< תהילים 41 >
למנצח מזמור לדוד ב אשרי משכיל אל-דל ביום רעה ימלטהו יהוה | 1 |
१मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. जो मनुष्य गरीबांची चिंता करतो तो आशीर्वादित आहे. त्याच्या संकटाच्या दिवशी परमेश्वर त्यास वाचवेल.
יהוה ישמרהו ויחיהו--יאשר (ואשר) בארץ ואל-תתנהו בנפש איביו | 2 |
२परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जिवंत ठेवेल. आणि पृथ्वीवर तो आशीर्वादित होईल. परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही.
יהוה--יסעדנו על-ערש דוי כל-משכבו הפכת בחליו | 3 |
३तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल. तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील.
אני-אמרתי יהוה חנני רפאה נפשי כי-חטאתי לך | 4 |
४मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर. माझा जीव निरोगी कर, कारण मी तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.”
אויבי--יאמרו רע לי מתי ימות ואבד שמו | 5 |
५माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि त्याचे नाव विस्मरणात जाईल?”
ואם-בא לראות שוא ידבר--לבו יקבץ-און לו יצא לחוץ ידבר | 6 |
६माझे शत्रू मला पाहायला आले असता ते व्यर्थ शब्द बोलतात. त्यांचे हृदय माझ्यासाठी खोटी साक्ष गोळा करते. जेव्हा ते माझ्यापासून दूर जातात तर दुसऱ्यांना देखील हेच सांगतात.
יחד--עלי יתלחשו כל-שנאי עלי--יחשבו רעה לי | 7 |
७माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात, ते माझ्याविरूध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात.
דבר-בליעל יצוק בו ואשר שכב לא-יוסיף לקום | 8 |
८ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो. म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.”
גם-איש שלומי אשר-בטחתי בו-- אוכל לחמי הגדיל עלי עקב | 9 |
९माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे.
ואתה יהוה חנני והקימני ואשלמה להם | 10 |
१०परंतू हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर आणि मला उठून उभे कर. म्हणजे मग मी त्यांची परतफेड करेन.
בזאת ידעתי כי-חפצת בי כי לא-יריע איבי עלי | 11 |
११माझे वैरी माझ्यावर जयोत्सोव करत नाही, यावरुन मी जाणतो की, तू माझ्या ठायी संतोष पावतोस.
ואני--בתמי תמכת בי ותציבני לפניך לעולם | 12 |
१२मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतोस, आणि सदासर्वकाळ आपल्या मुखापुढे ठेवतोस.
ברוך יהוה אלהי ישראל--מהעולם ועד העולם אמן ואמן | 13 |
१३परमेश्वर, इस्राएलाच्या देवाची अनादिकाळापासून तर सर्वकाळापर्यंत स्तुती असो, आमेन, आमेन.