< מִשְׁלֵי 9 >
חכמות בנתה ביתה חצבה עמודיה שבעה | 1 |
१ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले; त्यामध्ये तिने खडकाचे सात खांब कोरून तयार केले.
טבחה טבחה מסכה יינה אף ערכה שלחנה | 2 |
२तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशू तयार केले आहेत; तिने आपला द्राक्षरस मिसळला आहे; आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे, तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे.
שלחה נערתיה תקרא-- על-גפי מרמי קרת | 3 |
३तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः
מי-פתי יסר הנה חסר-לב אמרה לו | 4 |
४“जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!” ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते.
לכו לחמו בלחמי ושתו ביין מסכתי | 5 |
५“या, माझे अन्न खा. आणि मी मिसळलेला द्राक्षरस प्या.
עזבו פתאים וחיו ואשרו בדרך בינה | 6 |
६तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा; सुज्ञानाच्या मार्गाने चला.”
יסר לץ--לקח לו קלון ומוכיח לרשע מומו | 7 |
७जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो, आणि जो दुर्जन मनुष्यास बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो.
אל-תוכח לץ פן-ישנאך הוכח לחכם ויאהבך | 8 |
८निंदकाला बोल लावू नको नाहीतर तो तुझा द्वेष करेल; ज्ञान्यास बोल लाव आणि तो तुझ्यावर प्रेम करील.
תן לחכם ויחכם-עוד הודע לצדיק ויוסף לקח | 9 |
९ज्ञानी मनुष्यास शिक्षण दिले तर तो ज्ञानात अधिक वाढत जाईल; नितीमान मनुष्यास शिक्षण दिले तर तो शिक्षणात अधिक वाढेल.
תחלת חכמה יראת יהוה ודעת קדשים בינה | 10 |
१०परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे, आणि परमपवित्र देवाला ओळखणे हीच सुज्ञता आहे.
כי-בי ירבו ימיך ויוסיפו לך שנות חיים | 11 |
११कारण माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, आणि तुमच्या आयुष्याची वर्षे वाढतील.
אם-חכמת חכמת לך ולצת לבדך תשא | 12 |
१२जर तुम्ही ज्ञानी असलास, तर तू आपणासाठी ज्ञानी असशील, पण जर तू निंदा केली तर तूच मात्र तिचे फळ भोगशील.
אשת כסילות המיה פתיות ובל-ידעה מה | 13 |
१३मूर्ख स्त्री गोंगाट करणाऱ्यासारखी आहे, ती अज्ञानी आहे आणि तिला काही कळत नाही.
וישבה לפתח ביתה-- על-כסא מרמי קרת | 14 |
१४ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते, ती नगरातल्या उंचस्थानी आसनावर बसते.
לקרא לעברי-דרך המישרים ארחותם | 15 |
१५जे लोक आपल्या वाटेने सरळ चालतात, जवळून जाणाऱ्यांना ती हाक मारून म्हणते,
מי-פתי יסר הנה וחסר-לב ואמרה לו | 16 |
१६“जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येवो!” जो कोणी बुद्धिहीन आहे त्यास ती म्हणते.
מים-גנובים ימתקו ולחם סתרים ינעם | 17 |
१७“चोरलेले पाणी गोड लागते, आणि गुप्तपणे खाल्लेली भाकर चांगली लागते.”
ולא-ידע כי-רפאים שם בעמקי שאול קראיה (Sheol ) | 18 |
१८पण तेथे मरण पावलेले आहेत हे त्यांना समजत नाही, तिचे पाहुणे मृतलोकाच्या खोल स्थानात आहेत हे त्यास माहित नाही. (Sheol )