< במדבר 24 >
וַיַּרְא בִּלְעָם כִּי טוֹב בְּעֵינֵי יְהֹוָה לְבָרֵךְ אֶת־יִשְׂרָאֵל וְלֹא־הָלַךְ כְּפַֽעַם־בְּפַעַם לִקְרַאת נְחָשִׁים וַיָּשֶׁת אֶל־הַמִּדְבָּר פָּנָֽיו׃ | 1 |
१इस्राएलाला आशीर्वाद द्यायची परमेश्वराची इच्छा आहे हे बलामाने पाहिले. म्हणून त्याने ते कोणत्याही प्रकारचे मंत्रतंत्र वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने रानाकडे पाहिले.
וַיִּשָּׂא בִלְעָם אֶת־עֵינָיו וַיַּרְא אֶת־יִשְׂרָאֵל שֹׁכֵן לִשְׁבָטָיו וַתְּהִי עָלָיו רוּחַ אֱלֹהִֽים׃ | 2 |
२बलामाने रानाकडे पाहिले आणि त्यास इस्राएलाचे सगळे वंश दिसले. त्यांनी आपापल्या भागात आपापल्या गटासह तळ दिला होता. नंतर देवाचा आत्मा बलामावर आला.
וַיִּשָּׂא מְשָׁלוֹ וַיֹּאמַר נְאֻם בִּלְעָם בְּנוֹ בְעֹר וּנְאֻם הַגֶּבֶר שְׁתֻם הָעָֽיִן׃ | 3 |
३त्याने हा संदेश स्विकारला आणि म्हणाला, बौराचा मुलगा बलाम, ज्या मनुष्याचे डोळे स्पष्ट उघडे आहेत त्याविषयी बोलत आहे.
נְאֻם שֹׁמֵעַ אִמְרֵי־אֵל אֲשֶׁר מַחֲזֵה שַׁדַּי יֶֽחֱזֶה נֹפֵל וּגְלוּי עֵינָֽיִם׃ | 4 |
४जो देवाचे शब्द ऐकतो आणि बोलतो, जो सर्वसमर्थापासून दृष्टांत पाहतो, जो त्याच्यापुढे डोळे उघडे ठेवून नतमस्तक होतो.
מַה־טֹּבוּ אֹהָלֶיךָ יַעֲקֹב מִשְׁכְּנֹתֶיךָ יִשְׂרָאֵֽל׃ | 5 |
५हे याकोबा तुझे तंबू, हे इस्राएला, जिथे तू राहतो ते किती सुंदर आहे!
כִּנְחָלִים נִטָּיוּ כְּגַנֹּת עֲלֵי נָהָר כַּאֲהָלִים נָטַע יְהֹוָה כַּאֲרָזִים עֲלֵי־מָֽיִם׃ | 6 |
६खोऱ्यासारखे विस्तृत पसरलेले, नदीकाठी लावलेल्या बागेसारखे, परमेश्वराने लावलेल्या कोरफडीप्रमाणे आहे, पाण्याजवळच्या गंधसरूसारखे ते आहेत.
יִֽזַּל־מַיִם מִדָּלְיָו וְזַרְעוֹ בְּמַיִם רַבִּים וְיָרֹם מֵֽאֲגַג מַלְכּוֹ וְתִנַּשֵּׂא מַלְכֻתֽוֹ׃ | 7 |
७पाणी त्यांच्या बादलीतून वाहील, आणि त्यांच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल. त्यांचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्यांच्या राजाचा गौरव होईल.
אֵל מוֹצִיאוֹ מִמִּצְרַיִם כְּתוֹעֲפֹת רְאֵם לוֹ יֹאכַל גּוֹיִם צָרָיו וְעַצְמֹתֵיהֶם יְגָרֵם וְחִצָּיו יִמְחָֽץ׃ | 8 |
८देवाने त्यांना मिसरामधून बाहेर आणले. त्यांना रानटी बैलासारखी शक्ती आहे. तो आपल्याविरूद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना खाऊन टाकील. तो त्यांच्या हाडांचे तुकडे तुकडे करील. तो आपल्या बाणांनी त्यांना मारील.
כָּרַע שָׁכַב כַּאֲרִי וּכְלָבִיא מִי יְקִימֶנּוּ מְבָרְכֶיךָ בָרוּךְ וְאֹרְרֶיךָ אָרֽוּר׃ | 9 |
९तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याची कोण हिंम्मत करील? जो तुला आशीर्वाद देईल तो प्रत्येकजण आशीर्वाद देईल; तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल.
וַיִּֽחַר־אַף בָּלָק אֶל־בִּלְעָם וַיִּסְפֹּק אֶת־כַּפָּיו וַיֹּאמֶר בָּלָק אֶל־בִּלְעָם לָקֹב אֹֽיְבַי קְרָאתִיךָ וְהִנֵּה בֵּרַכְתָּ בָרֵךְ זֶה שָׁלֹשׁ פְּעָמִֽים׃ | 10 |
१०बलामाविरूद्ध बालाकाचा राग भडकला आणि त्याने रागाने आपले हात एकत्रीत आपटले. बालाक बलामास म्हणाला, “मी तुला माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी बोलावले, पण पाहा, तू त्यांना तीन वेळा आशीर्वाद दिलास.
וְעַתָּה בְּרַח־לְךָ אֶל־מְקוֹמֶךָ אָמַרְתִּי כַּבֵּד אֲכַבֶּדְךָ וְהִנֵּה מְנָעֲךָ יְהֹוָה מִכָּבֽוֹד׃ | 11 |
११तर आता मला सोडून घरी जा. मी तुला चांगला मोबदला देईन असे म्हटले होते, परंतु परमेश्वराने तुला कोणतेही इनाम मिळण्यापासून दूर ठेवले आहे.”
וַיֹּאמֶר בִּלְעָם אֶל־בָּלָק הֲלֹא גַּם אֶל־מַלְאָכֶיךָ אֲשֶׁר־שָׁלַחְתָּ אֵלַי דִּבַּרְתִּי לֵאמֹֽר׃ | 12 |
१२बलाम बालाकाला म्हणाला, तूच माझ्याकडे माणसे पाठवलीस. त्या मनुष्यांनी मला येण्याबद्दल विचारले. पण मी त्यांना म्हणालो,
אִם־יִתֶּן־לִי בָלָק מְלֹא בֵיתוֹ כֶּסֶף וְזָהָב לֹא אוּכַל לַעֲבֹר אֶת־פִּי יְהֹוָה לַעֲשׂוֹת טוֹבָה אוֹ רָעָה מִלִּבִּי אֲשֶׁר־יְדַבֵּר יְהֹוָה אֹתוֹ אֲדַבֵּֽר׃ | 13 |
१३बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वत: काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेवढीच मी बोलतो. तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या मनुष्यांना सांगितले होते.
וְעַתָּה הִנְנִי הוֹלֵךְ לְעַמִּי לְכָה אִיעָצְךָ אֲשֶׁר יַעֲשֶׂה הָעָם הַזֶּה לְעַמְּךָ בְּאַחֲרִית הַיָּמִֽים׃ | 14 |
१४तर आता पाहा. मी माझ्या मनुष्यांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलाचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांस काय करतील ते सांगतो.
וַיִּשָּׂא מְשָׁלוֹ וַיֹּאמַר נְאֻם בִּלְעָם בְּנוֹ בְעֹר וּנְאֻם הַגֶּבֶר שְׁתֻם הָעָֽיִן׃ | 15 |
१५बलामाने हा संदेश सांगण्यास सुरवात केली. तो म्हणाला, बौराचा मुलगा बलाम बोलतो, ज्या मनुष्याचे डोळे सताड उघडे आहेत.
נְאֻם שֹׁמֵעַ אִמְרֵי־אֵל וְיֹדֵעַ דַּעַת עֶלְיוֹן מַחֲזֵה שַׁדַּי יֶֽחֱזֶה נֹפֵל וּגְלוּי עֵינָֽיִם׃ | 16 |
१६हा संदेश जो कोणी देवाकडून ऐकतो, ज्याला परात्परापासूनचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थापासून दर्शन आहे, जो डोळे उघडे ठेवून दंडवत घालतो.
אֶרְאֶנּוּ וְלֹא עַתָּה אֲשׁוּרֶנּוּ וְלֹא קָרוֹב דָּרַךְ כּוֹכָב מִֽיַּעֲקֹב וְקָם שֵׁבֶט מִיִּשְׂרָאֵל וּמָחַץ פַּאֲתֵי מוֹאָב וְקַרְקַר כׇּל־בְּנֵי־שֵֽׁת׃ | 17 |
१७मी त्यास पाहीन, पण तो आता इथे नाही. मी त्याच्याकडे पाहीन, पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा बाहेर येईल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल. तो मवाबाच्या नेत्यांना चिरडून टाकील आणि शेथाच्या सर्व मुलांचा तो नाश करील.
וְהָיָה אֱדוֹם יְרֵשָׁה וְהָיָה יְרֵשָׁה שֵׂעִיר אֹיְבָיו וְיִשְׂרָאֵל עֹשֶׂה חָֽיִל׃ | 18 |
१८नंतर अदोम इस्राएलाचे वतन होईल, आणि सेईरही आपल्या इस्राएली शत्रूंचे वतन होईल, ज्याला इस्राएल आपल्या पराक्रमाने जिंकेल.
וְיֵרְדְּ מִֽיַּעֲקֹב וְהֶֽאֱבִיד שָׂרִיד מֵעִֽיר׃ | 19 |
१९याकोबाच्या घराण्यातून एक राजा येईल तो त्यांच्यावर राज्य करील, आणि तो त्यांच्या शहरातील उरलेल्यांचा नाश करील.
וַיַּרְא אֶת־עֲמָלֵק וַיִּשָּׂא מְשָׁלוֹ וַיֹּאמַר רֵאשִׁית גּוֹיִם עֲמָלֵק וְאַחֲרִיתוֹ עֲדֵי אֹבֵֽד׃ | 20 |
२०नंतर बलामाने अमालेकाकडे पाहिले आणि त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “अमालेकी एकदा राष्ट्रांत महान होता, पण त्याचा अंतीम शेवट नाश होईल.”
וַיַּרְא אֶת־הַקֵּינִי וַיִּשָּׂא מְשָׁלוֹ וַיֹּאמַר אֵיתָן מֽוֹשָׁבֶךָ וְשִׂים בַּסֶּלַע קִנֶּֽךָ׃ | 21 |
२१नंतर बलामने केनीकडे पाहिले आणि त्याने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “तू जेथे राहतोस ती जागा बळकट आहे, आणि तुझे घरटे खडकात आहे.”
כִּי אִם־יִהְיֶה לְבָעֵֽר קָיִן עַד־מָה אַשּׁוּר תִּשְׁבֶּֽךָּ׃ | 22 |
२२“तरीसुद्धा केनी राष्ट्रांचा नाश होईल, जेव्हा अश्शूर तुला बंदिवान करून नेईल.”
וַיִּשָּׂא מְשָׁלוֹ וַיֹּאמַר אוֹי מִי יִחְיֶה מִשֻּׂמוֹ אֵֽל׃ | 23 |
२३नंतर बलामाने अंतीम संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, देव जेव्हा असे करतो “हायहाय! जेव्हा देव हे करीत असता कोण जिवंत राहील?”
וְצִים מִיַּד כִּתִּים וְעִנּוּ אַשּׁוּר וְעִנּוּ־עֵבֶר וְגַם־הוּא עֲדֵי אֹבֵֽד׃ | 24 |
२४कित्तीमाच्या किनाऱ्यापासून जहाजे येतील; ते अश्शूरावर हल्ला करतील आणि एबर जिंकून घेतील. पण त्यांचासुद्धा नाश होईल.
וַיָּקׇם בִּלְעָם וַיֵּלֶךְ וַיָּשׇׁב לִמְקֹמוֹ וְגַם־בָּלָק הָלַךְ לְדַרְכּֽוֹ׃ | 25 |
२५नंतर बलाम उठला आणि गेला. तो आपल्या घरी परत गेला आणि बालाकही आपल्या वाटेने गेला.