< תְהִלִּים 17 >

תְּפִלָּ֗ה לְדָ֫וִ֥ד שִׁמְעָ֤ה יְהוָ֨ה ׀ צֶ֗דֶק הַקְשִׁ֥יבָה רִנָּתִ֗י הַאֲזִ֥ינָה תְפִלָּתִ֑י בְּ֝לֹ֗א שִׂפְתֵ֥י מִרְמָֽה׃ 1
दाविदाची प्रार्थना. हे परमेश्वरा, न्यायासाठी माझी विनवणी ऐक. माझ्या रडण्याकडे लक्ष दे! माझ्या निष्कपट ओठातून जी प्रार्थना निघते तिच्याकडे कान दे.
מִ֭לְּפָנֶיךָ מִשְׁפָּטִ֣י יֵצֵ֑א עֵ֝ינֶ֗יךָ תֶּחֱזֶ֥ינָה מֵישָׁרִֽים׃ 2
तुझ्या उपस्थितीत माझा न्याय कर; जे खरे ते तुझे डोळे पाहोत.
בָּ֘חַ֤נְתָּ לִבִּ֨י ׀ פָּ֘קַ֤דְתָּ לַּ֗יְלָה צְרַפְתַּ֥נִי בַל־תִּמְצָ֑א זַ֝מֹּתִ֗י בַּל־יַעֲבָר־פִּֽי׃ 3
तू माझे हृदय पारखले आहे, रात्री तू झडती घेतली आहेस, तू मला गाळून पाहिले आहे, तरी तुला काही सापडत नाही, माझे तोंड पाप करणार नाही असा निश्चय मी केला आहे.
לִפְעֻלֹּ֣ות אָ֭דָם בִּדְבַ֣ר שְׂפָתֶ֑יךָ אֲנִ֥י שָׁ֝מַ֗רְתִּי אָרְחֹ֥ות פָּרִֽיץ׃ 4
मानवजातीच्या कृत्यांसंबंधित, तुझ्या ओठांच्या वचनांकडून मी आपणाला अनिष्ट करणाऱ्यांपासून राखले आहे.
תָּמֹ֣ךְ אֲ֭שֻׁרַי בְּמַעְגְּלֹותֶ֑יךָ בַּל־נָמֹ֥וטּוּ פְעָמָֽי׃ 5
माझ्या पावलांनी तुझे मार्ग घट्ट धरले आहेत, माझे पाय घसरले नाहीत.
אֲנִֽי־קְרָאתִ֣יךָ כִֽי־תַעֲנֵ֣נִי אֵ֑ל הַֽט־אָזְנְךָ֥ לִ֝֗י שְׁמַ֣ע אִמְרָתִֽי׃ 6
देवा, मी तुला हाक मारतो, कारण तू उत्तर देतोस, तुझे कान माझ्याकडे फिरव आणि माझे बोलने ऐक.
הַפְלֵ֣ה חֲ֭סָדֶיךָ מֹושִׁ֣יעַ חֹוסִ֑ים מִ֝מִּתְקֹומְמִ֗ים בִּֽימִינֶֽךָ׃ 7
जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्यामध्ये आश्रय घेणाऱ्यास त्यांच्या शत्रूंपासून वाचवतो, तो तू तुझी आश्चर्यजनक प्रेमदया दाखव.
שָׁ֭מְרֵנִי כְּאִישֹׁ֣ון בַּת־עָ֑יִן בְּצֵ֥ל כְּ֝נָפֶ֗יךָ תַּסְתִּירֵֽנִי׃ 8
तुझ्या डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण कर; मला तुझ्या पंखाच्या सावलीखाली लपव.
מִפְּנֵ֣י רְ֭שָׁעִים ז֣וּ שַׁדּ֑וּנִי אֹיְבַ֥י בְּ֝נֶ֗פֶשׁ יַקִּ֥יפוּ עָלָֽי׃ 9
वाईट लोक जे माझ्यावर हल्ला करतात, माझे शत्रू ज्यांनी मला घेरले आहे, त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
חֶלְבָּ֥מֹו סָּגְר֑וּ פִּ֝֗ימֹו דִּבְּר֥וּ בְגֵאֽוּת׃ 10
१०त्यांना कोणाची दया येत नाही, त्यांचे मुख गर्वाने बोलते.
אַ֭שֻּׁרֵינוּ עַתָּ֣ה סְבָבוּנִי (סְבָב֑וּנוּ) עֵינֵיהֶ֥ם יָ֝שִׁ֗יתוּ לִנְטֹ֥ות בָּאָֽרֶץ׃ 11
११त्यांनी माझ्या पावलांना घेरले आहे, मला भूमीवर पाडावयास ते आपली दृष्टी लावत आहेत.
דִּמְיֹנֹ֗ו כְּ֭אַרְיֵה יִכְסֹ֣וף לִטְרֹ֑וף וְ֝כִכְפִ֗יר יֹשֵׁ֥ב בְּמִסְתָּרֽ͏ִים׃ 12
१२एखाद्याचा बळी घेण्यास उत्सुक असणाऱ्या सिंहासारखे ते आहेत, जसा तरुण सिंह जो लपून बसला आहे.
קוּמָ֤ה יְהוָ֗ה קַדְּמָ֣ה פָ֭נָיו הַכְרִיעֵ֑הוּ פַּלְּטָ֥ה נַ֝פְשִׁ֗י מֵרָשָׁ֥ע חַרְבֶּֽךָ׃ 13
१३परमेश्वरा, ऊठ! त्यांच्यावर हल्ला कर! त्यांच्या तोंडावर त्यांना पाड! तुझ्या तलवारीने तू माझा जीव दुष्टापासून वाचव.
מִֽמְתִ֥ים יָדְךָ֨ ׀ יְהוָ֡ה מִֽמְתִ֬ים מֵחֶ֗לֶד חֶלְקָ֥ם בַּֽחַיִּים֮ וּצְפִינְךָ (וּֽצְפוּנְךָ֮) תְּמַלֵּ֪א בִ֫טְנָ֥ם יִשְׂבְּע֥וּ בָנִ֑ים וְהִנִּ֥יחוּ יִ֝תְרָ֗ם לְעֹולְלֵיהֽ͏ֶם׃ 14
१४परमेश्वरा, ज्यांचे वैभव या जीवनातच आहे, आणि ज्यांचे पोट तू आपल्या धनाने भरतोस, अशा मनुष्यांपासून तू आपल्या हाताने मला वाचव. ते आपल्या संततीने तृप्त आहेत, आणि ते आपले उरलेले द्रव्य आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवतात.
אֲנִ֗י בְּ֭צֶדֶק אֶחֱזֶ֣ה פָנֶ֑יךָ אֶשְׂבְּעָ֥ה בְ֝הָקִ֗יץ תְּמוּנָתֶֽךָ׃ 15
१५मी न्यायीपणात तुझे मुख पाहीन, जेव्हा मी जागा होईन, तेव्हा तुझ्या दर्शनाने मी समाधानी होईन.

< תְהִלִּים 17 >