< מִשְׁלֵי 13 >
בן חכם מוסר אב ולץ לא-שמע גערה | 1 |
१सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो, परंतु निंदक निषेध ऐकत नाही.
מפרי פי-איש יאכל טוב ונפש בגדים חמס | 2 |
२आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो, पण अविश्वासणाऱ्याची भूक जुलूम आहे.
נצר פיו שמר נפשו פשק שפתיו מחתה-לו | 3 |
३जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो.
מתאוה ואין נפשו עצל ונפש חרצים תדשן | 4 |
४आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही, पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते.
דבר-שקר ישנא צדיק ורשע יבאיש ויחפיר | 5 |
५नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो, पण दुर्जन जे लाजिरवाणे आहे ते करतो, आणि स्वतःला किळसवाणे करतो.
צדקה תצר תם-דרך ורשעה תסלף חטאת | 6 |
६नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते, पण पाप्याला त्याचे पाप उलथून टाकते.
יש מתעשר ואין כל מתרושש והון רב | 7 |
७जो कोणी आपणाला संपन्न करतो, पण त्यांच्याजवळ मात्र काहीच नसते, आणि जो कोणी सर्वकाही देऊन टाकतो, खरोखर तो अजून श्रीमंत आहे.
כפר נפש-איש עשרו ורש לא-שמע גערה | 8 |
८श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे, पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत.
אור-צדיקים ישמח ונר רשעים ידעך | 9 |
९नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो, पण दुष्टाचा दीप मालवला जाईल.
רק-בזדון יתן מצה ואת-נועצים חכמה | 10 |
१०गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात, पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते.
הון מהבל ימעט וקבץ על-יד ירבה | 11 |
११वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते, पण जो आपल्या हाताने काम करून पैसा कमावतो, त्याचा पैसा वाढत जातो.
תוחלת ממשכה מחלה-לב ועץ חיים תאוה באה | 12 |
१२जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते, परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे.
בז לדבר יחבל לו וירא מצוה הוא ישלם | 13 |
१३जो कोणी शिक्षणाचा तिरस्कार करतो तो स्वतःवर अनर्थ आणतो, पण जो कोणी आज्ञेचा आदर करतो त्यास प्रतिफळ मिळेल.
תורת חכם מקור חיים-- לסור ממקשי מות | 14 |
१४सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे, ते तुम्हास मृत्युपाशापासून दूर वळविल.
שכל-טוב יתן-חן ודרך בגדים איתן | 15 |
१५सुबोध अनुग्रह मिळवून देतो, पण विश्वासघातक्याचा मार्ग कधी न संपणारा आहे.
כל-ערום יעשה בדעת וכסיל יפרש אולת | 16 |
१६शहाणा मनुष्य कृती करण्याआधी विचार करतो. परंतु मूर्ख मनुष्य त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो.
מלאך רשע יפל ברע וציר אמונים מרפא | 17 |
१७दुष्ट निरोप्या संकटात पडतो, पण विश्वासू वकील समेट घडवून आणतो.
ריש וקלון פורע מוסר ושמר תוכחת יכבד | 18 |
१८जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल, पण जर एखादा त्याच्या शासनातून शिकला तर त्याचा सन्मान होईल.
תאוה נהיה תערב לנפש ותועבת כסילים סור מרע | 19 |
१९इच्छातृप्ती जिवाला गोड लागते, पण वाईटापासून दूर होणे याचा मूर्खांना द्वेष वाटतो.
הלוך (הולך) את-חכמים וחכם (יחכם) ורעה כסילים ירוע | 20 |
२०शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल, पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल.
חטאים תרדף רעה ואת-צדיקים ישלם-טוב | 21 |
२१आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते, पण जे कोणी चांगले करतो त्यास प्रतिफळ मिळते.
טוב--ינחיל בני-בנים וצפון לצדיק חיל חוטא | 22 |
२२चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो, पण पाप्यांची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते.
רב-אכל ניר ראשים ויש נספה בלא משפט | 23 |
२३गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते, पण अन्यायामुळे अनेकांचा नाश होतो.
חושך שבטו שונא בנו ואהבו שחרו מוסר | 24 |
२४जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो, पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो.
צדיק--אכל לשבע נפשו ובטן רשעים תחסר | 25 |
२५जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो, पण दुष्टांचे पोट रिकामेच राहते.