< מִשְׁלֵי 5 >

בני לחכמתי הקשיבה לתבונתי הט-אזנך 1
माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव; माझ्या सुज्ञानाकडे काळजीपूर्वक आपला कान लाव.
לשמר מזמות ודעת שפתיך ינצרו 2
म्हणून तू दूरदर्शीपणाविषयी शिक्षण घे, आणि तुझे ओठ तुझ्या विद्येचे रक्षण करतील.
כי נפת תטפנה שפתי זרה וחלק משמן חכה 3
कारण व्यभिचारिणी स्त्रीच्या ओठातून मध टिपकतो, आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असते,
ואחריתה מרה כלענה חדה כחרב פיות 4
पण शेवटी ती दवण्यासारखी कडू आहे, आणि दुधारी तलवारी सारखी धारदार होते.
רגליה ירדות מות שאול צעדיה יתמכו (Sheol h7585) 5
तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात. (Sheol h7585)
ארח חיים פן-תפלס נעו מעגלתיה לא תדע 6
म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही. तिची पावले भटकतात, ती कोठे जाते हे तिला समजत नाही.
ועתה בנים שמעו-לי ואל-תסורו מאמרי-פי 7
आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; माझ्या तोंडची वचने ऐकण्यापासून दूर जाऊ नका.
הרחק מעליה דרכך ואל-תקרב אל-פתח ביתה 8
तू आपला मार्ग तिच्यापासून दूर राख, आणि तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नको.
פן-תתן לאחרים הודך ושנתיך לאכזרי 9
गेलास तर तुझी अब्रू इतरांच्या हाती जाईल, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे क्रूरजनाच्या हाती जातील;
פן-ישבעו זרים כחך ועצביך בבית נכרי 10
१०तुझ्या संपत्तीने परके मेजवाणी करतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल.
ונהמת באחריתך בכלות בשרך ושארך 11
११जेव्हा तुझा देह व शरीर सर्वकाही नष्ट होईल, तेव्हा तुझ्या आयुष्याच्या शेवटी तू शोक करशील.
ואמרת--איך שנאתי מוסר ותוכחת נאץ לבי 12
१२तू म्हणशील “मी शिस्तीचा कसा द्वेष केला, आणि माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानले!
ולא-שמעתי בקול מורי ולמלמדי לא-הטיתי אזני 13
१३मी माझ्या शिक्षकांच्या आज्ञा पाळल्या नाहीत, किंवा मला शिकवणाऱ्याकडे कान दिला नाही.
כמעט הייתי בכל-רע-- בתוך קהל ועדה 14
१४मंडळी व सभा यांच्यादेखत मी बहुतेक पुर्णपणे नाश पावलो होतो.”
שתה-מים מבורך ונזלים מתוך בארך 15
१५तू आपल्याच टाकितले पाणी पी, तुझ्या स्वतःच्या विहिरितले वाहते पाणी पी.
יפוצו מעינתיך חוצה ברחבות פלגי-מים 16
१६तुझे झरे बाहेर सर्वत्र वाहून जावे काय, आणि तुझ्या पाण्याचा प्रवाह सार्वजनिक चौकात वाहावा कां?
יהיו-לך לבדך ואין לזרים אתך 17
१७ते केवळ तुझ्यासाठीच असावेत, आणि तुझ्याबरोबर परक्यांसाठी नसावेत.
יהי-מקורך ברוך ושמח מאשת נעורך 18
१८तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो, आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसह तू संतुष्ट रहा.
אילת אהבים ויעלת-חן דדיה ירוך בכל-עת באהבתה תשגה תמיד 19
१९कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा.
ולמה תשגה בני בזרה ותחבק חק נכריה 20
२०माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे; तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे?
כי נכח עיני יהוה--דרכי-איש וכל-מעגלתיו מפלס 21
२१मनुष्य काय करतो हे परमेश्वर सर्वकाही पाहतो, तो त्याच्या सर्व वाटांकडे लक्ष देतो.
עוונתיו--ילכדנו את-הרשע ובחבלי חטאתו יתמך 22
२२दुष्ट मनुष्यास त्याची स्वतःचीच दुष्कर्मे धरतात, त्याची पापे दोरीप्रमाणे त्यास घट्ट पकडतील.
הוא--ימות באין מוסר וברב אולתו ישגה 23
२३शिक्षणाची उणीव असल्या कारणाने तो मरेल; तो आपल्या महान मूर्खपणामुळे बहकून जाईल.

< מִשְׁלֵי 5 >