< מִיכָה 7 >

אַ֣לְלַי לִ֗י כִּ֤י הָיִ֙יתִי֙ כְּאָסְפֵּי־קַ֔יִץ כְּעֹלְלֹ֖ת בָּצִ֑יר אֵין־אֶשְׁכֹּ֣ול לֶאֱכֹ֔ול בִּכּוּרָ֖ה אִוְּתָ֥ה נַפְשִֽׁי׃ 1
मला हायहाय! मी अस्वस्थ झालो आहे, कारण माझी स्थिती उन्हाळ्यातल्या वगळ फळांसारखी झाली आहे, काढणीच्या द्राक्षांसारखी झाली आहे, खायला एकही घोंस नाही, पण तरीही प्रथम पिकलेल्या अंजीर फळाची हाव आहे.
אָבַ֤ד חָסִיד֙ מִן־הָאָ֔רֶץ וְיָשָׁ֥ר בָּאָדָ֖ם אָ֑יִן כֻּלָּם֙ לְדָמִ֣ים יֶאֱרֹ֔בוּ אִ֥ישׁ אֶת־אָחִ֖יהוּ יָצ֥וּדוּ חֵֽרֶם׃ 2
धार्मिक मनुष्य पृथ्वीवरून नष्ट झाला आहे, आणि मनुष्यांमध्ये कोणीही सरळ नाही; ते सर्व रक्त पाडायला टपतात; ते प्रत्येकजण जाळे घेऊन आपल्या भावाची शिकार करतात.
עַל־הָרַ֤ע כַּפַּ֙יִם֙ לְהֵיטִ֔יב הַשַּׂ֣ר שֹׁאֵ֔ל וְהַשֹּׁפֵ֖ט בַּשִּׁלּ֑וּם וְהַגָּדֹ֗ול דֹּבֵ֨ר הַוַּ֥ת נַפְשֹׁ֛ו ה֖וּא וַֽיְעַבְּתֽוּהָ׃ 3
त्यांचे हात दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत. अधिकारी पैसे मागतात व न्यायाधीश लाच घेण्यास तयार आहेत. सामर्थ्यवान मनुष्या दुसऱ्याला आपल्या जिवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो. असे ते एकत्र येऊन योजना करतात.
טֹובָ֣ם כְּחֵ֔דֶק יָשָׁ֖ר מִמְּסוּכָ֑ה יֹ֤ום מְצַפֶּ֙יךָ֙ פְּקֻדָּתְךָ֣ בָ֔אָה עַתָּ֥ה תִהְיֶ֖ה מְבוּכָתָֽם׃ 4
त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडुपाप्रमाणे आहे. त्यातला अति सरळ तो काटेरी कुंपणापेक्षा वाईट आहे. हा दिवस, तुझ्या पाहारेकऱ्यांचा दिवस येतो, आता त्यांचा गोंधळ उडेल.
אַל־תַּאֲמִ֣ינוּ בְרֵ֔עַ אַֽל־תִּבְטְח֖וּ בְּאַלּ֑וּף מִשֹּׁכֶ֣בֶת חֵיקֶ֔ךָ שְׁמֹ֖ר פִּתְחֵי־פִֽיךָ׃ 5
कोणत्याही शेजाऱ्यावर विश्वास ठेवू नको. मित्रावरही विश्वास ठेवून राहू नको. तुझ्या उराशी जी स्त्री निजते तिला देखील काही सांगू नको, तू काय बोलतो त्या बद्दल सावध राहा.
כִּֽי־בֵן֙ מְנַבֵּ֣ל אָ֔ב בַּ֚ת קָמָ֣ה בְאִמָּ֔הּ כַּלָּ֖ה בַּחֲמֹתָ֑הּ אֹיְבֵ֥י אִ֖ישׁ אַנְשֵׁ֥י בֵיתֹֽו׃ 6
स्वत: च्या घरातील माणसेच वैरी होतील. मुलगा वडिलांना मान देणार नाही. मुलगी आईविरुध्द जाईल. सून सासूच्या विरोधात जाईल.
וַאֲנִי֙ בַּיהוָ֣ה אֲצַפֶּ֔ה אֹוחִ֖ילָה לֵאלֹהֵ֣י יִשְׁעִ֑י יִשְׁמָעֵ֖נִי אֱלֹהָֽי׃ 7
परंतू मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावीन, मी आपल्या तारणाऱ्या देवाची वाट पाहीन, माझा परमेश्वर माझे ऐकेल.
אַֽל־תִּשְׂמְחִ֤י אֹיַ֙בְתִּי֙ לִ֔י כִּ֥י נָפַ֖לְתִּי קָ֑מְתִּי כִּֽי־אֵשֵׁ֣ב בַּחֹ֔שֶׁךְ יְהוָ֖ה אֹ֥ור לִֽי׃ ס 8
माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका, मी तेव्हा उठेन. जेव्हा मी अंधारात बसेन तेव्हा परमेश्वर माझ्यासाठी प्रकाश होईल.
זַ֤עַף יְהוָה֙ אֶשָּׂ֔א כִּ֥י חָטָ֖אתִי לֹ֑ו עַד֩ אֲשֶׁ֨ר יָרִ֤יב רִיבִי֙ וְעָשָׂ֣ה מִשְׁפָּטִ֔י יֹוצִיאֵ֣נִי לָאֹ֔ור אֶרְאֶ֖ה בְּצִדְקָתֹֽו׃ 9
परमेश्वर माझा वाद करेल आणि माझा न्याय साधेल तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन, कारण मी त्याच्याविरुध्द पाप केले आहे. तो मला प्रकाशाकडे आणील, आणि त्याच्या न्यायीपणात त्याने मला सोडवलेले मी पाहीन.
וְתֵרֶ֤א אֹיַ֙בְתִּי֙ וּתְכַסֶּ֣הָ בוּשָׁ֔ה הָאֹמְרָ֣ה אֵלַ֔י אַיֹּ֖ו יְהוָ֣ה אֱלֹהָ֑יִךְ עֵינַי֙ תִּרְאֶ֣ינָּה בָּ֔הּ עַתָּ֛ה תִּֽהְיֶ֥ה לְמִרְמָ֖ס כְּטִ֥יט חוּצֹֽות׃ 10
१०मग माझा शत्रू हे पाहिल; “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” असे ज्याने मला म्हटले त्यास लाज झाकून टाकेल. माझे डोळे तिच्याकडे पाहतील, रस्त्यावरील चिखलाप्रमाने ती तुडवली जाईल.
יֹ֖ום לִבְנֹ֣ות גְּדֵרָ֑יִךְ יֹ֥ום הַה֖וּא יִרְחַק־חֹֽק׃ 11
११तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल. त्या दिवसात तुझी सीमा फार विस्तारीत होईल.
יֹ֥ום הוּא֙ וְעָדֶ֣יךָ יָבֹ֔וא לְמִנִּ֥י אַשּׁ֖וּר וְעָרֵ֣י מָצֹ֑ור וּלְמִנִּ֤י מָצֹור֙ וְעַד־נָהָ֔ר וְיָ֥ם מִיָּ֖ם וְהַ֥ר הָהָֽר׃ 12
१२त्या दिवसात ते अश्शूर देशातून आणि मिसर देशापासून, फरात नदीपर्यंतच्या प्रांतातून, दूरदूरच्या समुद्रतीरावरून व दूरदूरच्या पर्वताकडून लोक तुझ्याकडे येतील.
וְהָיְתָ֥ה הָאָ֛רֶץ לִשְׁמָמָ֖ה עַל־יֹֽשְׁבֶ֑יהָ מִפְּרִ֖י מַֽעַלְלֵיהֶֽם׃ ס 13
१३देशात राहणाऱ्या लोकांमुळे व त्यांच्या कृत्यांच्या फळांमुळे ओसाड होईल.
רְעֵ֧ה עַמְּךָ֣ בְשִׁבְטֶ֗ךָ צֹ֚אן נַֽחֲלָתֶ֔ךָ שֹׁכְנִ֣י לְבָדָ֔ד יַ֖עַר בְּתֹ֣וךְ כַּרְמֶ֑ל יִרְע֥וּ בָשָׁ֛ן וְגִלְעָ֖ד כִּימֵ֥י עֹולָֽם׃ 14
१४म्हणून तू आपल्या लोकांस, तुझ्या वतनाचा कळप जो रानात चरतो त्याला, आपल्या काठीने पाळ. जसे ते प्राचीन दिवसात तसे बाशानांत व गिलादांत ते चरोत.
כִּימֵ֥י צֵאתְךָ֖ מֵאֶ֣רֶץ מִצְרָ֑יִם אַרְאֶ֖נּוּ נִפְלָאֹֽות׃ 15
१५जेव्हा तू मिसरदेशातून बाहेर निघालास, त्या दिवसाप्रमाणे त्यास मी अद्भुत कृत्ये दाखवीन.
יִרְא֤וּ גֹויִם֙ וְיֵבֹ֔שׁוּ מִכֹּ֖ל גְּבֽוּרָתָ֑ם יָשִׂ֤ימוּ יָד֙ עַל־פֶּ֔ה אָזְנֵיהֶ֖ם תֶּחֱרַֽשְׁנָה׃ 16
१६राष्ट्रे ते चमत्कार पाहतील व आपल्या सर्व बलाविषयी लज्जित होतील. ती आपला हात आपल्या मुखाला लावतील, त्यांचे कान बहिरे होतील.
יְלַחֲכ֤וּ עָפָר֙ כַּנָּחָ֔שׁ כְּזֹחֲלֵ֣י אֶ֔רֶץ יִרְגְּז֖וּ מִמִּסְגְּרֹֽתֵיהֶ֑ם אֶל־יְהוָ֤ה אֱלֹהֵ֙ינוּ֙ יִפְחָ֔דוּ וְיִֽרְא֖וּ מִמֶּֽךָּ׃ 17
१७ते सापाप्रमाणे धुळ चाटतील, भूमीतल्या सरपटणाऱ्यांप्रमाणे ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर निघतील. परमेश्वर आमचा देव याच्याकडे ती भयभीत होऊन येतील, आणि ते तुझ्यामुळे घाबरतील.
מִי־אֵ֣ל כָּמֹ֗וךָ נֹשֵׂ֤א עָוֹן֙ וְעֹבֵ֣ר עַל־פֶּ֔שַׁע לִשְׁאֵרִ֖ית נַחֲלָתֹ֑ו לֹא־הֶחֱזִ֤יק לָעַד֙ אַפֹּ֔ו כִּֽי־חָפֵ֥ץ חֶ֖סֶד הֽוּא׃ 18
१८तुझ्यासारखा देव कोण आहे? जो तू पापांची क्षमा करतोस आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतो. तो अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणार नाही, कारण त्यास दयाळू व्हायला आवडते.
יָשׁ֣וּב יְרַֽחֲמֵ֔נוּ יִכְבֹּ֖שׁ עֲוֹֽנֹתֵ֑ינוּ וְתַשְׁלִ֛יךְ בִּמְצֻלֹ֥ות יָ֖ם כָּל־חַטֹּאותָֽם׃ 19
१९तो आम्हावर पुन्हा दया करील; तो आमच्या पापांचा आपल्या पायाखाली चुराडा करील आणि आमची सर्व पापे समुद्रात खोलवर फेकून देईल.
תִּתֵּ֤ן אֱמֶת֙ לְיַֽעֲקֹ֔ב חֶ֖סֶד לְאַבְרָהָ֑ם אֲשֶׁר־נִשְׁבַּ֥עְתָּ לַאֲבֹתֵ֖ינוּ מִ֥ימֵי קֶֽדֶם׃ 20
२०पुरातन दिवसात आमच्या पूर्वजांशी तू ज्याविषयी शपथ वाहीली ती अशी की, तू याकोबाला सत्यता आणि अब्राहामाला कराराचा विश्वासूपणा देशील.

< מִיכָה 7 >