< יְשַׁעְיָהוּ 59 >
הֵ֛ן לֹֽא־קָצְרָ֥ה יַד־יְהוָ֖ה מֵֽהֹושִׁ֑יעַ וְלֹא־כָבְדָ֥ה אָזְנֹ֖ו מִשְּׁמֹֽועַ׃ | 1 |
१पाहा, तारण करवत नाही इतका परमेश्वराचा हात लहान झालेला नाही, आणि ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.
כִּ֤י אִם־עֲוֹנֹֽתֵיכֶם֙ הָי֣וּ מַבְדִּלִ֔ים בֵּינֵכֶ֕ם לְבֵ֖ין אֱלֹֽהֵיכֶ֑ם וְחַטֹּֽאותֵיכֶ֗ם הִסְתִּ֧ירוּ פָנִ֛ים מִכֶּ֖ם מִשְּׁמֹֽועַ׃ | 2 |
२तर तुमच्या पापमय कृत्यांनी तुम्हास तुमच्या परमेश्वरापासून वेगळे केले आहे. आणि तुमच्या पापांनी त्यास आपले मुख लपवण्यास आणि तुमचे न ऐकण्यास भाग पाडले आहे.
כִּ֤י כַפֵּיכֶם֙ נְגֹאֲל֣וּ בַדָּ֔ם וְאֶצְבְּעֹותֵיכֶ֖ם בֶּֽעָוֹ֑ן שִׂפְתֹֽותֵיכֶם֙ דִּבְּרוּ־שֶׁ֔קֶר לְשֹׁונְכֶ֖ם עַוְלָ֥ה תֶהְגֶּֽה׃ | 3 |
३कारण तुमचे हात रक्ताने माखले आहेत व तुमची बोटे अपराधांमुळे विटाळली आहेत. तुमचे ओठ खोटे बोलतात आणि तुमची जीभ द्वेष उच्चारते.
אֵין־קֹרֵ֣א בְצֶ֔דֶק וְאֵ֥ין נִשְׁפָּ֖ט בֶּאֱמוּנָ֑ה בָּטֹ֤וחַ עַל־תֹּ֙הוּ֙ וְדַבֶּר־שָׁ֔וְא הָרֹ֥ו עָמָ֖ל וְהֹולֵ֥יד אָֽוֶן׃ | 4 |
४कोणीही न्यायीपणाने दावा सांगत नाही, आणि कोणीही सत्यात आपली बाजू मांडत नाही. ते पोकळ शब्दांवर विश्वास ठेवतात आणि खोटे बोलतात, ते दुष्टाईची गर्भधारणा करून अन्यायाला जन्म देतात.
בֵּיצֵ֤י צִפְעֹונִי֙ בִּקֵּ֔עוּ וְקוּרֵ֥י עַכָּבִ֖ישׁ יֶאֱרֹ֑גוּ הָאֹכֵ֤ל מִבֵּֽיצֵיהֶם֙ יָמ֔וּת וְהַזּוּרֶ֖ה תִּבָּקַ֥ע אֶפְעֶֽה׃ | 5 |
५ते विषारी सापाची अंडी उबवितात आणि कोळ्याचे जाळे विणतात. जो त्याची अंडी खातो तो मरतो, आणि ते तुम्ही फोडले असता त्यातून सर्पच निघतो.
קֽוּרֵיהֶם֙ לֹא־יִהְי֣וּ לְבֶ֔גֶד וְלֹ֥א יִתְכַּסּ֖וּ בְּמַֽעֲשֵׂיהֶ֑ם מַֽעֲשֵׂיהֶם֙ מַֽעֲשֵׂי־אָ֔וֶן וּפֹ֥עַל חָמָ֖ס בְּכַפֵּיהֶֽם׃ | 6 |
६त्यांनी बनविलेल्या जाळ्याचा उपयोग कपड्यांसाठी होऊ शकत नाही आणि त्यांचे अंग ते आपल्या कृत्यांनी झाकू शकणार नाहीत. त्यांची कृत्ये ही पापाची कृत्ये आहेत, आणि त्यांच्या हातात हिंसेची कामे आहेत.
רַגְלֵיהֶם֙ לָרַ֣ע יָרֻ֔צוּ וִֽימַהֲר֔וּ לִשְׁפֹּ֖ךְ דָּ֣ם נָקִ֑י מַחְשְׁבֹֽותֵיהֶם֙ מַחְשְׁבֹ֣ות אָ֔וֶן שֹׁ֥ד וָשֶׁ֖בֶר בִּמְסִלֹּותָֽם׃ | 7 |
७त्यांचे पाय दुष्कर्माकडे धावतात, आणि निष्पाप रक्त पाडायला ते घाई करतात. त्यांचे विचार हे अन्यायाचे विचार आहेत, हिंसा आणि नाश हे त्यांचे मार्ग आहेत.
דֶּ֤רֶךְ שָׁלֹום֙ לֹ֣א יָדָ֔עוּ וְאֵ֥ין מִשְׁפָּ֖ט בְּמַעְגְּלֹותָ֑ם נְתִיבֹֽותֵיהֶם֙ עִקְּשׁ֣וּ לָהֶ֔ם כֹּ֚ל דֹּרֵ֣ךְ בָּ֔הּ לֹ֥א יָדַ֖ע שָׁלֹֽום׃ | 8 |
८त्यांना शांतीचा मार्ग माहित नाही, आणि त्यांच्या वाटेत न्याय आढळत नाही. त्यांनी कुटिल मार्ग स्थापिले, आणि जो कोणी या मार्गात प्रवास करतो तो शांतता ओळखत नाही.
עַל־כֵּ֗ן רָחַ֤ק מִשְׁפָּט֙ מִמֶּ֔נּוּ וְלֹ֥א תַשִּׂיגֵ֖נוּ צְדָקָ֑ה נְקַוֶּ֤ה לָאֹור֙ וְהִנֵּה־חֹ֔שֶׁךְ לִנְגֹהֹ֖ות בָּאֲפֵלֹ֥ות נְהַלֵּֽךְ׃ | 9 |
९यास्तव न्याय आम्हापासून दूर आहे, आणि चांगुलपणा आमच्यापर्यंत पोहचत नाही. आम्ही प्रकाशासाठी थांबतो, पण पाहा अंधार; आम्ही तेज शोधतो, पण आम्ही काळोखात चालतो.
נְגַֽשְׁשָׁ֤ה כַֽעִוְרִים֙ קִ֔יר וּכְאֵ֥ין עֵינַ֖יִם נְגַשֵּׁ֑שָׁה כָּשַׁ֤לְנוּ בַֽצָּהֳרַ֙יִם֙ כַּנֶּ֔שֶׁף בָּאַשְׁמַנִּ֖ים כַּמֵּתִֽים׃ | 10 |
१०आम्ही आंधळ्यांप्रमाणे भिंती चाचपतो, त्याप्रमाणे जे पाहू शकत नाहीत. रात्री अडखळून पडावे तसे आम्ही भर दूपारी पडतो; बलवानांमध्ये आम्ही मरण पावलेल्या मनुष्यांप्रमाणे आहोत.
נֶהֱמֶ֤ה כַדֻּבִּים֙ כֻּלָּ֔נוּ וְכַיֹּונִ֖ים הָגֹ֣ה נֶהְגֶּ֑ה נְקַוֶּ֤ה לַמִּשְׁפָּט֙ וָאַ֔יִן לִֽישׁוּעָ֖ה רָחֲקָ֥ה מִמֶּֽנּוּ׃ | 11 |
११आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो आणि कबुतरांसारखे फिरतो, आम्ही न्यायाची वाट पाहातो पण काही नाही; तारणाची वाट पाहतो परंतु ते आम्हापासून फार दूर आहे.
כִּֽי־רַבּ֤וּ פְשָׁעֵ֙ינוּ֙ נֶגְדֶּ֔ךָ וְחַטֹּאותֵ֖ינוּ עָ֣נְתָה בָּ֑נוּ כִּֽי־פְשָׁעֵ֣ינוּ אִתָּ֔נוּ וַעֲוֹנֹתֵ֖ינוּ יְדַֽעֲנֽוּם׃ | 12 |
१२कारण तुझ्यासमोर आमचे अपराध पुष्कळ आहेत, आणि आमची पातके आम्हांविरूद्ध साक्ष देतात. कारण आमचे अपराध आमच्या सोबत आहेत, आणि आम्हांस आमची पातके माहीत आहेत.
פָּשֹׁ֤עַ וְכַחֵשׁ֙ בַּֽיהוָ֔ה וְנָסֹ֖וג מֵאַחַ֣ר אֱלֹהֵ֑ינוּ דַּבֶּר־עֹ֣שֶׁק וְסָרָ֔ה הֹרֹ֧ו וְהֹגֹ֛ו מִלֵּ֖ב דִּבְרֵי־שָֽׁקֶר׃ | 13 |
१३आम्ही बंड केले, परमेश्वरास नकारले आणि आमच्या देवाला अनुसरण्याचे सोडून दूर फिरलो आहे. आम्ही खंडणी बद्दल बोललो आणि बाजूला वळलो आहो, वाईट गोष्टींचा विचार केला व मनात दुष्ट बेत केले.
וְהֻסַּ֤ג אָחֹור֙ מִשְׁפָּ֔ט וּצְדָקָ֖ה מֵרָחֹ֣וק תַּעֲמֹ֑ד כִּֽי־כָשְׁלָ֤ה בָֽרְחֹוב֙ אֱמֶ֔ת וּנְכֹחָ֖ה לֹא־תוּכַ֥ל לָבֹֽוא׃ | 14 |
१४न्यायास मागे ढकलण्यात आले आहे, आणि प्रामाणिकपणा फार दूर उभा आहे. सत्य सार्वजनिक चौकात पडले आहे, आणि सरळपण आत येऊ शकत नाही.
וַתְּהִ֤י הָֽאֱמֶת֙ נֶעְדֶּ֔רֶת וְסָ֥ר מֵרָ֖ע מִשְׁתֹּולֵ֑ל וַיַּ֧רְא יְהוָ֛ה וַיֵּ֥רַע בְּעֵינָ֖יו כִּֽי־אֵ֥ין מִשְׁפָּֽט׃ | 15 |
१५सत्य जात राहिले आणि दुष्कर्मापासून दूर फिरणारे बळी पडतात. परमेश्वराने पाहिले पण त्यास कोठेच चांगुलपणा सापडला नाही, परमेश्वरास हे आवडले नाही.
וַיַּרְא֙ כִּֽי־אֵ֣ין אִ֔ישׁ וַיִּשְׁתֹּומֵ֖ם כִּ֣י אֵ֣ין מַפְגִּ֑יעַ וַתֹּ֤ושַֽׁע לֹו֙ זְרֹעֹ֔ו וְצִדְקָתֹ֖ו הִ֥יא סְמָכָֽתְהוּ׃ | 16 |
१६त्याने पाहिले की कोणी मनुष्य नाही, आणि कोणी मध्यस्थही नाही. तेव्हा त्याच्याच बाहूने त्याच्याकडे तारण आणले, आणि त्याच्याच न्यायीपणाने त्यास आधार दिला.
וַיִּלְבַּ֤שׁ צְדָקָה֙ כַּשִּׁרְיָ֔ן וְכֹ֥ובַע יְשׁוּעָ֖ה בְּרֹאשֹׁ֑ו וַיִּלְבַּ֞שׁ בִּגְדֵ֤י נָקָם֙ תִּלְבֹּ֔שֶׁת וַיַּ֥עַט כַּמְעִ֖יל קִנְאָֽה׃ | 17 |
१७त्याने चांगुलपणाचे चिलखत घातले, तारणाचे शिरस्त्राण आपल्या डोक्यावर घातले, त्याने सूडाचे वस्र परिधान केले आणि जसा झग्याने तसा तो आवेशाने वेष्टिलेला होता.
כְּעַ֤ל גְּמֻלֹות֙ כְּעַ֣ל יְשַׁלֵּ֔ם חֵמָ֣ה לְצָרָ֔יו גְּמ֖וּל לְאֹֽיְבָ֑יו לָאִיִּ֖ים גְּמ֥וּל יְשַׁלֵּֽם׃ | 18 |
१८त्यांच्या कृत्याप्रमाणेच तो त्यांना परतफेड करील, त्याच्या शत्रूस क्रोध, वैऱ्यास प्रतिफल भरून देईल, द्वीपांना दंड म्हणून त्यांचा प्रतिफळ देईल.
וְיִֽירְא֤וּ מִֽמַּעֲרָב֙ אֶת־שֵׁ֣ם יְהוָ֔ה וּמִמִּזְרַח־שֶׁ֖מֶשׁ אֶת־כְּבֹודֹ֑ו כִּֽי־יָבֹ֤וא כַנָּהָר֙ צָ֔ר ר֥וּחַ יְהוָ֖ה נֹ֥סְסָה בֹֽו׃ | 19 |
१९ह्याप्रकारे पश्चिमेपासून ते परमेश्वराच्या नावाचे भय धरतील, आणि सुर्याच्या उदयापासून त्याच्या प्रतापाचे भय धरतील. कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे येतील तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्यांच्याविरुद्ध झेंडा उभारिल.
וּבָ֤א לְצִיֹּון֙ גֹּואֵ֔ל וּלְשָׁבֵ֥י פֶ֖שַׁע בְּיַֽעֲקֹ֑ב נְאֻ֖ם יְהוָֽה׃ | 20 |
२०मग तारणारा सियोनेकडे येईल आणि याकोबात जे अपराधापासून वळतात त्यांच्याकडेही येईल, परमेश्वर असे म्हणतो.
וַאֲנִ֗י זֹ֣את בְּרִיתִ֤י אֹותָם֙ אָמַ֣ר יְהוָ֔ה רוּחִי֙ אֲשֶׁ֣ר עָלֶ֔יךָ וּדְבָרַ֖י אֲשֶׁר־שַׂ֣מְתִּי בְּפִ֑יךָ לֹֽא־יָמ֡וּשׁוּ מִפִּיךָ֩ וּמִפִּ֨י זַרְעֲךָ֜ וּמִפִּ֨י זֶ֤רַע זַרְעֲךָ֙ אָמַ֣ר יְהוָ֔ה מֵעַתָּ֖ה וְעַד־עֹולָֽם׃ ס | 21 |
२१परमेश्वर म्हणतो, त्याच्याशी माझा करार हाच आहे, माझा आत्मा जो तुझ्यात आहे आणि माझे शब्द जे मी तुझ्या मुखात टाकले, ते तुझ्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून किंवा तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखातून आतापासून सर्वकाळपर्यंत निघून जाणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.