתָּ֣ה בָ֔א הֲלָבֹ֥ז בַּ֖ז הִקְהַ֣לְתָּ קְהָלֶ֑ךָ לָשֵׂ֣את ׀ כֶּ֣סֶף וְזָהָ֗ב לָקַ֙חַת֙ מִקְנֶ֣ה וְקִנְיָ֔ן לִשְׁלֹ֖ל שָׁלָ֥ל גָּדֽוֹל׃ ס 13
१३“शबा आणि ददान आणि तार्शीशाचे व्यापारी, त्यांच्याबरोबरचे सर्व तरुण सिंह ते सर्व तुम्हास तुला म्हणतील, ‘तू लूट करायला आलास काय? सोने व चांदी, गुरेढोरे आणि मालमत्ता, चोरून लुटून नेण्यासाठी, मोठी लूट हस्तगत करण्यासाठी तू आपली सेना जमवली आहेस का?”
לָכֵן֙ הִנָּבֵ֣א בֶן־אָדָ֔ם וְאָמַרְתָּ֣ לְג֔וֹג כֹּ֥ה אָמַ֖ר אֲדֹנָ֣י יְהוִ֑ה הֲל֣וֹא ׀ בַּיּ֣וֹם הַה֗וּא בְּשֶׁ֨בֶת עַמִּ֧י יִשְׂרָאֵ֛ל לָבֶ֖טַח תֵּדָֽע׃ 14
१४म्हणून हे मानवाच्या मुला, गोगाला भविष्य सांग, “प्रभू परमेश्वर असे म्हणतो, ‘त्या दिवसात जेव्हा माझे इस्राएल लोक सुरक्षीत राहतील, तेव्हा तुला हे कळणार नाही का?
וּבָ֤אתָ מִמְּקֽוֹמְךָ֙ מִיַּרְכְּתֵ֣י צָפ֔וֹן אַתָּ֕ה וְעַמִּ֥ים רַבִּ֖ים אִתָּ֑ךְ רֹכְבֵ֤י סוּסִים֙ כֻּלָּ֔ם קָהָ֥ל גָּד֖וֹל וְחַ֥יִל רָֽב׃ 15
१५तू आपल्या स्थानातून अगदी उत्तरेकडच्या दूरच्या प्रदेशातून मोठ्या सैन्याने, त्यातील सर्व घोड्यांवर स्वार होऊन मोठा समुदाय व विशाल सैन्य असे येतील.
וְעָלִ֙יתָ֙ עַל־עַמִּ֣י יִשְׂרָאֵ֔ל כֶּֽעָנָ֖ן לְכַסּ֣וֹת הָאָ֑רֶץ בְּאַחֲרִ֨ית הַיָּמִ֜ים תִּֽהְיֶ֗ה וַהֲבִאוֹתִ֙יךָ֙ עַל־אַרְצִ֔י לְמַעַן֩ דַּ֨עַת הַגּוֹיִ֜ם אֹתִ֗י בְּהִקָּדְשִׁ֥י בְךָ֛ לְעֵינֵיהֶ֖ם גּֽוֹג׃ ס 16
१६“तू माझ्या लोकांशी, इस्राएलशी, लढण्यास येशील. तू देशाला व्यापणाऱ्या व प्रचंड गर्जना करणाऱ्या ढगाप्रमाणे येशील. शेवटच्या दिवसात माझ्या देशाशी लढावयास मी तुला आणिन. मग, गोग, राष्ट्रांना माझे सामर्थ्य कळून येईल. ते मला मान देतील. त्यांना कळून चुकेल की मी पवित्र आहे.”
כֹּֽה־אָמַ֞ר אֲדֹנָ֣י יְהוִ֗ה הַֽאַתָּה־ה֨וּא אֲשֶׁר־דִּבַּ֜רְתִּי בְּיָמִ֣ים קַדְמוֹנִ֗ים בְּיַד֙ עֲבָדַי֙ נְבִיאֵ֣י יִשְׂרָאֵ֔ל הַֽנִּבְּאִ֛ים בַּיָּמִ֥ים הָהֵ֖ם שָׁנִ֑ים לְהָבִ֥יא אֹתְךָ֖ עֲלֵיהֶֽם׃ ס 17
१७परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्यावेळी, मी पूर्वी जे तुझ्याजवळ बोललो होतो, ते लोकांस आठवेल. मी माझ्या सेवकांचा, इस्राएलाच्या संदेष्ट्यांचा उपयोग केला हेही त्यांना आठवेल ‘मी तुला त्यांच्याविरुद्ध लढावयास आणिन असे इस्राएलाच्या संदेष्ट्यांनी, माझ्यावतीने, पूर्वीच सांगितल्याचे त्यांना स्मरेल.”
וְהָיָ֣ה ׀ בַּיּ֣וֹם הַה֗וּא בְּי֨וֹם בּ֥וֹא גוֹג֙ עַל־אַדְמַ֣ת יִשְׂרָאֵ֔ל נְאֻ֖ם אֲדֹנָ֣י יְהוִ֑ה תַּעֲלֶ֥ה חֲמָתִ֖י בְּאַפִּֽי׃ 18
१८म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जेव्हा गोग इस्राएल देशावर हल्ला करील त्या दिवसात असे होईल की माझ्या नाकपुड्या क्रोधाने फुरफुरतील.
וּבְקִנְאָתִ֥י בְאֵשׁ־עֶבְרָתִ֖י דִּבַּ֑רְתִּי אִם־לֹ֣א ׀ בַּיּ֣וֹם הַה֗וּא יִֽהְיֶה֙ רַ֣עַשׁ גָּד֔וֹל עַ֖ל אַדְמַ֥ת יִשְׂרָאֵֽל׃ 19
१९कारण मी आपल्या रागाच्या भरात आवेशाने व आपल्या क्रोधाग्नीने तप्त होऊन बोललो आहे. इस्राएल देशामध्ये त्या दिवशी खचित मोठा भूकंप होईल.
וְרָעֲשׁ֣וּ מִפָּנַ֡י דְּגֵ֣י הַיָּם֩ וְע֨וֹף הַשָּׁמַ֜יִם וְחַיַּ֣ת הַשָּׂדֶ֗ה וְכָל־הָרֶ֙מֶשׂ֙ הָרֹמֵ֣שׂ עַל־הָֽאֲדָמָ֔ה וְכֹל֙ הָֽאָדָ֔ם אֲשֶׁ֖ר עַל־פְּנֵ֣י הָאֲדָמָ֑ה וְנֶהֶרְס֣וּ הֶהָרִ֗ים וְנָֽפְלוּ֙ הַמַּדְרֵג֔וֹת וְכָל־חוֹמָ֖ה לָאָ֥רֶץ תִּפּֽוֹל׃ 20
२०त्यावेळी सर्व सजीव भीतीने कापतील. समुद्रातील मासे, हवेत भराऱ्या मारणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे सर्व छोटे जीव आणि सर्व माणसे ह्यांच्या भीतीने थरकाप उडेल. पर्वत व कडे कोसळतील. प्रत्येक भिंत जमीनदोस्त होईल.”
וְקָרָ֨אתִי עָלָ֤יו לְכָל־הָרַי֙ חֶ֔רֶב נְאֻ֖ם אֲדֹנָ֣י יְהוִ֑ה חֶ֥רֶב אִ֖ישׁ בְּאָחִ֥יו תִּֽהְיֶֽה׃ 21
२१कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपल्या सर्व पर्वतावर त्याच्याविरुध्द तलवार बोलावीन. प्रत्येक मनुष्याची तलवार आपल्या भावाविरूद्ध चालेल.
וְנִשְׁפַּטְתִּ֥י אִתּ֖וֹ בְּדֶ֣בֶר וּבְדָ֑ם וְגֶ֣שֶׁם שׁוֹטֵף֩ וְאַבְנֵ֨י אֶלְגָּבִ֜ישׁ אֵ֣שׁ וְגָפְרִ֗ית אַמְטִ֤יר עָלָיו֙ וְעַל־אֲגַפָּ֔יו וְעַל־עַמִּ֥ים רַבִּ֖ים אֲשֶׁ֥ר אִתּֽוֹ׃ 22
२२आणि मरी व रक्ताने मी त्याजबरोबर वाद मांडीन. त्याजवर, त्यांच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर जे पुष्कळ प्रकारचे लोक असतील त्यांच्यावर पुराचा पाऊस व मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांचा वर्षाव करीन.
וְהִתְגַּדִּלְתִּי֙ וְהִתְקַדִּשְׁתִּ֔י וְנ֣וֹדַעְתִּ֔י לְעֵינֵ֖י גּוֹיִ֣ם רַבִּ֑ים וְיָדְע֖וּ כִּֽי־אֲנִ֥י יְהוָֽה׃ ס 23
२३मग मी आपला महिमा व पवित्रता दाखवून देईन आणि माझी ओळख पुष्कळ राष्ट्रांना करून देईन; तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे.

< יְחֶזְקֵאל 38 >