< שְׁמֹות 21 >

וְאֵ֙לֶּה֙ הַמִּשְׁפָּטִ֔ים אֲשֶׁ֥ר תָּשִׂ֖ים לִפְנֵיהֶֽם׃ 1
आता जे इतर नियम तू इस्राएल लोकांस लावून द्यावेत ते हेच:
כִּ֤י תִקְנֶה֙ עֶ֣בֶד עִבְרִ֔י שֵׁ֥שׁ שָׁנִ֖ים יַעֲבֹ֑ד וּבַ֨שְּׁבִעִ֔ת יֵצֵ֥א לַֽחָפְשִׁ֖י חִנָּֽם׃ 2
तुम्ही जर एखादा इब्री गुलाम विकत घेतला तर त्याने फक्त सहा वर्षे काम करावे; सातव्या वर्षी त्याच्याकडून काही भरपाई न घेता त्यास मुक्त होऊन जाऊ द्यावे.
אִם־בְּגַפֹּ֥ו יָבֹ֖א בְּגַפֹּ֣ו יֵצֵ֑א אִם־בַּ֤עַל אִשָּׁה֙ ה֔וּא וְיָצְאָ֥ה אִשְׁתֹּ֖ו עִמֹּֽו׃ 3
जर तो एकटाच आला असेल तर त्याने मुक्त होताना एकटेच निघून जावे; परंतु जर तो त्याची पत्नी घेऊन आला असेल तर त्याने त्याच्या पत्नीला घेऊन जावे.
אִם־אֲדֹנָיו֙ יִתֶּן־לֹ֣ו אִשָּׁ֔ה וְיָלְדָה־לֹ֥ו בָנִ֖ים אֹ֣ו בָנֹ֑ות הָאִשָּׁ֣ה וִילָדֶ֗יהָ תִּהְיֶה֙ לַֽאדֹנֶ֔יהָ וְה֖וּא יֵצֵ֥א בְגַפֹּֽו׃ 4
जर तो एकटा आला असेल तर त्याच्या मालकाने त्यास पत्नी करून द्यावी; तिला पुत्र किंवा कन्या झाल्या असतील तर ती व तिची मुले मालकाची राहतील; त्याने एकट्यानेच जावे.
וְאִם־אָמֹ֤ר יֹאמַר֙ הָעֶ֔בֶד אָהַ֙בְתִּי֙ אֶת־אֲדֹנִ֔י אֶת־אִשְׁתִּ֖י וְאֶת־בָּנָ֑י לֹ֥א אֵצֵ֖א חָפְשִֽׁי׃ 5
मी माझ्या मालकावर व माझ्या पत्नीमुलांवर प्रेम करतो, मी मुक्त होऊ इच्छित नाही, असे जर तो स्पष्टपणे सांगतो,
וְהִגִּישֹׁ֤ו אֲדֹנָיו֙ אֶל־הָ֣אֱלֹהִ֔ים וְהִגִּישֹׁו֙ אֶל־הַדֶּ֔לֶת אֹ֖ו אֶל־הַמְּזוּזָ֑ה וְרָצַ֨ע אֲדֹנָ֤יו אֶת־אָזְנֹו֙ בַּמַּרְצֵ֔עַ וַעֲבָדֹ֖ו לְעֹלָֽם׃ ס 6
तर त्याच्या मालकाने त्यास देवासमोर अथवा त्यास दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व अरीने त्याचा कान टोचावा. मग तो त्याची आयुष्यभर चाकरी करील.
וְכִֽי־יִמְכֹּ֥ר אִ֛ישׁ אֶת־בִּתֹּ֖ו לְאָמָ֑ה לֹ֥א תֵצֵ֖א כְּצֵ֥את הָעֲבָדִֽים׃ 7
कोणी आपली कन्या गुलाम म्हणून विकली तर तिने पुरुष गुलामाप्रमाणे मुक्त होऊन जाऊ नये.
אִם־רָעָ֞ה בְּעֵינֵ֧י אֲדֹנֶ֛יהָ אֲשֶׁר־לֹא (לֹ֥ו) יְעָדָ֖הּ וְהֶפְדָּ֑הּ לְעַ֥ם נָכְרִ֛י לֹא־יִמְשֹׁ֥ל לְמָכְרָ֖הּ בְּבִגְדֹו־בָֽהּ׃ 8
तिच्या मालकाने तिला आपली पत्नी करून घेण्याचे ठरवले असेल, पण पुढे तिच्यावरून त्याची मर्जी उडाली तर त्याने खंडणी घेऊन तिची मुक्तता करावी. तिला परक्या लोकांस विकण्याचा त्यास अधिकार नाही. तिच्याशी कपटाने वागल्यामुळे तिला विकण्याचा त्यास अधिकार नाही.
וְאִם־לִבְנֹ֖ו יִֽיעָדֶ֑נָּה כְּמִשְׁפַּ֥ט הַבָּנֹ֖ות יַעֲשֶׂה־לָּֽהּ׃ 9
आपल्या मुलासाठी पत्नी म्हणून तिला ठेवून घ्यायची तिच्या मालकाची इच्छा असेल, तर त्याने तिला आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवावे.
אִם־אַחֶ֖רֶת יִֽקַּֽח־לֹ֑ו שְׁאֵרָ֛הּ כְּסוּתָ֥הּ וְעֹנָתָ֖הּ לֹ֥א יִגְרָֽע׃ 10
१०त्याने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले तरी त्याने पहिल्या पत्नीस अन्न वस्त्र कमी पडू देऊ नये, किंवा तिच्या वैवाहिक अधिकारांना बाधा येऊ देऊ नये.
וְאִם־שְׁלָ֨שׁ־אֵ֔לֶּה לֹ֥א יַעֲשֶׂ֖ה לָ֑הּ וְיָצְאָ֥ה חִנָּ֖ם אֵ֥ין כָּֽסֶף׃ ס 11
११या तीन गोष्टी त्याने तिच्यासाठी केल्या नाहीत तर मग ती त्यास काही खंडणी न देता मुक्त होईल.
מַכֵּ֥ה אִ֛ישׁ וָמֵ֖ת מֹ֥ות יוּמָֽת׃ 12
१२कोणी एखाद्याला मारले व त्यामुळे तो मेला तर त्यास अवश्य जिवे मारावे.
וַאֲשֶׁר֙ לֹ֣א צָדָ֔ה וְהָאֱלֹהִ֖ים אִנָּ֣ה לְיָדֹ֑ו וְשַׂמְתִּ֤י לְךָ֙ מָקֹ֔ום אֲשֶׁ֥ר יָנ֖וּס שָֽׁמָּה׃ ס 13
१३पूर्वसंकल्प न करता, पण आपघाताने जर एखाद्याच्या हातून कोणाचा मृत्यू झाला. तर त्यास पळून जात येईल असे ठिकाण मी नेमून देईल.
וְכִי־יָזִ֥ד אִ֛ישׁ עַל־רֵעֵ֖הוּ לְהָרְגֹ֣ו בְעָרְמָ֑ה מֵעִ֣ם מִזְבְּחִ֔י תִּקָּחֶ֖נּוּ לָמֽוּת׃ ס 14
१४परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून व ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या मनुष्यास ठार मारले तर मात्र त्यास शिक्षा करावी; त्यास वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.
וּמַכֵּ֥ה אָבִ֛יו וְאִמֹּ֖ו מֹ֥ות יוּמָֽת׃ 15
१५कोणी आपल्या पित्याला किंवा आईला मारहाण करील त्यास अवश्य ठार मारावे.
וְגֹנֵ֨ב אִ֧ישׁ וּמְכָרֹ֛ו וְנִמְצָ֥א בְיָדֹ֖ו מֹ֥ות יוּמָֽת׃ ס 16
१६जो कोणी एखाद्याला चोरून नेऊन विकेल किंवा त्याच्याकडे तो सापडेल तर त्यास अवश्य जिवे मारावे.
וּמְקַלֵּ֥ל אָבִ֛יו וְאִמֹּ֖ו מֹ֥ות יוּמָֽת׃ ס 17
१७जो कोणी आपल्या पित्याला किंवा आईला शिव्याशाप देईल त्या मनुष्यास अवश्य जिवे मारावे.
וְכִֽי־יְרִיבֻ֣ן אֲנָשִׁ֔ים וְהִכָּה־אִישׁ֙ אֶת־רֵעֵ֔הוּ בְּאֶ֖בֶן אֹ֣ו בְאֶגְרֹ֑ף וְלֹ֥א יָמ֖וּת וְנָפַ֥ל לְמִשְׁכָּֽב׃ 18
१८दोघेजण भांडत असताना एकाने दुसऱ्याला दगड किंवा ठोसा मारला आणि त्यामुळे तो मेला नाही, पण त्यास अंथरूणात पडून रहावे लागले,
אִם־יָק֞וּם וְהִתְהַלֵּ֥ךְ בַּח֛וּץ עַל־מִשְׁעַנְתֹּ֖ו וְנִקָּ֣ה הַמַּכֶּ֑ה רַ֥ק שִׁבְתֹּ֛ו יִתֵּ֖ן וְרַפֹּ֥א יְרַפֵּֽא׃ ס 19
१९तर मारणाऱ्याने त्यास त्याच्या वाया गेलेल्या वेळेबद्दल नुकसान भरपाई द्यावी व तो मनुष्य बरा होईपर्यंत त्याच्यासाठी लागणारा खर्च द्यावा.
וְכִֽי־יַכֶּה֩ אִ֨ישׁ אֶת־עַבְדֹּ֜ו אֹ֤ו אֶת־אֲמָתֹו֙ בַּשֵּׁ֔בֶט וּמֵ֖ת תַּ֣חַת יָדֹ֑ו נָקֹ֖ם יִנָּקֵֽם׃ 20
२०काही वेळा लोक आपल्या गुलामाला किंवा गुलाम स्त्रीला छडीने मारहाण करतात, त्यामुळे जर तो गुलाम किंवा ती गुलाम स्त्री मरण पावली तर त्यांना मारणाऱ्याला अवश्य शिक्षा करावी;
אַ֥ךְ אִם־יֹ֛ום אֹ֥ו יֹומַ֖יִם יַעֲמֹ֑ד לֹ֣א יֻקַּ֔ם כִּ֥י כַסְפֹּ֖ו הֽוּא׃ ס 21
२१पण तो एकदोन दिवस जिवंत राहिला तर मालकाला शिक्षा होणार नाही कारण तो त्याचेच धन आहे.
וְכִֽי־יִנָּצ֣וּ אֲנָשִׁ֗ים וְנָ֨גְפ֜וּ אִשָּׁ֤ה הָרָה֙ וְיָצְא֣וּ יְלָדֶ֔יהָ וְלֹ֥א יִהְיֶ֖ה אָסֹ֑ון עָנֹ֣ושׁ יֵעָנֵ֗שׁ כּֽ͏ַאֲשֶׁ֨ר יָשִׁ֤ית עָלָיו֙ בַּ֣עַל הָֽאִשָּׁ֔ה וְנָתַ֖ן בִּפְלִלִֽים׃ 22
२२दोघे जर मारामारी करीत असतील व त्यांचा धक्का एखाद्या गरोदर स्त्रीला लागला आणि त्या स्त्रीचा गर्भपात झाला पण तिला इतर कोणतीही इजा झाली नाही, तर ज्याचा धक्का तिला लागला तिचा पती न्यायाधीशांच्या सल्ल्याने जो दंड ठरवील तो दंड त्याने द्यावा.
וְאִם־אָסֹ֖ון יִהְיֶ֑ה וְנָתַתָּ֥ה נֶ֖פֶשׁ תַּ֥חַת נָֽפֶשׁ׃ 23
२३पण दुसरी काही जास्त इजा झाल्यास जिवाबद्दल जीव,
עַ֚יִן תַּ֣חַת עַ֔יִן שֵׁ֖ן תַּ֣חַת שֵׁ֑ן יָ֚ד תַּ֣חַת יָ֔ד רֶ֖גֶל תַּ֥חַת רָֽגֶל׃ 24
२४डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय,
כְּוִיָּה֙ תַּ֣חַת כְּוִיָּ֔ה פֶּ֖צַע תַּ֣חַת פָּ֑צַע חַבּוּרָ֕ה תַּ֖חַת חַבּוּרָֽה׃ ס 25
२५चटक्याबद्दल चटका, ओरखड्याबद्दल ओरखडा, व जखमेबद्दल जखम असा बदला घ्यावा.
וְכִֽי־יַכֶּ֨ה אִ֜ישׁ אֶת־עֵ֥ין עַבְדֹּ֛ו אֹֽו־אֶת־עֵ֥ין אֲמָתֹ֖ו וְשִֽׁחֲתָ֑הּ לֽ͏ַחָפְשִׁ֥י יְשַׁלְּחֶ֖נּוּ תַּ֥חַת עֵינֹֽו׃ ס 26
२६जर एखाद्याने आपल्या गुलामाच्या किंवा गुलाम स्त्रीच्या डोळ्यावर मारल्यामुळे त्याचा किंवा तिचा डोळा गेला तर त्याने त्यास मुक्त करावे.
וְאִם־שֵׁ֥ן עַבְדֹּ֛ו אֹֽו־שֵׁ֥ן אֲמָתֹ֖ו יַפִּ֑יל לֽ͏ַחָפְשִׁ֥י יְשַׁלְּחֶ֖נּוּ תַּ֥חַת שִׁנֹּֽו׃ פ 27
२७एखाद्या मालकाने आपल्या पुरुष दासाच्या किंवा स्त्री दासीच्या तोंडावर मारल्यामुळे त्याचा किंवा तिचा दात पडला तर त्याने त्यास दास्यमुक्त करून जाऊ द्यावे.
וְכִֽי־יִגַּ֨ח שֹׁ֥ור אֶת־אִ֛ישׁ אֹ֥ו אֶת־אִשָּׁ֖ה וָמֵ֑ת סָקֹ֨ול יִסָּקֵ֜ל הַשֹּׁ֗ור וְלֹ֤א יֵאָכֵל֙ אֶת־בְּשָׂרֹ֔ו וּבַ֥עַל הַשֹּׁ֖ור נָקִֽי׃ 28
२८एखाद्याच्या बैलाने एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला हुंदडून जिवे मारले तर त्या बैलाला दगडमार करून जिवे मारावे, त्या बैलाचे मांस कोणी खाऊ नये, परंतु त्या बैलाच्या मालकाला सोडून द्यावे.
וְאִ֡ם שֹׁור֩ נַגָּ֨ח ה֜וּא מִתְּמֹ֣ל שִׁלְשֹׁ֗ם וְהוּעַ֤ד בִּבְעָלָיו֙ וְלֹ֣א יִשְׁמְרֶ֔נּוּ וְהֵמִ֥ית אִ֖ישׁ אֹ֣ו אִשָּׁ֑ה הַשֹּׁור֙ יִסָּקֵ֔ל וְגַם־בְּעָלָ֖יו יוּמָֽת׃ 29
२९परंतु त्या बैलाला हुंदडण्याची सवयच असली आणि त्याविषयी त्याच्या मालकाला सूचना केली असूनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही आणि त्यानंतर कोणा पुरुषाला किंवा स्त्रीला त्याने जिवे मारले तर त्याबद्दल त्याचा मालक दोषी आहे, त्या बैलाला धोंडमार करून जिवे मारावे व त्याच्या मालकालाही जिवे मारावे.
אִם־כֹּ֖פֶר יוּשַׁ֣ת עָלָ֑יו וְנָתַן֙ פִּדְיֹ֣ן נַפְשֹׁ֔ו כְּכֹ֥ל אֲשֶׁר־יוּשַׁ֖ת עָלָֽיו׃ 30
३०त्याच्याकडून खंडणी मागितल्यास त्याने आपला प्राण वाचविण्यासाठी आपल्यावर लादलेली खंडणी देऊन टाकावी.
אֹו־בֵ֥ן יִגָּ֖ח אֹו־בַ֣ת יִגָּ֑ח כַּמִּשְׁפָּ֥ט הַזֶּ֖ה יֵעָ֥שֶׂה לֹּֽו׃ 31
३१बैलाने एखाद्याच्या पुत्राला किंवा कन्येला हुंदडून जिवे मारले तर त्याबाबतीत हाच नियम लागू करावा.
אִם־עֶ֛בֶד יִגַּ֥ח הַשֹּׁ֖ור אֹ֣ו אָמָ֑ה כֶּ֣סֶף ׀ שְׁלֹשִׁ֣ים שְׁקָלִ֗ים יִתֵּן֙ לַֽאדֹנָ֔יו וְהַשֹּׁ֖ור יִסָּקֵֽל׃ ס 32
३२एखाद्या बैलाने जर कोणाच्या पुरुष दासास किंवा स्त्री दासीला हुंदडून ठार मारले तर त्या बैलाच्या मालकाने त्याच्या मालकाला चांदीची तीस शेकेल नाणी द्यावी आणि त्या बैलालाही दगडमार करावी;
וְכִֽי־יִפְתַּ֨ח אִ֜ישׁ בֹּ֗ור אֹ֠ו כִּֽי־יִכְרֶ֥ה אִ֛ישׁ בֹּ֖ר וְלֹ֣א יְכַסֶּ֑נּוּ וְנָֽפַל־שָׁ֥מָּה שֹּׁ֖ור אֹ֥ו חֲמֹֽור׃ 33
३३एखाद्या मनुष्याने बुजलेला खड्डा उकरला किंवा त्याने खड्डा खणून त्यावर झाकण ठेवले नसेल आणि जर कोणाचा बैल, गाढव वगैरे त्या खड्डयात पडून मरण पावले तर खड्ड्याचा मालक दोषी आहे;
בַּ֤עַל הַבֹּור֙ יְשַׁלֵּ֔ם כֶּ֖סֶף יָשִׁ֣יב לִבְעָלָ֑יו וְהַמֵּ֖ת יִֽהְיֶה־לֹּֽו׃ ס 34
३४त्याने त्या जनावराच्या मालकाला भरपाई म्हणून त्याची किंमत द्यावी आणि ते मरण पावलेले जनावर खड्ड्याच्या मालकाचे होईल.
וְכִֽי־יִגֹּ֧ף שֹֽׁור־אִ֛ישׁ אֶת־שֹׁ֥ור רֵעֵ֖הוּ וָמֵ֑ת וּמָ֨כְר֜וּ אֶת־הַשֹּׁ֤ור הַחַי֙ וְחָצ֣וּ אֶת־כַּסְפֹּ֔ו וְגַ֥ם אֶת־הַמֵּ֖ת יֽ͏ֶחֱצֽוּן׃ 35
३५जर एखाद्याच्या बैलाने दुसऱ्याच्या बैलाला हुंदडून मारून टाकले तर जिवंत राहिलेला बैल विकून आलेले पैसे दोघा मालकांनी विभागून घ्यावेत आणि मरण पावलेला बैलही विभागून घ्यावा.
אֹ֣ו נֹודַ֗ע כִּ֠י שֹׁ֣ור נַגָּ֥ח הוּא֙ מִתְּמֹ֣ול שִׁלְשֹׁ֔ם וְלֹ֥א יִשְׁמְרֶ֖נּוּ בְּעָלָ֑יו שַׁלֵּ֨ם יְשַׁלֵּ֥ם שֹׁור֙ תַּ֣חַת הַשֹּׁ֔ור וְהַמֵּ֖ת יִֽהְיֶה־לֹּֽו׃ ס 36
३६परंतु तो बैल पूर्वीपासून मारका आहे हे ठाऊक असून मालकाने त्यास बांधून ठेवले नाही, तर त्याने बैलाबद्दल बैल द्यावा व मरण पावलेला बैल त्याचा व्हावा.

< שְׁמֹות 21 >