< תהילים 82 >

מזמור לאסף אלהים נצב בעדת-אל בקרב אלהים ישפט 1
आसाफाचे स्तोत्र देव दैवी मंडळीत उभा आहे, तो देवांच्यामध्ये न्याय देतो.
עד-מתי תשפטו-עול ופני רשעים תשאו-סלה 2
कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?
שפטו-דל ויתום עני ורש הצדיקו 3
गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.
פלטו-דל ואביון מיד רשעים הצילו 4
त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.
לא ידעו ולא יבינו-- בחשכה יתהלכו ימוטו כל-מוסדי ארץ 5
“ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत; ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात; पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.”
אני-אמרתי אלהים אתם ובני עליון כלכם 6
मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.”
אכן כאדם תמותון וכאחד השרים תפלו 7
तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल, आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल.
קומה אלהים שפטה הארץ כי-אתה תנחל בכל-הגוים 8
हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर, कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.

< תהילים 82 >