< יְשַׁעְיָהוּ 34 >
קִרְב֤וּ גֹויִם֙ לִשְׁמֹ֔עַ וּלְאֻמִּ֖ים הַקְשִׁ֑יבוּ תִּשְׁמַ֤ע הָאָ֙רֶץ֙ וּמְלֹאָ֔הּ תֵּבֵ֖ל וְכָל־צֶאֱצָאֶֽיהָ׃ | 1 |
१तुम्ही राष्ट्रांनो, जवळ या व ऐका; तुम्ही लोकांनो, लक्ष द्या! पृथ्वी व तीने भरलेल्या, जग आणि त्यातून येणाऱ्या सर्व गोष्टी ऐकोत.
כִּ֣י קֶ֤צֶף לַֽיהוָה֙ עַל־כָּל־הַגֹּויִ֔ם וְחֵמָ֖ה עַל־כָּל־צְבָאָ֑ם הֶחֱרִימָ֖ם נְתָנָ֥ם לַטָּֽבַח׃ | 2 |
२कारण सर्व राष्ट्रावर परमेश्वर रागावला आहे आणि त्यांच्या सैन्यांविरूद्ध संताप झाला आहे; त्याने त्यांचा समूळ नाश केला आहे. त्याने त्यांचा संहार करण्यासाठी त्यांच्या हवाली केले आहे.
וְחַלְלֵיהֶ֣ם יֻשְׁלָ֔כוּ וּפִגְרֵיהֶ֖ם יַעֲלֶ֣ה בָאְשָׁ֑ם וְנָמַ֥סּוּ הָרִ֖ים מִדָּמָֽם׃ | 3 |
३त्यांच्यातील वधलेल्यास न पुरताच ठेवून देतील; त्यांच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्वत्र पसरेल, आणि त्यांच्या रक्ताने पर्वत भिजून चिंब होईल.
וְנָמַ֙קּוּ֙ כָּל־צְבָ֣א הַשָּׁמַ֔יִם וְנָגֹ֥לּוּ כַסֵּ֖פֶר הַשָּׁמָ֑יִם וְכָל־צְבָאָ֣ם יִבֹּ֔ול כִּנְבֹ֤ל עָלֶה֙ מִגֶּ֔פֶן וּכְנֹבֶ֖לֶת מִתְּאֵנָֽה׃ | 4 |
४आकाशातील सर्व तारे निस्तेज होतील, आणि एखाद्या गुंडाळीप्रमाणे आकाश गुंडाळले जाईल; आणि सर्व तारे लुप्त होतील, जसे द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, जसा अंजिराच्या झाडाचा सुकलेला पाला गळून पडतो.
כִּֽי־רִוְּתָ֥ה בַשָּׁמַ֖יִם חַרְבִּ֑י הִנֵּה֙ עַל־אֱדֹ֣ום תֵּרֵ֔ד וְעַל־עַ֥ם חֶרְמִ֖י לְמִשְׁפָּֽט׃ | 5 |
५ज्यावेळेस माझी स्वर्गीय तलवार रक्ताने माखेल, पाहा, ती आता अदोमावर उतरली आहे, ज्या लोकांचा समूळ नायनाट करण्याचे मी ठरविले आहे त्यांच्यावर ती उतरेल.
חֶ֣רֶב לַיהוָ֞ה מָלְאָ֥ה דָם֙ הֻדַּ֣שְׁנָה מֵחֵ֔לֶב מִדַּ֤ם כָּרִים֙ וְעַתּוּדִ֔ים מֵחֵ֖לֶב כִּלְיֹ֣ות אֵילִ֑ים כִּ֣י זֶ֤בַח לַֽיהוָה֙ בְּבָצְרָ֔ה וְטֶ֥בַח גָּדֹ֖ול בְּאֶ֥רֶץ אֱדֹֽום׃ | 6 |
६परमेश्वराची तलवार आच्छादली असून रक्त गाळीत आहे, ती कोकऱ्यांच्या आणि बोकड्यांच्या रक्ताने माखली असून मेंढ्याच्या गुर्द्यांच्या चरबीने पुष्ट झाली आहे. कारण परमेश्वर बस्रा नगरात यज्ञबली व अदोमाच्या भूमीत मोठा संहार करणार आहे.
וְיָרְד֤וּ רְאֵמִים֙ עִמָּ֔ם וּפָרִ֖ים עִם־אַבִּירִ֑ים וְרִוְּתָ֤ה אַרְצָם֙ מִדָּ֔ם וַעֲפָרָ֖ם מֵחֵ֥לֶב יְדֻשָּֽׁן׃ | 7 |
७रानबैलांची आणि तरूण बैलाबरोबर, वृद्धाची त्यांच्याबरोबर कत्तल करण्यात येईल. त्यांची भूमी रक्त पिईल व तेथील धुळीमध्ये चरबीच चरबी असेल.
כִּ֛י יֹ֥ום נָקָ֖ם לַֽיהוָ֑ה שְׁנַ֥ת שִׁלּוּמִ֖ים לְרִ֥יב צִיֹּֽון׃ | 8 |
८कारण सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस आहे. आणि सियोनेवर अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे.
וְנֶהֶפְכ֤וּ נְחָלֶ֙יהָ֙ לְזֶ֔פֶת וַעֲפָרָ֖הּ לְגָפְרִ֑ית וְהָיְתָ֣ה אַרְצָ֔הּ לְזֶ֖פֶת בֹּעֵרָֽה׃ | 9 |
९अदोमातील प्रवाह बदलून डांबर होतील, तिची धूळ गंधक होईल, आणि त्याची भूमी जळत्या डांबराप्रमाणे होईल.
לַ֤יְלָה וְיֹומָם֙ לֹ֣א תִכְבֶּ֔ה לְעֹולָ֖ם יַעֲלֶ֣ה עֲשָׁנָ֑הּ מִדֹּ֤ור לָדֹור֙ תֶּחֱרָ֔ב לְנֵ֣צַח נְצָחִ֔ים אֵ֥ין עֹבֵ֖ר בָּֽהּ׃ | 10 |
१०तो रात्र व दिवस पेटत राहील. त्याचा धूर निरंतर वर चढत जाईल. ती पिढ्यानपिढ्यापासून ओसाड पडेल; सर्वकाळपर्यंत कोणी तिच्यावरून चालणार नाही.
וִירֵשׁ֙וּהָ֙ קָאַ֣ת וְקִפֹּ֔וד וְיַנְשֹׁ֥וף וְעֹרֵ֖ב יִשְׁכְּנוּ־בָ֑הּ וְנָטָ֥ה עָלֶ֛יהָ קַֽו־תֹ֖הוּ וְאַבְנֵי־בֹֽהוּ׃ | 11 |
११पण हिंस्त्र पक्षी आणि प्राणी तिथे राहतील; घुबडे आणि डोमकावळे तेथे आपली घरटी करतील. तो तिच्यावर अस्ताव्यस्ततेची दोरी ताणील आणि ओसाडीचा ओळंबा लावील.
חֹרֶ֥יהָ וְאֵֽין־שָׁ֖ם מְלוּכָ֣ה יִקְרָ֑אוּ וְכָל־שָׂרֶ֖יהָ יִ֥הְיוּ אָֽפֶס׃ | 12 |
१२तिच्या सरदारांना राज्यावर बोलावतील पण तेथे त्यातले कोण असणार नाहीत, आणि तिचे सर्व अधिपती नाहीसे होतील.
וְעָלְתָ֤ה אַרְמְנֹתֶ֙יהָ֙ סִירִ֔ים קִמֹּ֥ושׂ וָחֹ֖וחַ בְּמִבְצָרֶ֑יהָ וְהָיְתָה֙ נְוֵ֣ה תַנִּ֔ים חָצִ֖יר לִבְנֹ֥ות יַעֲנָֽה׃ | 13 |
१३तिच्या महालात काटेरी झाडे वाढतील, आणि तिच्या किल्ल्यात खाजकुईलीची झाडे व काट्यांची झाडे उगवतील. ती कोल्ह्यांचे वस्तीस्थान, शहामृगाचे अंगण होईल.
וּפָגְשׁ֤וּ צִיִּים֙ אֶת־אִיִּ֔ים וְשָׂעִ֖יר עַל־רֵעֵ֣הוּ יִקְרָ֑א אַךְ־שָׁם֙ הִרְגִּ֣יעָה לִּילִ֔ית וּמָצְאָ֥ה לָ֖הּ מָנֹֽוחַ׃ | 14 |
१४हिंस्त्रपशू तरसांबरोबर तेथे भेटतील आणि रानबोकडे एकमेकास हाक मारतील. आपल्या मित्रांना हाका मारतील. निशाचर प्राणीही तेथे राहतील व त्यास विश्रांतीचे स्थान मिळेल.
שָׁ֣מָּה קִנְּנָ֤ה קִפֹּוז֙ וַתְּמַלֵּ֔ט וּבָקְעָ֖ה וְדָגְרָ֣ה בְצִלָּ֑הּ אַךְ־שָׁ֛ם נִקְבְּצ֥וּ דַיֹּ֖ות אִשָּׁ֥ה רְעוּתָֽהּ׃ | 15 |
१५तेथे घुबड आपल्यासाठी घरटे करेल, अंडी घालून ती उबवतील. आणि आपल्या पिल्लांचे रक्षण करतील. होय, घार आपआपल्या जोडीदारांसोबत जमा होतील.
דִּרְשׁ֨וּ מֵֽעַל־סֵ֤פֶר יְהוָה֙ וּֽקְרָ֔אוּ אַחַ֤ת מֵהֵ֙נָּה֙ לֹ֣א נֶעְדָּ֔רָה אִשָּׁ֥ה רְעוּתָ֖הּ לֹ֣א פָקָ֑דוּ כִּֽי־פִי֙ ה֣וּא צִוָּ֔ה וְרוּחֹ֖ו ה֥וּא קִבְּצָֽן׃ | 16 |
१६परमेश्वराच्या ग्रंथातून शोधा, यातून एकही सुटणार नाही. कोणी एक जोडप्याविना असणार नाही; कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, आणि त्याच्या आत्म्याने त्यांना एकवट केले आहे.
וְהֽוּא־הִפִּ֤יל לָהֶן֙ גֹּורָ֔ל וְיָדֹ֛ו חִלְּקַ֥תָּה לָהֶ֖ם בַּקָּ֑ו עַד־עֹולָם֙ יִֽירָשׁ֔וּהָ לְדֹ֥ור וָדֹ֖ור יִשְׁכְּנוּ־בָֽהּ׃ ס | 17 |
१७त्यांच्या जागेसाठी त्यांनी चिठ्ठी टाकली आहे, आणि त्याने आपल्या हाताने ती भूमी दोरीने मापून त्यांना वाटून दिली आहे. ते त्यांचे सर्वकाळचे वतनदार होतील; ते पिढ्यानपिढ्या त्यामध्ये राहतील.