< תהילים 33 >
רננו צדיקים ביהוה לישרים נאוה תהלה | 1 |
१न्यायी जनहो! परमेश्वरामध्ये आनंद करा, न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
הודו ליהוה בכנור בנבל עשור זמרו-לו | 2 |
२वीणा वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या; दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा.
שירו-לו שיר חדש היטיבו נגן בתרועה | 3 |
३त्याच्यासाठी नवे गीत गा; मोठा आवाज करून कौशल्याने वाद्ये वाजवा.
כי-ישר דבר-יהוה וכל-מעשהו באמונה | 4 |
४कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे, आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो.
אהב צדקה ומשפט חסד יהוה מלאה הארץ | 5 |
५देवाला चांगलुपणा आणि न्यायीपण प्रिय आहे, परमेश्वराच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे.
בדבר יהוה שמים נעשו וברוח פיו כל-צבאם | 6 |
६परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.
כנס כנד מי הים נתן באוצרות תהומות | 7 |
७तो समुद्रातील पाणी ढीगासारखे एकत्र करतो, तो समुद्र कोठारामध्ये ठेवतो.
ייראו מיהוה כל-הארץ ממנו יגורו כל-ישבי תבל | 8 |
८सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो, जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो.
כי הוא אמר ויהי הוא-צוה ויעמד | 9 |
९कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.
יהוה הפיר עצת-גוים הניא מחשבות עמים | 10 |
१०राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो, तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो.
עצת יהוה לעולם תעמד מחשבות לבו לדר ודר | 11 |
११परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात, त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात.
אשרי הגוי אשר-יהוה אלהיו העם בחר לנחלה לו | 12 |
१२परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे. ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत.
משמים הביט יהוה ראה את-כל-בני האדם | 13 |
१३परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो, तो सर्व लोकांस पाहातो.
ממכון-שבתו השגיח-- אל כל-ישבי הארץ | 14 |
१४तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो.
היצר יחד לבם המבין אל-כל-מעשיהם | 15 |
१५ज्याने सर्वांची हृदये घडवली तो त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे.
אין-המלך נושע ברב-חיל גבור לא-ינצל ברב-כח | 16 |
१६पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही. वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही.
שקר הסוס לתשועה וברב חילו לא ימלט | 17 |
१७घोडा विजयासाठी व्यर्थ आहे. त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही.
הנה עין יהוה אל-יראיו למיחלים לחסדו | 18 |
१८पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,
להציל ממות נפשם ולחיותם ברעב | 19 |
१९त्यांना मरणापासून, आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे.
נפשנו חכתה ליהוה עזרנו ומגננו הוא | 20 |
२०आम्ही परमेश्वराची वाट पाहू, तो आमचे साहाय्य आणि आमची ढाल आहे.
כי-בו ישמח לבנו כי בשם קדשו בטחנו | 21 |
२१त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो.
יהי-חסדך יהוה עלינו כאשר יחלנו לך | 22 |
२२परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हाबरोबर असू दे.