< תהילים 61 >

למנצח על-נגינת לדוד ב שמעה אלהים רנתי הקשיבה תפלתי 1
दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझी आरोळी ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
מקצה הארץ אליך אקרא-- בעטף לבי בצור-ירום ממני תנחני 2
जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन; माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने.
כי-היית מחסה לי מגדל-עז מפני אויב 3
कारण तू माझ्यासाठी आश्रय, माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस.
אגורה באהלך עולמים אחסה בסתר כנפיך סלה 4
मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन.
כי-אתה אלהים שמעת לנדרי נתת ירשת יראי שמך 5
कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे.
ימים על-ימי-מלך תוסיף שנותיו כמו-דר ודר 6
तू राजाचे आयुष्य वाढव; त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत.
ישב עולם לפני אלהים חסד ואמת מן ינצרהו 7
मी देवासमोर सर्वकाळ राहो; तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील.
כן אזמרה שמך לעד-- לשלמי נדרי יום יום 8
मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन, म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.

< תהילים 61 >