< תהילים 135 >
הללו-יה הללו את-שם יהוה הללו עבדי יהוה | 1 |
१परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, तुम्ही त्याची स्तुती करा.
שעמדים בבית יהוה-- בחצרות בית אלהינו | 2 |
२परमेश्वराच्या घरात उभे राहाणाऱ्यांनो, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, तुम्ही त्याची स्तुती करा.
הללו-יה כי-טוב יהוה זמרו לשמו כי נעים | 3 |
३परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे; त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे.
כי-יעקב בחר לו יה ישראל לסגלתו | 4 |
४कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे, इस्राएल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे.
כי אני ידעתי כי-גדול יהוה ואדנינו מכל-אלהים | 5 |
५परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे.
כל אשר-חפץ יהוה עשה בשמים ובארץ-- בימים וכל-תהמות | 6 |
६परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरात करतो.
מעלה נשאים מקצה הארץ ברקים למטר עשה מוצא-רוח מאוצרותיו | 7 |
७तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो; आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.
שהכה בכורי מצרים-- מאדם עד-בהמה | 8 |
८त्याने मिसर देशातील मनुष्यांचे आणि प्राण्यांचे दोघांचे पहिले जन्मलेले मारून टाकले.
שלח אותת ומפתים--בתוככי מצרים בפרעה ובכל-עבדיו | 9 |
९हे मिसरा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक यांच्याविरूद्ध चिन्ह व चमत्कार पाठवले.
שהכה גוים רבים והרג מלכים עצומים | 10 |
१०त्याने पुष्कळ राष्ट्रांवर हल्ला केला, आणि शक्तीमान राजांना मारून टाकले,
לסיחון מלך האמרי ולעוג מלך הבשן ולכל ממלכות כנען | 11 |
११अमोऱ्यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग आणि कनानमधल्या सर्व राज्यांचा पराभव केला.
ונתן ארצם נחלה-- נחלה לישראל עמו | 12 |
१२त्यांचा देश त्याने वतन असा दिला, आपल्या इस्राएल लोकांसाठी वतन करून दिला.
יהוה שמך לעולם יהוה זכרך לדר-ודר | 13 |
१३हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल, हे परमेश्वरा, तुझी किर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील.
כי-ידין יהוה עמו ועל-עבדיו יתנחם | 14 |
१४कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, आणि त्यास आपल्या सेवकांचा कळवळा येईल.
עצבי הגוים כסף וזהב מעשה ידי אדם | 15 |
१५राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुप्याच्या आहेत, त्या मनुष्याच्या हाताचे काम आहेत.
פה-להם ולא ידברו עינים להם ולא יראו | 16 |
१६त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण त्या बोलत नाहीत; त्यांना डोळे आहेत पण त्या पाहत नाहीत.
אזנים להם ולא יאזינו אף אין-יש-רוח בפיהם | 17 |
१७त्यांना कान आहेत, पण त्या ऐकत नाहीत, त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही.
כמוהם יהיו עשיהם-- כל אשר-בטח בהם | 18 |
१८जे त्या बनवितात, जे प्रत्येकजण त्याच्यावर भरवसा ठेवणारे त्यांच्यासारख्याच त्या आहेत.
בית ישראל ברכו את-יהוה בית אהרן ברכו את-יהוה | 19 |
१९हे इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा; अहरोनाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा.
בית הלוי ברכו את-יהוה יראי יהוה ברכו את-יהוה | 20 |
२०लेवीच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद करा.
ברוך יהוה מציון-- שכן ירושלם הללו-יה | 21 |
२१जो परमेश्वर यरूशलेमेत राहतो, त्याचा धन्यवाद सियोनेत होवो. परमेश्वराची स्तुती करा.