< תהילים 63 >
מזמור לדוד בהיותו במדבר יהודה ב אלהים אלי אתה-- אשחרך צמאה לך נפשי-- כמה לך בשרי בארץ-ציה ועיף בלי-מים | 1 |
१दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन; शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे; माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे.
כן בקדש חזיתך-- לראות עזך וכבודך | 2 |
२म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे.
כי-טוב חסדך מחיים שפתי ישבחונך | 3 |
३कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे; माझे ओठ तुझी स्तुती करतील.
כן אברכך בחיי בשמך אשא כפי | 4 |
४म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन; मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन.
כמו חלב ודשן תשבע נפשי ושפתי רננות יהלל-פי | 5 |
५माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल; माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील.
אם-זכרתיך על-יצועי-- באשמרות אהגה-בך | 6 |
६मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो.
כי-היית עזרתה לי ובצל כנפיך ארנן | 7 |
७कारण तू माझे सहाय्य आहे, आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे.
דבקה נפשי אחריך בי תמכה ימינך | 8 |
८माझा जीव तुला चिकटून राहतो; तुझा उजवा हात मला आधार देतो.
והמה--לשואה יבקשו נפשי יבאו בתחתיות הארץ | 9 |
९पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील.
יגירהו על-ידי-חרב מנת שעלים יהיו | 10 |
१०त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल; त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील.
והמלך ישמח באלהים יתהלל כל-הנשבע בו כי יסכר פי דוברי-שקר | 11 |
११परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल; जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल, पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल.