< תְהִלִּים 58 >

לַמְנַצֵּ֥חַ אַל־תַּשְׁחֵ֗ת לְדָוִ֥ד מִכְתָּֽם׃ הַֽאֻמְנָ֗ם אֵ֣לֶם צֶ֭דֶק תְּדַבֵּר֑וּן מֵישָׁרִ֥ים תִּ֝שְׁפְּט֗וּ בְּנֵ֣י אָדָֽם׃ 1
दाविदाचे स्तोत्र अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का?
אַף־בְּלֵב֮ עֹולֹ֪ת תִּפְעָ֫ל֥וּן בָּאָ֡רֶץ חֲמַ֥ס יְ֝דֵיכֶ֗ם תְּפַלֵּֽסֽוּן׃ 2
नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता.
זֹ֣רוּ רְשָׁעִ֣ים מֵרָ֑חֶם תָּע֥וּ מִ֝בֶּ֗טֶן דֹּבְרֵ֥י כָזָֽב׃ 3
दुष्ट उदरापासूनच दुरावतात; ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात.
חֲמַת־לָ֗מֹו כִּדְמ֥וּת חֲמַת־נָחָ֑שׁ כְּמֹו־פֶ֥תֶן חֵ֝רֵ֗שׁ יַאְטֵ֥ם אָזְנֹֽו׃ 4
त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत;
אֲשֶׁ֣ר לֹא־יִ֭שְׁמַע לְקֹ֣ול מְלַחֲשִׁ֑ים חֹובֵ֖ר חֲבָרִ֣ים מְחֻכָּֽם׃ 5
गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत.
אֱ‍ֽלֹהִ֗ים הֲרָס־שִׁנֵּ֥ימֹו בְּפִ֑ימֹו מַלְתְּעֹ֥ות כְּ֝פִירִ֗ים נְתֹ֣ץ ׀ יְהוָֽה׃ 6
हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक;
יִמָּאֲס֣וּ כְמֹו־מַ֭יִם יִתְהַלְּכוּ־לָ֑מֹו יִדְרֹ֥ךְ חִצֹּו (חִ֝צָּ֗יו) כְּמֹ֣ו יִתְמֹלָֽלוּ׃ 7
जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत; जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत.
כְּמֹ֣ו שַׁ֭בְּלוּל תֶּ֣מֶס יַהֲלֹ֑ךְ נֵ֥פֶל אֵ֝֗שֶׁת בַּל־חָ֥זוּ שָֽׁמֶשׁ׃ 8
गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत.
בְּטֶ֤רֶם יָבִ֣ינוּ סִּֽירֹתֵיכֶ֣ם אָטָ֑ד כְּמֹו־חַ֥י כְּמֹו־חָ֝רֹ֗ון יִשְׂעָרֶֽנּוּ׃ 9
तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच, ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील.
יִשְׂמַ֣ח צַ֭דִּיק כִּי־חָזָ֣ה נָקָ֑ם פְּעָמָ֥יו יִ֝רְחַ֗ץ בְּדַ֣ם הָרָשָֽׁע׃ 10
१०नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल; तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल.
וְיֹאמַ֣ר אָ֭דָם אַךְ־פְּרִ֣י לַצַּדִּ֑יק אַ֥ךְ יֵשׁ־אֱ֝לֹהִ֗ים שֹׁפְטִ֥ים בָּאָֽרֶץ׃ 11
११म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”

< תְהִלִּים 58 >