< תהילים 38 >
מזמור לדוד להזכיר ב יהוה--אל-בקצפך תוכיחני ובחמתך תיסרני | 1 |
१आठवण देण्यासाठी, दाविदाचे स्तोत्र. परमेश्वरा, तुझ्या क्रोधात मला ताडना करू नकोस, आणि तुझ्या कोपात मला शिक्षा करू नकोस.
כי-חציך נחתו בי ותנחת עלי ידך | 2 |
२कारण तुझे बाण मला छेदतात, आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे.
אין-מתם בבשרי מפני זעמך אין-שלום בעצמי מפני חטאתי | 3 |
३माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे. आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही.
כי עונתי עברו ראשי כמשא כבד יכבדו ממני | 4 |
४कारण माझ्या वाईट गोष्टींनी मला दडपून टाकले आहे. ते माझ्याकरिता फार जड असे ओझे झाले आहे.
הבאישו נמקו חבורתי מפני אולתי | 5 |
५माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत.
נעויתי שחתי עד-מאד כל-היום קדר הלכתי | 6 |
६मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते; दिवसभर मी शोक करतो.
כי-כסלי מלאו נקלה ואין מתם בבשרי | 7 |
७कारण लज्जेने मला गाठले आहे, आणि माझे सर्व शरीर आजारी आहे.
נפוגותי ונדכיתי עד-מאד שאגתי מנהמת לבי | 8 |
८मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे. आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो.
אדני נגדך כל-תאותי ואנחתי ממך לא-נסתרה | 9 |
९हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस, आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही.
לבי סחרחר עזבני כחי ואור-עיני גם-הם אין אתי | 10 |
१०माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे.
אהבי ורעי--מנגד נגעי יעמדו וקרובי מרחק עמדו | 11 |
११माझ्या परिस्थितीमुळे माझे मित्र आणि माझे सोबती मला टाळतात, माझे शेजारी माझ्यापासून लांब उभे राहतात.
וינקשו מבקשי נפשי ודרשי רעתי דברו הוות ומרמות כל-היום יהגו | 12 |
१२जे माझा जीव घेऊ पाहतात ते माझ्यासाठी पाश मांडतात. जे माझी हानी करू पाहतात ते दिवसभर विध्वंसक आणि कपटाचे शब्द बोलतात.
ואני כחרש לא אשמע וכאלם לא יפתח-פיו | 13 |
१३मी तर बहिर्यासारखा होऊन ऐकत नाही; मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही.
ואהי--כאיש אשר לא-שמע ואין בפיו תוכחות | 14 |
१४ऐकू न येणाऱ्या माणसासारखा मी आहे, ज्याच्याकडे काही उत्तर नाही.
כי-לך יהוה הוחלתי אתה תענה אדני אלהי | 15 |
१५परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन. प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील.
כי-אמרתי פן-ישמחו-לי במוט רגלי עלי הגדילו | 16 |
१६कारण मी जर म्हणालो तू उत्तर दिले नाही, तर माझे शत्रू माझ्यावर आनंद करतील. जर माझा पाय घसरला, तर ते भयानक गोष्टी करतील.
כי-אני לצלע נכון ומכאובי נגדי תמיד | 17 |
१७कारण मी अडखळून पडण्याच्या बेतास आलो आहे, आणि मी सतत यातनेत आहे.
כי-עוני אגיד אדאג מחטאתי | 18 |
१८मी माझा अपराध कबूल करतो; मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे.
ואיבי חיים עצמו ורבו שנאי שקר | 19 |
१९परंतु माझे शत्रू असंख्य आहेत; जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत.
ומשלמי רעה תחת טובה-- ישטנוני תחת רדופי- (רדפי-) טוב | 20 |
२०माझ्या चांगल्याची परतफेड ते वाईटाने करतात. जरी मी चांगले अनुसरलो. तरी माझ्यावर ते दोषारोपण करतात.
אל-תעזבני יהוה אלהי אל-תרחק ממני | 21 |
२१हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.
חושה לעזרתי אדני תשועתי | 22 |
२२हे प्रभू, माझ्या तारणाऱ्या, माझे साहाय्य करण्यास त्वरा कर.