< תהילים 8 >
למנצח על-הגתית מזמור לדוד ב יהוה אדנינו-- מה-אדיר שמך בכל-הארץ אשר תנה הודך על-השמים | 1 |
१मुख्य गायकासाठी; गित्तीथ सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे.
מפי עוללים וינקים-- יסדת-עז למען צורריך להשבית אויב ומתנקם | 2 |
२तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून, बाळांच्या आणि तान्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली.
כי-אראה שמיך מעשה אצבעתיך-- ירח וכוכבים אשר כוננתה | 3 |
३तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो.
מה-אנוש כי-תזכרנו ובן-אדם כי תפקדנו | 4 |
४तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी? किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे?
ותחסרהו מעט מאלהים וכבוד והדר תעטרהו | 5 |
५तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस. आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे.
תמשילהו במעשי ידיך כל שתה תחת-רגליו | 6 |
६तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस. तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस.
צנה ואלפים כלם וגם בהמות שדי | 7 |
७सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा.
צפור שמים ודגי הים עבר ארחות ימים | 8 |
८आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व.
יהוה אדנינו מה-אדיר שמך בכל-הארץ | 9 |
९हे परमेश्वरा, आमच्या देवा, सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ट आहे!