< תהילים 58 >
למנצח אל-תשחת לדוד מכתם ב האמנם--אלם צדק תדברון מישרים תשפטו בני אדם | 1 |
१दाविदाचे स्तोत्र अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का?
אף-בלב עולת תפעלון בארץ--חמס ידיכם תפלסון | 2 |
२नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता.
זרו רשעים מרחם תעו מבטן דברי כזב | 3 |
३दुष्ट उदरापासूनच दुरावतात; ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात.
חמת-למו כדמות חמת-נחש כמו-פתן חרש יאטם אזנו | 4 |
४त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत;
אשר לא-ישמע לקול מלחשים חובר חברים מחכם | 5 |
५गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत.
אלהים--הרס שנימו בפימו מלתעות כפירים נתץ יהוה | 6 |
६हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक;
ימאסו כמו-מים יתהלכו-למו ידרך חצו כמו יתמללו | 7 |
७जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत; जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत.
כמו שבלול תמס יהלך נפל אשת בל-חזו שמש | 8 |
८गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत.
בטרם יבינו סירתכם אטד כמו-חי כמו-חרון ישערנו | 9 |
९तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच, ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील.
ישמח צדיק כי-חזה נקם פעמיו ירחץ בדם הרשע | 10 |
१०नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल; तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल.
ויאמר אדם אך-פרי לצדיק אך יש-אלהים שפטים בארץ | 11 |
११म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”