< ויקרא 2 >
ונפש כי תקריב קרבן מנחה ליהוה--סלת יהיה קרבנו ויצק עליה שמן ונתן עליה לבנה | 1 |
१जेव्हा कोणी परमेश्वरासमोर अन्नार्पण घेऊन येईल, तेव्हा त्याने अर्पणासाठी सपीठ आणावे; त्याने त्यामध्ये तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा;
והביאה אל בני אהרן הכהנים וקמץ משם מלא קמצו מסלתה ומשמנה על כל לבנתה והקטיר הכהן את אזכרתה המזבחה--אשה ריח ניחח ליהוה | 2 |
२मग त्याने ते अर्पण अहरोनाच्या याजक मुलांकडे आणावे; त्यांनी त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.
והנותרת מן המנחה--לאהרן ולבניו קדש קדשים מאשי יהוה | 3 |
३अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे होईल. परमेश्वरासाठी केलेले हे अर्पण परमपवित्र अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.
וכי תקרב קרבן מנחה מאפה תנור--סלת חלות מצת בלולת בשמן ורקיקי מצות משחים בשמן | 4 |
४जेव्हा भट्टीत भाजलेले अन्नार्पण करावयाचे असेल, तर ते तेलात मळलेल्या सपिठाच्या बेखमीर भाकरीचे किंवा वरून तेल ओतलेल्या बेखमीर चपात्याचे असले पाहिजे.
ואם מנחה על המחבת קרבנך--סלת בלולה בשמן מצה תהיה | 5 |
५जर तुला तव्यावर भाजलेल्या भाकरीचे अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या बेखमीर सपिठाचे असावे.
פתות אתה פתים ויצקת עליה שמן מנחה הוא | 6 |
६त्याचे तू तुकडे करून त्याच्यावर तेल ओतावे; हे अन्नार्पण होय.
ואם מנחת מרחשת קרבנך--סלת בשמן תעשה | 7 |
७कढईत तळलेल्यातले अन्नार्पण असेल तर ते तेलात मळलेल्या उत्तम सपिठाचे असावे.
והבאת את המנחה אשר יעשה מאלה--ליהוה והקריבה אל הכהן והגישה אל המזבח | 8 |
८अशाप्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर आणावेच; व ते याजकाकडे द्यावे व त्याने ते वेदीवर अर्पावे.
והרים הכהן מן המנחה את אזכרתה והקטיר המזבחה--אשה ריח ניחח ליהוה | 9 |
९मग याजकाने अन्नार्पणातून काही भाग घेऊन परमेश्वराच्या महान चांगुलपणाबद्दल वेदीवर त्याचा होम करावा. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय आणि ते परमेश्वरासाठी सुवासीक हव्य होय.
והנותרת מן המנחה--לאהרן ולבניו קדש קדשים מאשי יהוה | 10 |
१०अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोन व त्याच्या मुलांचे असेल; अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले हे अर्पण परमेश्वरास परमपवित्र आहे.
כל המנחה אשר תקריבו ליהוה--לא תעשה חמץ כי כל שאר וכל דבש לא תקטירו ממנו אשה ליהוה | 11 |
११खमीर असलेले कोणतेही अर्पण परमेश्वरास अर्पू नये कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पावयाचे नाही.
קרבן ראשית תקריבו אתם ליהוה ואל המזבח לא יעלו לריח ניחח | 12 |
१२प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वरास करावे; पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये.
וכל קרבן מנחתך במלח תמלח ולא תשבית מלח ברית אלהיך מעל מנחתך על כל קרבנך תקריב מלח | 13 |
१३तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने रुचकर कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको; तुझ्या सर्व अर्पणाबरोबर मीठ पण अर्पावे.
ואם תקריב מנחת בכורים ליהוה--אביב קלוי באש גרש כרמל תקריב את מנחת בכוריך | 14 |
१४जर परमेश्वराकरीता तुला अन्नार्पण म्हणून पहिल्या हंगामाचा उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातले चोळून काढलेले ताजे दाणे आण; हे हंगामातील तुझ्या प्रथम पिकाचे अन्नार्पण होय.
ונתת עליה שמן ושמת עליה לבנה מנחה הוא | 15 |
१५त्यावर तेल ओत आणि धूप ठेव; हे अन्नार्पण होय.
והקטיר הכהן את אזכרתה מגרשה ומשמנה על כל לבנתה--אשה ליהוה | 16 |
१६चोळून काढलेले दाणे व तेल ह्यापैकी काही व सर्व धूप ह्यांचा याजकाने स्मारकभाग म्हणून होम जाळावा; हे परमेश्वरासाठी अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.