< יִרְמְיָהוּ 47 >

אֲשֶׁ֨ר הָיָ֧ה דְבַר־יְהוָ֛ה אֶל־יִרְמְיָ֥הוּ הַנָּבִ֖יא אֶל־פְּלִשְׁתִּ֑ים בְּטֶ֛רֶם יַכֶּ֥ה פַרְעֹ֖ה אֶת־עַזָּֽה׃ ס 1
यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराकडून पलिष्ट्यांबाबत जे वचन आले ते हे आहे. फारोने गज्जावर हल्ला करण्यापूर्वी हे वचन त्याच्याकडे आले.
כֹּ֣ה ׀ אָמַ֣ר יְהוָ֗ה הִנֵּה־מַ֜יִם עֹלִ֤ים מִצָּפֹון֙ וְהָיוּ֙ לְנַ֣חַל שֹׁוטֵ֔ף וְיִשְׁטְפוּ֙ אֶ֣רֶץ וּמְלֹואָ֔הּ עִ֖יר וְיֹ֣שְׁבֵי בָ֑הּ וְזָֽעֲקוּ֙ הָֽאָדָ֔ם וְהֵילִ֕ל כֹּ֖ל יֹושֵׁ֥ב הָאָֽרֶץ׃ 2
परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, उत्तरेला पुराचे पाणी चढत आहे. ते तुडूंब भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे होत आहे! मग देश व त्यातील सर्वकाही, नगरे आणि त्यातील रहिवासी यांना ते बुडवून टाकतील. म्हणून प्रत्येकजण मदतीसाठी आक्रोश करतील, आणि त्या देशात राहणारे सर्व विलाप करतील.
מִקֹּ֗ול שַֽׁעֲטַת֙ פַּרְסֹ֣ות אַבִּירָ֔יו מֵרַ֣עַשׁ לְרִכְבֹּ֔ו הֲמֹ֖ון גַּלְגִּלָּ֑יו לֹֽא־הִפְנ֤וּ אָבֹות֙ אֶל־בָּנִ֔ים מֵֽרִפְיֹ֖ון יָדָֽיִם׃ 3
त्यांच्या बलवान घोड्यांच्या टापांच्या आवाजामुळे, त्यांच्या रथांचा गडगडाट व त्यांच्या चाकांचा खडखडाट, आपल्या स्वतःच्या अशक्तपणामुळे वडील आपल्या मुलांना ते मदत करु शकणार नाहीत.
עַל־הַיֹּ֗ום הַבָּא֙ לִשְׁדֹ֣וד אֶת־כָּל־פְּלִשְׁתִּ֔ים לְהַכְרִ֤ית לְצֹר֙ וּלְצִידֹ֔ון כֹּ֖ל שָׂרִ֣יד עֹזֵ֑ר כִּֽי־שֹׁדֵ֤ד יְהוָה֙ אֶת־פְּלִשְׁתִּ֔ים שְׁאֵרִ֖ית אִ֥י כַפְתֹּֽור׃ 4
कारण सर्व पलिष्ट्यांच्या नाशाची वेळ आली आहे, सोर आणि सीदोन यांतून वाचलेला प्रत्येक जो कोणी त्यांचे सहाय्य करणारा त्याचा नाश होईल. कारण परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोराच्या द्विपातील वाचलेल्यांचाही नाश करणार आहे.
בָּ֤אָה קָרְחָה֙ אֶל־עַזָּ֔ה נִדְמְתָ֥ה אַשְׁקְלֹ֖ון שְׁאֵרִ֣ית עִמְקָ֑ם עַד־מָתַ֖י תִּתְגֹּודָֽדִי׃ ס 5
गज्जाला टक्कल पडले आहे. त्यांच्या खोऱ्यातील उरलेले अष्कलोनाचे लोक शांत झाले आहेत. तुम्ही कोठवर शोकाने आपल्या स्वत: ला जखमा करून घेणार?
הֹ֗וי חֶ֚רֶב לַֽיהוָ֔ה עַד־אָ֖נָה לֹ֣א תִשְׁקֹ֑טִי הֵאָֽסְפִי֙ אַל־תַּעְרֵ֔ךְ הֵרָגְעִ֖י וָדֹֽמִּי׃ 6
हे परमेश्वराच्या तलवारी, तू किती वेळपर्यंत शांत राहणार? तू परत आपल्या म्यानात जा. थांब आणि शांत रहा.
אֵ֣יךְ תִּשְׁקֹ֔טִי וַֽיהוָ֖ה צִוָּה־לָ֑הּ אֶֽל־אַשְׁקְלֹ֛ון וְאֶל־חֹ֥וף הַיָּ֖ם שָׁ֥ם יְעָדָֽהּ׃ ס 7
तू शांत कशी राहू शकशील, कारण परमेश्वराने तुला आज्ञा दिली आहे. त्याने अष्कलोनाविरूद्ध व समुद्रकिनाऱ्याविरूद्ध हल्ला करण्यास तिला नेमले आहे.”

< יִרְמְיָהוּ 47 >