< תְהִלִּים 108 >

שִׁ֖יר מִזְמֹ֣ור לְדָוִֽד׃ נָכֹ֣ון לִבִּ֣י אֱלֹהִ֑ים אָשִׁ֥ירָה וַ֝אֲזַמְּרָ֗ה אַף־כְּבֹודִֽי׃ 1
दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन.
ע֭וּרָֽה הַנֵּ֥בֶל וְכִנֹּ֗ור אָעִ֥ירָה שָּֽׁחַר׃ 2
हे सतार आणि वीणे, तुम्ही जागृत व्हा. मी पहाटेला जागे करीन.
אֹודְךָ֖ בָעַמִּ֥ים ׀ יְהוָ֑ה וַ֝אֲזַמֶּרְךָ֗ בַּל־אֻמִּֽים׃ 3
हे परमेश्वरा, मी तुला लोकांमध्ये धन्यवाद देईन; मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुतीगान गाईन.
כִּֽי־גָדֹ֣ול מֵֽעַל־שָׁמַ֣יִם חַסְדֶּ֑ךָ וְֽעַד־שְׁחָקִ֥ים אֲמִתֶּֽךָ׃ 4
कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे; आणि तुझी सत्यता आकाशाला पोहचली आहे.
ר֣וּמָה עַל־שָׁמַ֣יִם אֱלֹהִ֑ים וְעַ֖ל כָּל־הָאָ֣רֶץ כְּבֹודֶֽךָ׃ 5
हे देवा, तू आकांशाच्यावर उंचावलेला आहे. आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर होवो.
לְ֭מַעַן יֵחָלְצ֣וּן יְדִידֶ֑יךָ הֹושִׁ֖יעָה יְמִֽינְךָ֣ וַעֲנֵֽנִי׃ 6
म्हणून ज्यांना तू प्रेम करतो त्यांनी वाचावे, तुझ्या उजव्या हाताने आम्हास वाचव आणि मला उत्तर दे.
אֱלֹהִ֤ים ׀ דִּבֶּ֥ר בְּקָדְשֹׁ֗ו אֶעְלֹ֥זָה אֲחַלְּקָ֥ה שְׁכֶ֑ם וְעֵ֖מֶק סֻכֹּ֣ות אֲמַדֵּֽד׃ 7
देव आपल्या पवित्रतेत म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
לִ֤י גִלְעָ֨ד ׀ לִ֤י מְנַשֶּׁ֗ה וְ֭אֶפְרַיִם מָעֹ֣וז רֹאשִׁ֑י יְ֝הוּדָ֗ה מְחֹקְקִֽי׃ 8
गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे. एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे. यहूदा माझा राजदंड आहे.
מֹואָ֤ב ׀ סִ֬יר רַחְצִ֗י עַל־אֱ֭דֹום אַשְׁלִ֣יךְ נַעֲלִ֑י עֲלֵֽי־פְ֝לֶ֗שֶׁת אֶתְרֹועָֽע׃ 9
मवाब माझे स्नानाचे पात्र आहे. अदोमावर मी आपले पादत्राण फेकीन. मी पलिष्टीया विषयी विजयाने आरोळी करीन.”
מִ֣י יֹ֭בִלֵנִי עִ֣יר מִבְצָ֑ר מִ֖י נָחַ֣נִי עַד־אֱדֹֽום׃ 10
१०तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल? मला अदोमात कोण नेईल?
הֲלֹֽא־אֱלֹהִ֥ים זְנַחְתָּ֑נוּ וְֽלֹא־תֵצֵ֥א אֱ֝לֹהִ֗ים בְּצִבְאֹתֵֽינוּ׃ 11
११हे देवा, तू आम्हास नाकारले नाही का? तू आमच्या सैन्याबरोबर युद्धास गेला नाहीस.
הָֽבָה־לָּ֣נוּ עֶזְרָ֣ת מִצָּ֑ר וְ֝שָׁ֗וְא תְּשׁוּעַ֥ת אָדָֽם׃ 12
१२आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत दे, कारण मनुष्याची मदत निष्फळ आहे.
בֵּֽאלֹהִ֥ים נַעֲשֶׂה־חָ֑יִל וְ֝ה֗וּא יָב֥וּס צָרֵֽינוּ׃ 13
१३देवाच्या मदतीने आम्ही विजयी होऊ; तो आपल्या शत्रूला पायाखाली तुडवील.

< תְהִלִּים 108 >