< איוב 16 >

וַיַּעַן אִיּוֹב וַיֹּאמַֽר׃ 1
नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
שָׁמַעְתִּי כְאֵלֶּה רַבּוֹת מְנַחֲמֵי עָמָל כֻּלְּכֶֽם׃ 2
“या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत, तुम्ही सर्व वायफळ सांत्वनकर्ते आहात.
הֲקֵץ לְדִבְרֵי־רוּחַ אוֹ מַה־יַּמְרִֽיצְךָ כִּי תַֽעֲנֶֽה׃ 3
तुमची वायफळ शब्द कधीही संपत नाहीत. तुम्हास काय झाले आहे कि, तुम्ही याप्रमाणे उत्तर देता?
גַּם ׀ אָנֹכִי כָּכֶם אֲדַבֵּרָה לוּ יֵשׁ נַפְשְׁכֶם תַּחַת נַפְשִׁי אַחְבִּירָה עֲלֵיכֶם בְּמִלִּים וְאָנִיעָה עֲלֵיכֶם בְּמוֹ רֹאשִֽׁי׃ 4
जर तुमच्यासारखे मलाही बोलता आले असते, तर जे आता तुम्ही म्हणत आहात तेच मीही म्हणू शकलो असतो. मी तुमच्याविरुध्द शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकलो असतो आणि माझे डोके तुमच्यासमोर हलवू शकलो असतो.
אֲאַמִּצְכֶם בְּמוֹ־פִי וְנִיד שְׂפָתַי יַחְשֹֽׂךְ׃ 5
अहो मी तुम्हास माझ्या मुखाने मी धीर दिला असता. आणि माझ्या ओठाने तुमचे सांत्वन केले असते.
אִֽם־אֲדַבְּרָה לֹא־יֵחָשֵׂךְ כְּאֵבִי וְאַחְדְּלָה מַה־מִּנִּי יַהֲלֹֽךְ׃ 6
परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत. पण मी बोललो नाहीतर माझ्या यातना कमी कशा होणार?
אַךְ־עַתָּה הֶלְאָנִי הֲשִׁמּוֹתָ כׇּל־עֲדָתִֽי׃ 7
खरोखरच तू माझी शक्ती हिरावून घेतली आहेस. तू माझ्या सर्व कुटुंबाचा नाश केला आहेस.
וַֽתִּקְמְטֵנִי לְעֵד הָיָה וַיָּקׇם בִּי כַחֲשִׁי בְּפָנַי יַעֲנֶֽה׃ 8
तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांस वाटते.
אַפּוֹ טָרַף ׀ וַֽיִּשְׂטְמֵנִי חָרַק עָלַי בְּשִׁנָּיו צָרִי ׀ יִלְטֹשׁ עֵינָיו לִֽי׃ 9
देव माझ्यावर हल्ला करतो. तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याविरुध्द दात खातो, माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात.
פָּעֲרוּ עָלַי ׀ בְּפִיהֶם בְּחֶרְפָּה הִכּוּ לְחָיָי יַחַד עָלַי יִתְמַלָּאֽוּן׃ 10
१०लोक माझ्या भोवती जमले आहेत. ते माझी थट्टा करतात व तोंडावर मारतात.
יַסְגִּירֵנִי אֵל אֶל עֲוִיל וְעַל־יְדֵי רְשָׁעִים יִרְטֵֽנִי׃ 11
११देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे. त्याने क्रूर मनुष्यांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे.
שָׁלֵו הָיִיתִי ׀ וַֽיְפַרְפְּרֵנִי וְאָחַז בְּעׇרְפִּי וַֽיְפַצְפְּצֵנִי וַיְקִימֵנִי לוֹ לְמַטָּרָֽה׃ 12
१२मी अगदी मजेत होतो, पण देवाने मला चिरडून टाकले. हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला.
יָסֹבּוּ עָלַי ׀ רַבָּיו יְפַלַּח כִּלְיוֹתַי וְלֹא יַחְמֹל יִשְׁפֹּךְ לָאָרֶץ מְרֵרָתִֽי׃ 13
१३त्याचे धनुर्धारी मला घेरतात. तो माझ्या कंबरेत बाण सोडतो तो दया दाखवीत नाही. तो माझे पित्ताशय धरतीवर रिकामे करतो.
יִפְרְצֵנִי פֶרֶ ץ עַל־פְּנֵי־פָרֶץ יָרֻץ עָלַי כְּגִבּֽוֹר׃ 14
१४देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो. सैनिकाप्रमाणे तो माझ्यावर चाल करून येतो.
שַׂק תָּפַרְתִּי עֲלֵי גִלְדִּי וְעֹלַלְתִּי בֶעָפָר קַרְנִֽי׃ 15
१५मी फार दु: खी आहे म्हणून मी दु: खाचे कपडे घालतो. मी इथे धुळीत आणि राखेत बसतो आणि मला पराभूत झाल्यासारखे वाटते.
פָּנַי (חמרמרה) [חֳמַרְמְרוּ] מִנִּי־בֶכִי וְעַל עַפְעַפַּי צַלְמָֽוֶת׃ 16
१६रडल्यामुळे माझा चेहरा लाल झाला आहे. माझ्या पापण्यांवर मरणाची छाया आहे.
עַל לֹא־חָמָס בְּכַפָּי וּֽתְפִלָּתִי זַכָּֽה׃ 17
१७तरीही माझ्या हातून कोणात्याही प्रकारची हिंसा झाली नाही, आणि माझ्या प्रार्थना शुध्द आहेत. तरी असे झाले.
אֶרֶץ אַל־תְּכַסִּי דָמִי וְֽאַל־יְהִי מָקוֹם לְזַעֲקָתִֽי׃ 18
१८हे धरती, माझे रक्त लपवू नकोस. माझ्या रडण्याला विश्रांतीस्थान देऊ नकोस.
גַּם־עַתָּה הִנֵּה־בַשָּׁמַיִם עֵדִי וְשָׂהֲדִי בַּמְּרֹמִֽים׃ 19
१९स्वर्गात कदाचित् माझ्या बाजूचा कुणीतरी असेल. जो माझी त्या सर्वसमर्थासमोर हमी घेईल.
מְלִיצַי רֵעָי אֶל־אֱלוֹהַּ דָּלְפָה עֵינִֽי׃ 20
२०माझे मित्र माझा उपहास करतात, पण माझे डोळे देवासमोर अश्रू ढाळतात.
וְיוֹכַח לְגֶבֶר עִם־אֱלוֹהַּ וּֽבֶן־אָדָם לְרֵעֵֽהוּ׃ 21
२१जशी एखादी व्यक्ती आपल्या मित्रासाठी वादविवाद करते तसा तो माझ्याविषयी देवाबरोबर बोलतो.
כִּֽי־שְׁנוֹת מִסְפָּר יֶאֱתָיוּ וְאֹרַח לֹא־אָשׁוּב אֶהֱלֹֽךְ׃ 22
२२जेव्हा काही वर्ष जातील, तेव्हा मी पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे.”

< איוב 16 >