< תְהִלִּים 27 >

לְדָוִ֨ד ׀ יְהוָ֤ה ׀ אֹורִ֣י וְ֭יִשְׁעִי מִמִּ֣י אִירָ֑א יְהוָ֥ה מָֽעֹוז־חַ֝יַּ֗י מִמִּ֥י אֶפְחָֽד׃ 1
दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे. मी कोणाचे भय बाळगू? परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे, मी कोणाची भीती बाळगू?
בִּקְרֹ֤ב עָלַ֨י ׀ מְרֵעִים֮ לֶאֱכֹ֪ל אֶת־בְּשָׂ֫רִ֥י צָרַ֣י וְאֹיְבַ֣י לִ֑י הֵ֖מָּה כָשְׁל֣וּ וְנָפָֽלוּ׃ 2
जेव्हा दुष्ट माझे मांस खायला जवळ आले, तेव्हा माझे शत्रू आणि माझे विरोधक अडखळून खाली पडले.
אִם־תַּחֲנֶ֬ה עָלַ֨י ׀ מַחֲנֶה֮ לֹֽא־יִירָ֪א לִ֫בִּ֥י אִם־תָּק֣וּם עָ֭לַי מִלְחָמָ֑ה בְּ֝זֹ֗את אֲנִ֣י בֹוטֵֽחַ׃ 3
जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला, माझे हृदय भयभीत होणार नाही. जरी माझ्याविरूद्ध युध्द उठले, तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन.
אַחַ֤ת ׀ שָׁאַ֣לְתִּי מֵֽאֵת־יְהוָה֮ אֹותָ֪הּ אֲבַ֫קֵּ֥שׁ שִׁבְתִּ֣י בְּבֵית־יְ֭הוָה כָּל־יְמֵ֣י חַיַּ֑י לַחֲזֹ֥ות בְּנֹֽעַם־יְ֝הוָ֗ה וּלְבַקֵּ֥ר בְּהֵיכָלֹֽו׃ 4
मी परमेश्वरास एक गोष्ट मागितली, तीच मी शोधीन, परमेश्वराची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस घालवेन, परमेश्वराच्या घरात मी वस्ती करीन.
כִּ֤י יִצְפְּנֵ֨נִי ׀ בְּסֻכֹּה֮ בְּיֹ֪ום רָ֫עָ֥ה יַ֭סְתִּרֵנִי בְּסֵ֣תֶר אָהֳלֹ֑ו בְּ֝צ֗וּר יְרֹומְמֵֽנִי׃ 5
कारण माझ्या संकट समयी तो माझे लपण्याचे ठिकाण आहे; तो मला त्याच्या तंबूत लपवेल, तो मला खडकावर उंच करील.
וְעַתָּ֨ה יָר֪וּם רֹאשִׁ֡י עַ֤ל אֹֽיְבַ֬י סְֽבִיבֹותַ֗י וְאֶזְבְּחָ֣ה בְ֭אָהֳלֹו זִבְחֵ֣י תְרוּעָ֑ה אָשִׁ֥ירָה וַ֝אֲזַמְּרָ֗ה לַיהוָֽה׃ 6
तेव्हा माझ्या सभोवती असणाऱ्या शत्रू समोर माझे मस्तक उंचावले जाईल, आणि त्याच्या मंडपात मी सदैव आनंदाचा यज्ञ अर्पण करणार, मी गाईन, होय! परमेश्वरास मी स्तुती गाईन.
שְׁמַע־יְהוָ֖ה קֹולִ֥י אֶקְרָ֗א וְחָנֵּ֥נִי וַעֲנֵֽנִי׃ 7
परमेश्वरा, मी तुला आरोळी करेन तेव्हा माझा आवाज ऐक! माझ्यावर दया कर आणि मला उत्तर दे.
לְךָ֤ ׀ אָמַ֣ר לִ֭בִּי בַּקְּשׁ֣וּ פָנָ֑י אֶת־פָּנֶ֖יךָ יְהוָ֣ה אֲבַקֵּֽשׁ׃ 8
माझे हृदय तुझ्या विषयी म्हणाले, त्याचे मुख शोध, हे परमेश्वरा, मी तुझे मुख शोधीन.
אַל־תַּסְתֵּ֬ר פָּנֶ֨יךָ ׀ מִמֶּנִּי֮ אַֽל־תַּט־בְּאַ֗ף עַ֫בְדֶּ֥ךָ עֶזְרָתִ֥י הָיִ֑יתָ אַֽל־תִּטְּשֵׁ֥נִי וְאַל־תַּֽ֝עַזְבֵ֗נִי אֱלֹהֵ֥י יִשְׁעִֽי׃ 9
तू आपले मुख माझ्यापासून लपवू नकोस; तुझ्या सेवकाला रागात फटकारू नकोस! तू माझा सहाय्यकर्ता होत आला आहेस; माझ्या तारण करणाऱ्या देवा, मला सोडू किंवा त्यागू नकोस.
כִּי־אָבִ֣י וְאִמִּ֣י עֲזָב֑וּנִי וַֽיהוָ֣ה יַֽאַסְפֵֽנִי׃ 10
१०जरी माझ्या आईवडीलांनी मला सोडून दिले तरी, परमेश्वर मला उचलून घेईल.
הֹ֤ורֵ֥נִי יְהוָ֗ה דַּ֫רְכֶּ֥ךָ וּ֭נְחֵנִי בְּאֹ֣רַח מִישֹׁ֑ור לְ֝מַ֗עַן שֹׁורְרָֽי׃ 11
११परमेश्वरा, तू मला तुझे मार्ग शिकव. माझ्या वैऱ्यामुळे, मला सपाट मार्गावर चालव.
אַֽל־תִּ֭תְּנֵנִי בְּנֶ֣פֶשׁ צָרָ֑י כִּ֥י קָֽמוּ־בִ֥י עֵֽדֵי־שֶׁ֝֗קֶר וִיפֵ֥חַ חָמָֽס׃ 12
१२माझा जीव शत्रूस देऊ नको, कारण खोटे साक्षी माझ्याविरूद्ध उठले आहेत, आणि ते हिंसक श्वास टाकतात.
ל̣ׄוּלֵ̣֗ׄא̣ׄ הֶ֭אֱמַנְתִּי לִרְאֹ֥ות בְּֽטוּב־יְהוָ֗ה בְּאֶ֣רֶץ חַיִּֽים׃ 13
१३जीवंताच्या भूमीत, जर परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला मी विश्वास केला नसता, तर मी कधीच माझी आशा सोडून दिली असती.
קַוֵּ֗ה אֶל־יְה֫וָ֥ה חֲ֭זַק וְיַאֲמֵ֣ץ לִבֶּ֑ךָ וְ֝קַוֵּ֗ה אֶל־יְהוָֽה׃ 14
१४परमेश्वराची वाट पाहा; मजबूत हो आणि तुझे हृदय धैर्यवान असो. परमेश्वराची वाट पाहा.

< תְהִלִּים 27 >