< תהילים 4 >
למנצח בנגינות מזמור לדוד ב בקראי ענני אלהי צדקי--בצר הרחבת לי חנני ושמע תפלתי | 1 |
१प्रमुख वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे दावीदाचे स्तोत्र. मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा. संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले, माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक.
בני איש עד-מה כבודי לכלמה--תאהבון ריק תבקשו כזב סלה | 2 |
२अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार? किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार? सेला
ודעו--כי-הפלה יהוה חסיד לו יהוה ישמע בקראי אליו | 3 |
३परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे. मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल.
רגזו ואל-תחטאו אמרו בלבבכם על-משכבכם ודמו סלה | 4 |
४भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका! तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा.
זבחו זבחי-צדק ובטחו אל-יהוה | 5 |
५न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा आणि परमेश्वरावर आपला विश्वास ठेवा.
רבים אמרים מי-יראנו-טוב נסה עלינו אור פניך יהוה | 6 |
६बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हांवर तुझा मुखप्रकाश पाड.”
נתתה שמחה בלבי מעת דגנם ותירושם רבו | 7 |
७त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षरसाची समृध्दी असते, तेव्हा त्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू मला दिला आहे.
בשלום יחדו אשכבה ואישן כי-אתה יהוה לבדד לבטח תושיבני | 8 |
८मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो, कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस.