< איכה 5 >
זכר יהוה מה היה לנו הביט (הביטה) וראה את חרפתנו | 1 |
१हे परमेश्वरा, आमची अवस्था काय झाली याकडे लक्ष लाव. आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक.
נחלתנו נהפכה לזרים בתינו לנכרים | 2 |
२आमचे वतन परक्यांच्या हातात गेले आहे. आमची घरे परदेशीयांना दिली गेली आहेत.
יתומים היינו אין (ואין) אב אמתינו כאלמנות | 3 |
३आम्ही अनाथ झालो. आम्हास वडील नाहीत. आमच्या मातांची स्थिती विधवांसारखी झाली आहे.
מימינו בכסף שתינו עצינו במחיר יבאו | 4 |
४आम्हास पिण्याच्या पाण्यासाठी रूपे द्यावे लागतात; आमचेच लाकूड आम्हास विकले जाते.
על צוארנו נרדפנו יגענו לא (ולא) הונח לנו | 5 |
५आमचा पाठलाग करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत. आम्ही दमलो आहोत. आम्हास विश्रांती नाही.
מצרים נתנו יד אשור לשבע לחם | 6 |
६पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर व अश्शूर यांच्यासमोर आम्ही आपले हात पुढे केले.
אבתינו חטאו אינם (ואינם) אנחנו (ואנחנו) עונתיהם סבלנו | 7 |
७आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत. पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.
עבדים משלו בנו פרק אין מידם | 8 |
८गुलाम आमच्यावर राज्य करतात. त्यांच्या हातातून आम्हास कोणीही वाचवायला नाही.
בנפשנו נביא לחמנו מפני חרב המדבר | 9 |
९राणात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत घेऊन आपले अन्न मिळवतो.
עורנו כתנור נכמרו מפני זלעפות רעב | 10 |
१०आमची कातडी भट्टीप्रमाणे तापली आहेत. भुकेमुळे आम्हास ताप चढला आहे.
נשים בציון ענו בתלת בערי יהודה | 11 |
११सियोनेतील स्त्रियांवर आणि यहूदा नगरातील कुमारीवर त्यांनी अत्याचार केला;
שרים בידם נתלו פני זקנים לא נהדרו | 12 |
१२त्यांनी आमच्या राजपुत्रांना फासावर दिले; आमच्या वडीलधाऱ्यांचा त्यांनी सन्मान केला नाही.
בחורים טחון נשאו ונערים בעץ כשלו | 13 |
१३आमच्या तरुणांना त्यांनी पिठाच्या जात्यावर दळावयास लावले. ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले.
זקנים משער שבתו בחורים מנגינתם | 14 |
१४वृध्द आता नगरीच्या द्वारात बसत नाहीत. तरुण गायनवादन करीत नाहीत.
שבת משוש לבנו נהפך לאבל מחלנו | 15 |
१५आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही.
נפלה עטרת ראשנו אוי נא לנו כי חטאנו | 16 |
१६आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. म्हणून आम्हास हाय.
על זה היה דוה לבנו--על אלה חשכו עינינו | 17 |
१७या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे. आम्हास डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही.
על הר ציון ששמם שועלים הלכו בו | 18 |
१८सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत. सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात.
אתה יהוה לעולם תשב כסאך לדור ודור | 19 |
१९पण परमेश्वरा, तुझी सत्ता निरंतन आहे. तुझे राजसिंहासन चिरकाल राहील.
למה לנצח תשכחנו תעזבנו לארך ימים | 20 |
२०परमेश्वर तू आम्हास कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हास दीर्घकाल सोडून गेला आहेस.
השיבנו יהוה אליך ונשוב (ונשובה) חדש ימינו כקדם | 21 |
२१परमेश्वरा, आम्हास तुझ्याकडे परत वळव. आम्ही आमच्या पातकाकरिता पश्चाताप करितो. पूर्वीप्रमाणेच आमच्या जुन्या दिवसाची पुनर्स्थापना कर.
כי אם מאס מאסתנו קצפת עלינו עד מאד | 22 |
२२तोपर्यंत आमचा धिक्कार होऊन आमच्याप्रती तुझा क्रोध अतिभयंकर असेल.