< יואל 1 >
דְּבַר־יְהֹוָה אֲשֶׁר הָיָה אֶל־יוֹאֵל בֶּן־פְּתוּאֵֽל׃ | 1 |
१पथूएलाचा मुलगा योएल, ह्याच्याकडे परमेश्वराचे वचन आले ते हे.
שִׁמְעוּ־זֹאת הַזְּקֵנִים וְהַֽאֲזִינוּ כֹּל יוֹשְׁבֵי הָאָרֶץ הֶהָיְתָה זֹּאת בִּֽימֵיכֶם וְאִם בִּימֵי אֲבֹתֵיכֶֽם׃ | 2 |
२अहो वडिलांनो, हे ऐका, आणि देशात राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी कान द्या. तुमच्या पूर्वजांच्या दिवसात किंवा तुमच्या दिवसात पूर्वी कधी असे हे घडले काय?
עָלֶיהָ לִבְנֵיכֶם סַפֵּרוּ וּבְנֵיכֶם לִבְנֵיהֶם וּבְנֵיהֶם לְדוֹר אַחֵֽר׃ | 3 |
३ह्याविषयी आपल्या मुलाबाळांना सांगा, आणि तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना सांगावे, व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस सांगावे.
יֶתֶר הַגָּזָם אָכַל הָאַרְבֶּה וְיֶתֶר הָאַרְבֶּה אָכַל הַיָּלֶק וְיֶתֶר הַיֶּלֶק אָכַל הֶחָסִֽיל׃ | 4 |
४कुरतडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले; झुंडीने येणाऱ्या टोळापासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले; आणि चाटून खाणाऱ्या टोळापासून, जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.
הָקִיצוּ שִׁכּוֹרִים וּבְכוּ וְהֵילִלוּ כׇּל־שֹׁתֵי יָיִן עַל־עָסִיס כִּי נִכְרַת מִפִּיכֶֽם׃ | 5 |
५दारू पिणाऱ्यांनो, तुम्ही जागे व्हा व रडा! तुम्ही सर्व दारू पिणाऱ्यांनो, आक्रोश करा, कारण गोड दारू तुमच्यापासून काढून घेतली आहे.
כִּי־גוֹי עָלָה עַל־אַרְצִי עָצוּם וְאֵין מִסְפָּר שִׁנָּיו שִׁנֵּי אַרְיֵה וּֽמְתַלְּעוֹת לָבִיא לֽוֹ׃ | 6 |
६कारण एक राष्ट्र माझ्या देशावर आले आहे, ते बळकट व अगणित आहेत. त्यांचे दात सिंहाचे आहेत, आणि त्यांना सिंहिणीचे दात आहेत.
שָׂם גַּפְנִי לְשַׁמָּה וּתְאֵנָתִי לִקְצָפָה חָשֹׂף חֲשָׂפָהּ וְהִשְׁלִיךְ הִלְבִּינוּ שָׂרִיגֶֽיהָ׃ | 7 |
७त्यांनी माझा द्राक्षमळा घाबरून सोडवण्याची जागा केली आहे आणि माझ्या अंजिराचे झाड सोलून उघडे केले आहे. त्यांने साल सोलून दूर फेकली आहे. फांद्या उघड्या करून पांढऱ्या केल्या आहेत.
אֱלִי כִּבְתוּלָה חֲגֻרַת־שַׂק עַל־בַּעַל נְעוּרֶֽיהָ׃ | 8 |
८जशी कुमारी गोणताट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते, तसा शोक करा.
הׇכְרַת מִנְחָה וָנֶסֶךְ מִבֵּית יְהֹוָה אָֽבְלוּ הַכֹּהֲנִים מְשָׁרְתֵי יְהֹוָֽה׃ | 9 |
९परमेश्वराच्या मंदिरातून अन्नार्पणे व पेयार्पणे नाहीसे झाले आहेत. परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करत आहेत.
שֻׁדַּד שָׂדֶה אָבְלָה אֲדָמָה כִּי שֻׁדַּד דָּגָן הוֹבִישׁ תִּירוֹשׁ אֻמְלַל יִצְהָֽר׃ | 10 |
१०शेतांचा नाश झाला आहे. आणि भूमी रडते. कारण धान्याचा नाश झाला आहे, नवा द्राक्षरस सुकून गेला आहे आणि तेल नासले आहे.
הֹבִישׁוּ אִכָּרִים הֵילִילוּ כֹּֽרְמִים עַל־חִטָּה וְעַל־שְׂעֹרָה כִּי אָבַד קְצִיר שָׂדֶֽה׃ | 11 |
११तुम्ही शेतकऱ्यांनो, गहू व जवाबद्दल लज्जित व्हा, आणि द्राक्षमळेवाल्यांनो, गहू व जवसासाठी आक्रोश करा, कारण शेतातील पीक नष्ट झाले आहे.
הַגֶּפֶן הוֹבִישָׁה וְהַתְּאֵנָה אֻמְלָלָה רִמּוֹן גַּם־תָּמָר וְתַפּוּחַ כׇּל־עֲצֵי הַשָּׂדֶה יָבֵשׁוּ כִּי־הֹבִישׁ שָׂשׂוֹן מִן־בְּנֵי אָדָֽם׃ | 12 |
१२द्राक्षवेली शुष्क झाल्या आहेत, आणि अंजिराचे झाड सुकून गेले आहे, डाळिंबाचे झाड, खजुराचे झाड आणि सफरचंदाचे झाड अशी शेतातील सर्व झाडेसुद्धा शुष्क झाली आहेत. मानवजातीच्या वंशातून आनंद नष्ट झाला आहे.
חִגְרוּ וְסִפְדוּ הַכֹּהֲנִים הֵילִילוּ מְשָׁרְתֵי מִזְבֵּחַ בֹּאוּ לִינוּ בַשַּׂקִּים מְשָׁרְתֵי אֱלֹהָי כִּי נִמְנַע מִבֵּית אֱלֹהֵיכֶם מִנְחָה וָנָֽסֶךְ׃ | 13 |
१३याजकांनो, गोणताट घाला आणि शोक करा! वेदीची सेवा करणाऱ्यांनो, आक्रोश करा. माझ्या परमेश्वराच्या सेवकांनो, या, तुम्ही पूर्ण रात्र गोणताट घालून राहा. कारण तुमच्या देवाच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व पेयार्पणे अडकवून ठेवलेली आहेत.
קַדְּשׁוּ־צוֹם קִרְאוּ עֲצָרָה אִסְפוּ זְקֵנִים כֹּל יֹשְׁבֵי הָאָרֶץ בֵּית יְהֹוָה אֱלֹהֵיכֶם וְזַעֲקוּ אֶל־יְהֹוָֽה׃ | 14 |
१४पवित्र उपास नेमा, आणि पवित्र सभेसाठी लोकांस एकत्र बोलवा. तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलांस व देशात राहणाऱ्या लोकांस एकत्र गोळा करा. आणि परमेश्वरास आरोळी मारा.
אֲהָהּ לַיּוֹם כִּי קָרוֹב יוֹם יְהֹוָה וּכְשֹׁד מִשַּׁדַּי יָבֽוֹא׃ | 15 |
१५त्या भयानक दिवसाकरता हायहाय! कारण परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे. सर्वसमर्थ देवापासून जसा नाश तसा तो येईल.
הֲלוֹא נֶגֶד עֵינֵינוּ אֹכֶל נִכְרָת מִבֵּית אֱלֹהֵינוּ שִׂמְחָה וָגִֽיל׃ | 16 |
१६आमच्या डोळ्यादेखत आमचे अन्न काढून घेतले, आणि देवाच्या मंदिरातील आनंद व उल्लास नष्ट झाले नाहीत काय?
עָבְשׁוּ פְרֻדוֹת תַּחַת מֶגְרְפֹתֵיהֶם נָשַׁמּוּ אֹֽצָרוֹת נֶהֶרְסוּ מַמְּגֻרוֹת כִּי הֹבִישׁ דָּגָֽן׃ | 17 |
१७बियाणे त्यांच्या ढेकळाखाली कुजून गेले आहे, धान्याची कोठारे ओसाड झाली आहेत, कोठ्या खाली पाडल्या गेल्या आहेत, कारण धान्य सुकून गेले आहे.
מַה־נֶּאֶנְחָה בְהֵמָה נָבֹכוּ עֶדְרֵי בָקָר כִּי אֵין מִרְעֶה לָהֶם גַּם־עֶדְרֵי הַצֹּאן נֶאְשָֽׁמוּ׃ | 18 |
१८प्राणी कसे कण्हत आहेत! गुरांचे कळप घाबरले आहेत. त्यांना खाण्यास कुरणे नाहीत. मेंढ्यांचे कळपसुद्धा पीडले आहेत.
אֵלֶיךָ יְהֹוָה אֶקְרָא כִּי אֵשׁ אָֽכְלָה נְאוֹת מִדְבָּר וְלֶהָבָה לִהֲטָה כׇּל־עֲצֵי הַשָּׂדֶֽה׃ | 19 |
१९हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. कारण आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत. आणि शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत.
גַּם־בַּהֲמוֹת שָׂדֶה תַּעֲרוֹג אֵלֶיךָ כִּי יָֽבְשׁוּ אֲפִיקֵי מָיִם וְאֵשׁ אָכְלָה נְאוֹת הַמִּדְבָּֽר׃ | 20 |
२०रानातील वनपशूंनासुध्दा तुझी उत्कंठा लागली आहे, कारण पाण्याचे ओहोळ कोरडे झाले आहेत आणि आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.