< תהילים 116 >
אהבתי כי-ישמע יהוה-- את-קולי תחנוני | 1 |
१मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो.
כי-הטה אזנו לי ובימי אקרא | 2 |
२कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन.
אפפוני חבלי-מות--ומצרי שאול מצאוני צרה ויגון אמצא (Sheol ) | 3 |
३मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, संकट व क्लेश मला झाले. (Sheol )
ובשם-יהוה אקרא אנה יהוה מלטה נפשי | 4 |
४नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.”
חנון יהוה וצדיק ואלהינו מרחם | 5 |
५परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे.
שמר פתאים יהוה דלתי ולי יהושיע | 6 |
६परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले.
שובי נפשי למנוחיכי כי-יהוה גמל עליכי | 7 |
७हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये; कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत.
כי חלצת נפשי ממות את-עיני מן-דמעה את-רגלי מדחי | 8 |
८तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून, आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत.
אתהלך לפני יהוה-- בארצות החיים | 9 |
९जीवंताच्या भूमित परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन.
האמנתי כי אדבר אני עניתי מאד | 10 |
१०मी फार पीडित आहे असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे.
אני אמרתי בחפזי כל-האדם כזב | 11 |
११मी अविचाराने म्हणालो की, सगळे माणसे खोटारडे आहेत.
מה-אשיב ליהוה-- כל-תגמולוהי עלי | 12 |
१२परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू?
כוס-ישועות אשא ובשם יהוה אקרא | 13 |
१३मी तारणाचा प्याला उंचावून परमेश्वराच्या नावाने हाक मारीन.
נדרי ליהוה אשלם נגדה-נא לכל-עמו | 14 |
१४त्याच्या सर्व लोकांसमोर, मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
יקר בעיני יהוה-- המותה לחסידיו | 15 |
१५परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे.
אנה יהוה כי-אני עבדך אני-עבדך בן-אמתך פתחת למוסרי | 16 |
१६हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे; मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे; माझी बंधने तू सोडली आहेस.
לך-אזבח זבח תודה ובשם יהוה אקרא | 17 |
१७मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
נדרי ליהוה אשלם נגדה-נא לכל-עמו | 18 |
१८मी त्याच्या सर्व लोकांसमोर परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
בחצרות בית יהוה-- בתוככי ירושלם הללו-יה | 19 |
१९परमेश्वराच्या घराच्या अंगणात, यरूशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेश्वराची स्तुती करा.