< הושע 4 >
שִׁמְעוּ דְבַר־יְהֹוָה בְּנֵי יִשְׂרָאֵל כִּי רִיב לַֽיהֹוָה עִם־יוֹשְׁבֵי הָאָרֶץ כִּי אֵין־אֱמֶת וְֽאֵין־חֶסֶד וְאֵֽין־דַּעַת אֱלֹהִים בָּאָֽרֶץ׃ | 1 |
१इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वराचा शब्द ऐका, या देशातील लोकांविरुध्द परमेश्वराचा वाद आहे; कारण या देशामध्ये सत्यता किंवा करारबध्द विश्वासूपणा, देवाचे ज्ञान नाही.
אָלֹה וְכַחֵשׁ וְרָצֹחַ וְגָנֹב וְנָאֹף פָּרָצוּ וְדָמִים בְּדָמִים נָגָֽעוּ׃ | 2 |
२तर येथे शाप देणे, लबाड बोलणे, जीव घेणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे आहे. या लोकांनी सर्व नियम मोडले आहेत व इथे रक्तपातानंतर रक्तपात होत आहे.
עַל־כֵּן ׀ תֶּאֱבַל הָאָרֶץ וְאֻמְלַל כׇּל־יוֹשֵׁב בָּהּ בְּחַיַּת הַשָּׂדֶה וּבְעוֹף הַשָּׁמָיִם וְגַם־דְּגֵי הַיָּם יֵאָסֵֽפוּ׃ | 3 |
३म्हणून ही भूमी कोरडी पडत आहे, जो कोणी येथे राहतो तो नाश पावत आहे, रानपशू, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासेही नाहीसे होत आहेत.
אַךְ אִישׁ אַל־יָרֵב וְאַל־יוֹכַח אִישׁ וְעַמְּךָ כִּמְרִיבֵי כֹהֵֽן׃ | 4 |
४पण कुणालाही वाद घालू देऊ नका, कोणीही कोणावर आरोप न लावो, कारण याजकांनो हे तुम्ही आहात ज्यांस मी दोष लावत आहे.
וְכָשַׁלְתָּ הַיּוֹם וְכָשַׁל גַּם־נָבִיא עִמְּךָ לָיְלָה וְדָמִיתִי אִמֶּֽךָ׃ | 5 |
५आणि तू दिवसा अडखळून पडशील आणि तुझासुद्धा भविष्यवादीही रात्री अडखळून पडेल; आणि मी तुझ्या आईचा नाश करेन.
נִדְמוּ עַמִּי מִבְּלִי הַדָּעַת כִּי־אַתָּה הַדַּעַת מָאַסְתָּ (ואמאסאך) [וְאֶמְאָֽסְךָ] מִכַּהֵן לִי וַתִּשְׁכַּח תּוֹרַת אֱלֹהֶיךָ אֶשְׁכַּח בָּנֶיךָ גַּם־אָֽנִי׃ | 6 |
६माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत. कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून मी सुध्दा तुम्हास माझे याजक म्हणून नाकारीन. माझे, तुमच्या देवाचे नियमशास्त्र तुम्ही विसरलात म्हणून मी ही तुमच्या मुलांना विसरेन.
כְּרֻבָּם כֵּן חָטְאוּ־לִי כְּבוֹדָם בְּקָלוֹן אָמִֽיר׃ | 7 |
७जसे हे याजक वाढत गेले तसे ते माझ्या विरोधात पाप करत गेले. मी त्यांचा सन्मान लाजेमध्ये बदलून टाकीन.
חַטַּאת עַמִּי יֹאכֵלוּ וְאֶל־עֲוֺנָם יִשְׂאוּ נַפְשֽׁוֹ׃ | 8 |
८ते माझ्या लोकांच्या पापावर जगतात. त्यांच्या दुष्टतेकडे त्याचे मन लागलेले आहे.
וְהָיָה כָעָם כַּכֹּהֵן וּפָקַדְתִּי עָלָיו דְּרָכָיו וּמַעֲלָלָיו אָשִׁיב לֽוֹ׃ | 9 |
९आणि जसे लोक तसा याजक असे होईल, आणि मी त्यांच्या आचरणामुळे त्यांना शासन करीन, आणि त्यांना त्यांच्या कर्मांचे फळ देईन.
וְאָֽכְלוּ וְלֹא יִשְׂבָּעוּ הִזְנוּ וְלֹא יִפְרֹצוּ כִּֽי־אֶת־יְהֹוָה עָזְבוּ לִשְׁמֹֽר׃ | 10 |
१०ते खातील पण ते त्यास पुरणार नाही; ते व्यभिचार करतील पण त्यांची वाढ होणार नाही, कारण ते आपला देव, परमेश्वर, यापासून खूप दूर गेले आहेत.
זְנוּת וְיַיִן וְתִירוֹשׁ יִֽקַּֽח־לֵֽב׃ | 11 |
११वेश्यागमन, द्राक्षरस, आणि नवा द्राक्षरस यांनी त्यांचा विवेक काढून घेतला आहे.
עַמִּי בְּעֵצוֹ יִשְׁאָל וּמַקְלוֹ יַגִּיד לוֹ כִּי רוּחַ זְנוּנִים הִתְעָה וַיִּזְנוּ מִתַּחַת אֱלֹהֵיהֶֽם׃ | 12 |
१२माझे लोक त्यांच्या लाकडी मुर्तीचा सल्ला घेतात, त्यांच्या काठ्या त्यांना भविष्य सांगतात. गुंतागुंतीच्या आत्म्याने त्यांना बहकवले आहे, आणि त्यांनी माझा, त्यांच्या परमेश्वराचा त्याग केला आहे.
עַל־רָאשֵׁי הֶהָרִים יְזַבֵּחוּ וְעַל־הַגְּבָעוֹת יְקַטֵּרוּ תַּחַת אַלּוֹן וְלִבְנֶה וְאֵלָה כִּי טוֹב צִלָּהּ עַל־כֵּן תִּזְנֶינָה בְּנוֹתֵיכֶם וְכַלּוֹתֵיכֶם תְּנָאַֽפְנָה׃ | 13 |
१३ते पर्वतांच्या शिखरावर बलिदान करतात आणि टेकडयांवर धूप जाळतात, ओक, हिवर, आणि धूप जाळतात, कारण त्यांची सावली चांगली (छान) असते; म्हणून तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात.
לֹא־אֶפְקוֹד עַל־בְּנוֹתֵיכֶם כִּי תִזְנֶינָה וְעַל־כַּלּֽוֹתֵיכֶם כִּי תְנָאַפְנָה כִּי־הֵם עִם־הַזֹּנוֹת יְפָרֵדוּ וְעִם־הַקְּדֵשׁוֹת יְזַבֵּחוּ וְעָם לֹֽא־יָבִין יִלָּבֵֽט׃ | 14 |
१४तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात तेव्हा मी त्यांना शासन करणार नाही कारण पुरुष स्वत: वेश्येकडे वेगळे होऊन जातात, आणि कलावंतिणींबरोबर यज्ञ करतात; हे विवेकहीन लोक आहेत, ते नाश पावतील.
אִם־זֹנֶה אַתָּה יִשְׂרָאֵל אַל־יֶאְשַׁם יְהוּדָה וְאַל־תָּבֹאוּ הַגִּלְגָּל וְאַֽל־תַּעֲלוּ בֵּית אָוֶן וְאַל־תִּשָּׁבְעוּ חַי־יְהֹוָֽה׃ | 15 |
१५हे इस्राएला जरी तू व्यभिचार केला आहेस, तरी यहूदा दोषी न होवो; तुम्ही लोकहो, गिल्गालास जाऊ नका, वर बेथ अवेनास जाऊ नका, परमेश्वरांच्या जिविताची शपथ वाहू नका.
כִּי כְּפָרָה סֹרֵרָה סָרַר יִשְׂרָאֵל עַתָּה יִרְעֵם יְהֹוָה כְּכֶבֶשׂ בַּמֶּרְחָֽב׃ | 16 |
१६कारण इस्राएल हट्टी कालवडी सारखा हट्टी वागला आहे. मग परमेश्वर त्यास कोकरे जसे कुरणात चरतात तसा गायरानात कसा आणणार?
חֲבוּר עֲצַבִּים אֶפְרָיִם הַֽנַּֽח־לֽוֹ׃ | 17 |
१७एफ्राईम मुर्तीसोबत एक झाला आहे, त्यास एकटे सोडा.
סָר סׇבְאָם הַזְנֵה הִזְנוּ אָהֲבוּ הֵבוּ קָלוֹן מָגִנֶּֽיהָ׃ | 18 |
१८त्यांचा द्राक्षरस आंबट झाला आहे; ते एकसारखे व्यभिचार करतच राहतात. तिच्या अधिकाऱ्यास अप्रतिष्ठा अतिप्रिय आहे.
צָרַר רוּחַ אוֹתָהּ בִּכְנָפֶיהָ וְיֵבֹשׁוּ מִזִּבְחוֹתָֽם׃ | 19 |
१९वारा आपल्या पंखात तिला लपेटून नेईन, आणि ते आपल्या बलिदानांमुळे लज्जित होतील.