< מִשְׁלֵי 4 >
שמעו בנים מוסר אב והקשיבו לדעת בינה | 1 |
१मुलांनो, वडिलांचे शिक्षण ऐका, आणि सुज्ञान समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या.
כי לקח טוב נתתי לכם תורתי אל-תעזבו | 2 |
२मी तुम्हास चांगला सल्ला देतो; माझी शिकवण कधीही विसरु नका.
כי-בן הייתי לאבי רך ויחיד לפני אמי | 3 |
३जेव्हा मी माझ्या वडिलाचा मुलगा होतो, माझ्या आईच्या दृष्टीने सुकुमार व एकुलता एक होतो,
וירני--ויאמר לי יתמך-דברי לבך שמר מצותי וחיה | 4 |
४त्यांनी मला शिकवले आणि मला म्हणाले, “तुझे मन माझी वचने घट्ट धरून ठेवो; माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत राहा.
קנה חכמה קנה בינה אל-תשכח ואל-תט מאמרי-פי | 5 |
५ज्ञान आणि सुज्ञता संपादन कर; माझे शब्द विसरु नकोस आणि माझ्या मुखातले शब्द नाकारू नकोस;
אל-תעזבה ותשמרך אהבה ותצרך | 6 |
६ज्ञानाचा त्याग करू नकोस ते तुझे राखण करील; त्याच्यावर प्रीती कर आणि ते तुझे रक्षण करील.
ראשית חכמה קנה חכמה ובכל-קנינך קנה בינה | 7 |
७ज्ञान हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून ज्ञान संपादन कर, आणि आपले सर्वस्व खर्चून सुज्ञता मिळव.
סלסלה ותרוממך תכבדך כי תחבקנה | 8 |
८ज्ञान हृदयात जतन करून ठेव आणि ते तुला उंचावेल, जेव्हा तू त्यास आलिंगन देशील तर ते तुझा सन्मान करील.
תתן לראשך לוית-חן עטרת תפארת תמגנך | 9 |
९ते तुझ्या शिरावर सन्मानाचे वेष्टन देईल; ते तुला सुंदर मुकुट देईल.”
שמע בני וקח אמרי וירבו לך שנות חיים | 10 |
१०माझ्या मुला, ऐक आणि माझ्या वचनाकडे लक्ष दे, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील.
בדרך חכמה הריתיך הדרכתיך במעגלי-ישר | 11 |
११मी तुला ज्ञानाचा मार्ग दाखविला आहे; मी तुला सरळ मार्गाने घेऊन जात आहे.
בלכתך לא-יצר צעדך ואם-תרוץ לא תכשל | 12 |
१२जेव्हा तू चालशील, तेव्हा तुझ्या मार्गात कोणीही उभा राहणार नाही. आणि जर तू धावशील, तर तू अडखळणार नाहीस.
החזק במוסר אל-תרף נצרה כי-היא חייך | 13 |
१३शिस्त घट्ट धरून ठेव, ती सोडून देऊ नको; ते सांभाळून ठेव, कारण ते तुझे जीवन आहे.
בארח רשעים אל-תבא ואל-תאשר בדרך רעים | 14 |
१४दुष्टांचे मार्ग आचरणात आणू नको, आणि जे वाईट करतात त्यांच्या मार्गाने चालू नको.
פרעהו אל-תעבר-בו שטה מעליו ועבר | 15 |
१५ते टाळ, त्याजवळ जाऊ नकोस; त्यापासून मागे फीर आणि दुसऱ्या मार्गाने जा.
כי לא ישנו אם-לא ירעו ונגזלה שנתם אם-לא יכשולו (יכשילו) | 16 |
१६कारण त्यांनी वाईट केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही आणि कोणाला अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही.
כי לחמו לחם רשע ויין חמסים ישתו | 17 |
१७कारण ते दुष्टाईने मिळवलेली भाकर खातात आणि हिंसेचे मद्य पितात.
וארח צדיקים כאור נגה הולך ואור עד-נכון היום | 18 |
१८परंतु योग्य करणाऱ्याचा मार्ग जो उदयाच्या प्रकाशासारखा आहे; मध्यान्हापर्यंत अधिकाधिक प्रकाशणाऱ्यासारखा आहे.
דרך רשעים כאפלה לא ידעו במה יכשלו | 19 |
१९पण दुष्टाचे मार्ग अंधकारासारखे आहेत, ते कशाशी अडखळले हे त्यांना समजत नाही.
בני לדברי הקשיבה לאמרי הט-אזנך | 20 |
२०माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष दे. माझे सांगणे ऐक.
אל-יליזו מעיניך שמרם בתוך לבבך | 21 |
२१ती तुझ्या डोळ्यापासून जाऊ देऊ नकोस; ती तुझ्या अंतःकरणात ठेव.
כי-חיים הם למצאיהם ולכל-בשרו מרפא | 22 |
२२कारण ज्यांना माझी वचने सापडतात त्यांस ती जीवन देतात, आणि त्यांच्या सर्व देहाला आरोग्य देतात.
מכל-משמר נצר לבך כי-ממנו תוצאות חיים | 23 |
२३तुझे अंतःकरण सुरक्षित ठेव आणि सर्व दक्षतेने त्याचे संरक्षण कर, कारण त्यातूनच जीवनाचा झरा वाहतो.
הסר ממך עקשות פה ולזות שפתים הרחק ממך | 24 |
२४वाकडे बोलणे तुझ्यापासून दूर ठेव, आणि दूषित बोलणे सोडून दे.
עיניך לנכח יביטו ועפעפיך יישרו נגדך | 25 |
२५तुझे डोळे नीट समोर पाहोत, आणि तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत.
פלס מעגל רגלך וכל-דרכיך יכנו | 26 |
२६तुझ्या पावलांसाठी सपाट वाट कर; मग तुझे सर्व मार्ग सुरक्षित होतील.
אל-תט-ימין ושמאול הסר רגלך מרע | 27 |
२७तू उजवीकडे किंवा डावीकडे दूर वळू नको; तू आपला पाय वाईटापासून राख.