< תהילים 101 >
לדוד מזמור חסד-ומשפט אשירה לך יהוה אזמרה | 1 |
१दाविदाचे स्तोत्र मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन; हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन;
אשכילה בדרך תמים-- מתי תבוא אלי אתהלך בתם-לבבי בקרב ביתי | 2 |
२मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन. अहा, तू माझ्याकडे कधी येशील? मी माझ्या घरात सचोटीने चालेन.
לא-אשית לנגד עיני-- דבר-בליעל עשה-סטים שנאתי לא ידבק בי | 3 |
३मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही; अनाचाराचा मी द्वेष करतो; तो मला बिलगणार नाही.
לבב עקש יסור ממני רע לא אדע | 4 |
४हेकेखोर लोक मला सोडतील; मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही.
מלושני (מלשני) בסתר רעהו-- אותו אצמית גבה-עינים ורחב לבב-- אתו לא אוכל | 5 |
५आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन. जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही.
עיני בנאמני-ארץ-- לשבת עמדי הלך בדרך תמים-- הוא ישרתני | 6 |
६देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल.
לא-ישב בקרב ביתי-- עשה רמיה דבר שקרים-- לא-יכון לנגד עיני | 7 |
७कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत; लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही.
לבקרים אצמית כל-רשעי-ארץ להכרית מעיר-יהוה כל-פעלי און | 8 |
८देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन; वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन.