< תהילים 29 >
מזמור לדוד הבו ליהוה בני אלים הבו ליהוה כבוד ועז | 1 |
१दाविदाचे स्तोत्र. स्वर्गदूतहो, परमेश्वरास गौरव आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा.
הבו ליהוה כבוד שמו השתחוו ליהוה בהדרת-קדש | 2 |
२परमेश्वरास त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या; पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
קול יהוה על-המים אל-הכבוד הרעים יהוה על-מים רבים | 3 |
३परमेश्वराचा आवाज जलांवरून ऐकण्यात आला, गौरवशाली देव गर्जत आहे, परमेश्वर पुष्कळ जलांवर गर्जत आहे.
קול-יהוה בכח קול יהוה בהדר | 4 |
४परमेश्वराचा आवाज सामर्थशाली आहे, परमेश्वराचा आवाज चमत्कारीक आहे.
קול יהוה שבר ארזים וישבר יהוה את-ארזי הלבנון | 5 |
५परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते, परमेश्वर लबानोनाच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
וירקידם כמו-עגל לבנון ושרין כמו בן-ראמים | 6 |
६तो लबानोनला वासराप्रमाणे आणि सिर्योनला तरुण बैलाप्रमाणे बागडायला लावतो.
७परमेश्वराची वाणी अग्नी ज्वालासह हल्ला करते.
קול יהוה יחיל מדבר יחיל יהוה מדבר קדש | 8 |
८परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते.
קול יהוה יחולל אילות-- ויחשף יערות ובהיכלו-- כלו אמר כבוד | 9 |
९परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते आणि अरण्य पर्णहीन करते. पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात
יהוה למבול ישב וישב יהוה מלך לעולם | 10 |
१०महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे, आणि परमेश्वरच सर्वकाळचा राजा म्हणून बसला आहे.
יהוה--עז לעמו יתן יהוה יברך את-עמו בשלום | 11 |
११परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो, परमेश्वर त्याच्या लोकांना शांतीने आशीर्वादित करतो.