< תהילים 54 >
למנצח בנגינת משכיל לדוד ב בבא הזיפים ויאמרו לשאול הלא דוד מסתתר עמנו ג אלהים בשמך הושיעני ובגבורתך תדינני | 1 |
१दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव, आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर.
אלהים שמע תפלתי האזינה לאמרי-פי | 2 |
२हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या शब्दाकडे कान दे.
כי זרים קמו עלי-- ועריצים בקשו נפשי לא שמו אלהים לנגדם סלה | 3 |
३कारण माझ्याविरूद्ध परके उठले आहेत, आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.
הנה אלהים עזר לי אדני בסמכי נפשי | 4 |
४पाहा, देव माझा मदतनीस आहे; प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे.
ישוב (ישיב) הרע לשררי באמתך הצמיתם | 5 |
५तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील; तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर.
בנדבה אזבחה-לך אודה שמך יהוה כי-טוב | 6 |
६मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण; हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे.
כי מכל-צרה הצילני ובאיבי ראתה עיני | 7 |
७कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.