< תהילים 80 >
למנצח אל-ששנים עדות לאסף מזמור ב רעה ישראל האזינה-- נהג כצאן יוסף ישב הכרובים הופיעה | 1 |
१आसाफाचे स्तोत्र हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवितोस तो तू लक्ष दे. जो तू करुबांच्यावर बसतोस, आम्हावर प्रकाश पाड.
לפני אפרים ובנימן ומנשה-- עוררה את-גבורתך ולכה לישעתה לנו | 2 |
२एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर तू आपल्या सामर्थ्याने खळबळ उडव; ये व आम्हास वाचव.
אלהים השיבנו והאר פניך ונושעה | 3 |
३हे देवा, तू आमचा पुन्हा स्वीकार कर; आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्ही वाचू.
יהוה אלהים צבאות-- עד-מתי עשנת בתפלת עמך | 4 |
४हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे लोक प्रार्थना करीत असता तू किती वेळ कोपलेला राहशील?
האכלתם לחם דמעה ותשקמו בדמעות שליש | 5 |
५तू त्यांना अश्रूंची भाकर खावयास दिली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आसवे पिण्यास दिली आहेत.
תשימנו מדון לשכנינו ואיבינו ילעגו-למו | 6 |
६तू आम्हास आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त करतोस, आणि आमचे शत्रू आपसात आम्हास हसतात.
אלהים צבאות השיבנו והאר פניך ונושעה | 7 |
७हे सेनाधीश देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर. आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्हास वाचव.
גפן ממצרים תסיע תגרש גוים ותטעה | 8 |
८मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणिला; राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला.
פנית לפניה ותשרש שרשיה ותמלא-ארץ | 9 |
९तू त्याकरता जागा तयार केली; त्याने मूळ धरले आणि देश भरून टाकला.
כסו הרים צלה וענפיה ארזי-אל | 10 |
१०त्याच्या सावलीने पर्वत, त्याच्या फांद्यांनी देवाचे उच्च गंधसरू आच्छादून टाकले.
תשלח קצירה עד-ים ואל-נהר יונקותיה | 11 |
११त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले कोंब फरात नदीपर्यंत पाठविले.
למה פרצת גדריה וארוה כל-עברי דרך | 12 |
१२तू त्यांची कुंपणे कां मोडली? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याचे फळ तोडतात.
יכרסמנה חזיר מיער וזיז שדי ירענה | 13 |
१३रानडुकरे येऊन त्याची नासधूस करतात. आणि रानटी पशू त्यास खाऊन टाकतात.
אלהים צבאות שוב-נא הבט משמים וראה ופקד גפן זאת | 14 |
१४हे सेनाधीश देवा, तू मागे फिर; स्वर्गातून खाली बघ आणि लक्ष पुरव आणि या द्राक्षवेलीची काळजी घे.
וכנה אשר-נטעה ימינך ועל-בן אמצתה לך | 15 |
१५हे मूळ तू आपल्या उजव्या हाताने लाविले आहे, जो कोंब तू आपणासाठी सबळ केला आहे त्याचे रक्षण कर.
שרפה באש כסוחה מגערת פניך יאבדו | 16 |
१६ती अग्नीने जळाली आहे आणि ती तोडून टाकली आहे; तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे शत्रू नष्ट होतात.
תהי-ידך על-איש ימינך על-בן-אדם אמצת לך | 17 |
१७तुझ्या उजव्या हाताला असलेल्या मनुष्यावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो;
ולא-נסוג ממך תחינו ובשמך נקרא | 18 |
१८मग आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही; तू आम्हास जिवंत कर आणि आम्ही तुझ्या नावाचा धावा करू.
יהוה אלהים צבאות השיבנו האר פניך ונושעה | 19 |
१९हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हास परत आण. आमच्यावर आपला मुखप्रकाश पाड आणि आमचा बचाव होईल.