< תהילים 103 >
לדוד ברכי נפשי את-יהוה וכל-קרבי את-שם קדשו | 1 |
१दाविदाचे स्तोत्र. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.
ברכי נפשי את-יהוה ואל-תשכחי כל-גמוליו | 2 |
२हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.
הסלח לכל-עונכי הרפא לכל-תחלואיכי | 3 |
३तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो; तो तुझे सर्व आजार बरे करतो.
הגואל משחת חייכי המעטרכי חסד ורחמים | 4 |
४तो तुझे आयुष्य नाशापासून खंडून घेतो; तो तुला आपल्या विश्वासाच्या कराराने आणि करुणेच्या कृतीने मुकुट घालतो.
המשביע בטוב עדיך תתחדש כנשר נעוריכי | 5 |
५तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे पुन्हा नवे होते.
עשה צדקות יהוה ומשפטים לכל-עשוקים | 6 |
६जे सर्व अन्यायाने पीडलेले आहेत; त्यांच्यासाठी परमेश्वर नितीचे आणि न्यायाची कृत्ये करतो.
יודיע דרכיו למשה לבני ישראל עלילותיו | 7 |
७त्याने मोशेला आपले मार्ग, इस्राएल वंशजांना आपल्या कृत्यांची ओळख करून दिली.
רחום וחנון יהוה ארך אפים ורב-חסד | 8 |
८परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे; तो सहनशील आहे; त्याच्यामध्ये महान कराराची विश्वासयोग्यता आहे.
לא-לנצח יריב ולא לעולם יטור | 9 |
९तो नेहमीच शिक्षा करणार नाही; तो नेहमीच रागावणार नाही.
לא כחטאינו עשה לנו ולא כעונתינו גמל עלינו | 10 |
१०तो आम्हाशी आमच्या पापास अनुरूप असे वागला नाही किंवा आमच्या पापाला साजेसे प्रतिफळ दिले नाही.
כי כגבה שמים על-הארץ-- גבר חסדו על-יראיו | 11 |
११कारण जसे पृथ्वीच्या वरती आकाश आहे, तसे त्याचे जे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया आहे.
כרחק מזרח ממערב-- הרחיק ממנו את-פשעינו | 12 |
१२जसे पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे, तसे त्याने आमच्या पापाचे दोष आम्हापासून काढून टाकले आहेत.
כרחם אב על-בנים-- רחם יהוה על-יראיו | 13 |
१३जसा पिता आपल्या मुलांवर करुणा करतो, तसा परमेश्वर आपला सन्मान करतात त्यावर करुणा करतो.
כי-הוא ידע יצרנו זכור כי-עפר אנחנו | 14 |
१४कारण आम्ही कसे अस्तित्वात आलो हे तो जाणतो, आम्ही धुळ आहोत हे त्यास माहित आहे.
אנוש כחציר ימיו כציץ השדה כן יציץ | 15 |
१५मनुष्याच्या आयुष्याचे दिवस गवताप्रमाणे आहेत; शेतातील फुलासारखा तो फुलतो.
כי רוח עברה-בו ואיננו ולא-יכירנו עוד מקומו | 16 |
१६वारा त्यावरून वाहून जातो आणि ते नाहीसे होते, आणि कोणीही सांगू शकत नाही की, ते एकदा कोठे वाढत होते.
וחסד יהוה מעולם ועד-עולם-- על-יראיו וצדקתו לבני בנים | 17 |
१७परंतु परमेश्वराची करार विश्वसनियता त्याचा आदर करणाऱ्यावर अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत असते. त्याचा न्यायीपणाचा विस्तार त्यांच्या वंशजापर्यंत होतो.
לשמרי בריתו ולזכרי פקדיו לעשותם | 18 |
१८जे त्याचा करार पाळतात आणि त्यांच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो.
יהוה--בשמים הכין כסאו ומלכותו בכל משלה | 19 |
१९परमेश्वराने आपले सिंहासन स्वर्गात स्थापले आहे, आणि त्याचे राज्य प्रत्येकावर सत्ता गाजवते.
ברכו יהוה מלאכיו גברי כח עשי דברו לשמע בקול דברו | 20 |
२०अहो जे तुम्ही त्याचे दूत आहात, ज्या तुम्हास महान सामर्थ्य आहे आणि जे त्याचे शब्द ऐकून, त्याच्या आज्ञांचे आज्ञाधारकपणे पालन करता, ते तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
ברכו יהוה כל-צבאיו-- משרתיו עשי רצונו | 21 |
२१अहो परमेश्वराच्या, सर्व सैन्यांनो जे तुम्ही त्याचे सेवक आहात; ते तुम्ही त्याची इच्छा सिद्धीस नेता ते तुम्ही धन्यवादित आहात.
ברכו יהוה כל-מעשיו-- בכל-מקמות ממשלתו ברכי נפשי את-יהוה | 22 |
२२परमेश्वराच्या राज्यातील सर्व ठिकाणातील, त्याच्या सर्व प्राण्यांनो त्याचा धन्यवाद करा; हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर.